लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सिंदेवाही तालुक्यातील विरव्हा येथे कारवाई करुन २६ लाख ८१ हजार रुपयांचा दारुसाठा जप्त केला. ही कारवाई शनिवारी करण्यात आली. याप्रकरणी एकाला अटक करण्यात आली. कोरोनामुळे जिल्हाबंदी असतानाही जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात दारु येत असल्याचे या कारवाईवरुन दिसून येत आहे. त्यातच सिंदेवाही पोलिसांच्या हद्दीत स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने कारवाई केल्याने सिंदेवाही पोलिसांच्या कार्यक्षतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत.तळोधी येथील सोनू कटारे हा हिंगणघाट येथील अविनाश नवरखेडे याच्या वाहनाने तालुक्यातील विरव्हा गावाजवळील बंद गोदामाजवळ देशी दारु मूल येथील नरसिंग अण्णा याला देणार असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली. या माहितीच्या आधारावर विरव्हा गावाजवळील पेट्रोल पंपाजवळ नाकाबंदी केली. यावेळी एक स्कॉर्पिओ एमएच ३१, ईके ०१९५, एक लाल रंगाची रिट्स एमएच ३३ ए १५७०, पांढऱ्या रंगाची रिट्स एमएच ३१ सीए ३४६८ या क्रमांकाचे वाहन येताच त्यांना थांबवून तपासणी केली. यावेळी वाहनात नऊ लाख ८० हजार रुपये किंमतीचे ९८ बॉक्स देशी दारु, तीन वाहन, मोबाईल असा २६ लाख ८१ हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी एकाला अटक करण्यात आला आहे.सदर कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांच्या मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक ओ. जी. कोकाटे यांच्या नेतृत्वातील पोहवा धनराज खरकाटे, पोलीस शिपाई अमोल धंदरे, गोपाल आतकुलवार आदींनी केली.
सीमाबंदीतही सिंदेवाहीत २६ लाखांचा मुद्देमाल जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 21, 2020 05:01 IST
स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सिंदेवाही तालुक्यातील विरव्हा येथे कारवाई करुन २६ लाख ८१ हजार रुपयांचा दारुसाठा जप्त केला. ही कारवाई शनिवारी करण्यात आली. याप्रकरणी एकाला अटक करण्यात आली. कोरोनामुळे जिल्हाबंदी असतानाही जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात दारु येत असल्याचे या कारवाईवरुन दिसून येत आहे. त्यातच सिंदेवाही पोलिसांच्या हद्दीत स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने कारवाई केल्याने सिंदेवाही पोलिसांच्या कार्यक्षतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत.
सीमाबंदीतही सिंदेवाहीत २६ लाखांचा मुद्देमाल जप्त
ठळक मुद्देस्थानिक गुन्हे शाखेची कारवाई । एकाला अटक