शहरं
Join us  
Trending Stories
1
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
4
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
5
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
6
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
7
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
8
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
9
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
10
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
11
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
12
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
13
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
14
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
15
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
16
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
17
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
18
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
19
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
20
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

२५ शेतकऱ्यांनी फुलवली जवसाची शेती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2022 05:00 IST

१५ ते २० वर्षांपूर्वी रब्बी हंगामात जवस लागवड हमखास केली जायची. उत्तम आरोग्यासाठी जवस तेलाचा वापर दररोजच्या आहारात केला जात होता. सांधेदुखी, पाठदुखीचा त्रास कमी करण्यास मदत होत होती. परंतु कालांतराने सोयाबीन व पाम तेलाचा वापर वाढल्यामुळे जवसाचे क्षेत्र कमी होत गेले. सद्यस्थितीत जवसाचे बियाणे उपलब्ध होत नसल्याने लोकांचा कल नगदी पिकाकडे वळला आहे.

प्रवीण खिरटकरलोकमत न्यूज नेटवर्कवरोरा : तालुक्यातील मंडल कृषी अधिकारी, शेगांव (बु.) आत्मा प्रकल्प, चंद्रपूर यांच्या मार्गदर्शनात पारंपरिक पीक पद्धतीअंतर्गत शेगाव मंडलातील सोनेगाव व पिंपळगाव येथे जवस पीक प्रात्यक्षिक राबविण्यात आले. त्यानुसार गावातील २५ शेतकऱ्यांनी सेंद्रिय व जैविक पध्दतीने मराठवाडा कृषी विद्यापीठाचे संशोधित वाण एलएसएल - ९३ची प्रत्येकी एक एकर क्षेत्रावर पेरणी केली आहे.भारतात अन्नधान्य भरपूर असले तरी गळीत धान्य मोठया प्रमाणात आयात करावे लागते. त्यामुळे गळीत धान्याचे क्षेत्र वाढविण्याच्या दृष्टीने मंडल कृषी अधिकारी, शेगांव बु. अंतर्गत मागील चार वर्षात भुईमूग, मोहरी, तीळ, जवस या पिकाचे विविध प्रयोग राबवून गळीत धान्य क्षेत्र वाढ करण्याचे कार्य अविरत सुरू आहे.सेंद्रिय शेतीमध्ये सदैव कार्यरत असलेले पिंपळगाव येथील शेतकरी  नत्थू गारघाटे यांनी सांगितले की, पांढरी फुले असलेली व भरपूर फुटवे असलेल्या या जवस वाणांचे उत्पादन निश्चितच पाच ते सहा क्विंटल प्रतिएकरी येणार आहे.या गावाचे शेतकरी  अशोक भिमटे, संदीप भोगेकर, वंदना गारघाटे, मुरलीधर भोंगळे, सोनेगाव येथील प्रगतशील शेतकरी जयंत बुराण, राहुल खिरटकर, देविदास लिल्हारे, कवडू ठाकरे, वसंता बुराण आदी शेतकऱ्यांनी यावर्षीच्या लागवडीमधून उत्पादित होणाऱ्या जवसापासून गटाच्या माध्यमातून लाकडी तेलघाण्याच्या साहाय्याने तेल काढून विक्री करण्याचा मानस बोलून दाखविला. तसेच शिल्लक साठा बियाणे म्हणून पुढील हंगामात इतर शेतकऱ्यांना पुरवठा करणार आहेत. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी भाऊसाहेब बरहाटे व प्रकल्प उपसंचालक (आत्मा)  रवींद्र मनोहरे  यांच्या मार्गदर्शनात मंडल कृषी अधिकारी विजय काळे व तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक विशाल घागी यांच्या नियोजनातून  वरोरा तालुक्यात जवस लागवड क्षेत्र वाढत आहे. शेगाव बु. मंडलातील कृषी सहाय्यक  पवन मडावी, लता दुर्गे, माधुरी राजूरकर, पवन मत्ते, पामलवाड, डोळस आदी गळीत धान्य क्षेत्र वाढीसाठी प्रामाणिक प्रयत्न करताना दिसत आहेत.

जवस तेलाचे अनेक फायदे१५ ते २० वर्षांपूर्वी रब्बी हंगामात जवस लागवड हमखास केली जायची. उत्तम आरोग्यासाठी जवस तेलाचा वापर दररोजच्या आहारात केला जात होता. सांधेदुखी, पाठदुखीचा त्रास कमी करण्यास मदत होत होती. परंतु कालांतराने सोयाबीन व पाम तेलाचा वापर वाढल्यामुळे जवसाचे क्षेत्र कमी होत गेले. सद्यस्थितीत जवसाचे बियाणे उपलब्ध होत नसल्याने लोकांचा कल नगदी पिकाकडे वळला आहे.

 

टॅग्स :agricultureशेतीFarmerशेतकरी