शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

एका महिन्यात २४ पशुधन वाघांचे भक्ष्य

By admin | Updated: October 14, 2016 01:27 IST

ब्रह्मपुरी विभागाअंतर्गत येत असलेल्या एफडीसीएमच्या पाथरी वनपरिक्षेत्रात मोठ्या प्रमाणात वनाचे क्षेत्र आहे.

एफडीसीएम पाथरी वनपरिक्षेत्रातील घटना : वाढीव नुकसान भरपाईच्या प्रतीक्षेत दिलीप फुलबांधे  गेवराब्रह्मपुरी विभागाअंतर्गत येत असलेल्या एफडीसीएमच्या पाथरी वनपरिक्षेत्रात मोठ्या प्रमाणात वनाचे क्षेत्र आहे. दिवसेंदिवस वाघाचे वास्तव्यही वाढत आहेत. मागील सप्टेंबर-२०१६ मध्ये या परिक्षेत्रातील जवळपासच्या गावातील शेतकऱ्यांचे २४ पशुधन वाघांनी फस्त केले आहे.उसणवार चक येथील काशिनाथ वाकडे यांचा बैल जगदीश वाकडे यांचा बैल, उसरपार तुकुम येथील नथ्थु घरत यांचा बैल, मनोहर वाकडे यांचा बैल, मोहन घोडमारे यांची म्हैस, सावंगी चक येथील तुकाराम मडावी यांचा बैल, विरखल येथील त्र्यंबक सदाशिव मेश्राम व देवाजी गंडाटे यांचा बैल, अंतरगाव येथील जगन उंदिरवाडे यांचा बैल, मेहा बुज. येथील विलास भरडकर यांचा बैल, लिलाबाई कोलते यांचा बैल, मांगली चक येथील तुकाराम मडावी यांचा बैल, पाथरी येथील तुळशीराम जाधव यांची बकरी, मारोती नेवारे यांचा बैल, राघोजी मेश्राम यांची गाय, नथ्थू घरत यांचा बैल, शरद सोनवाने यांचा बैल, रेवन सुरपाम यांचा बैल, संजय मडावी यांचा बैल, देवराव सोनकर यांचा बैल, बेलगाव येथील दिवाकर कांबळे यांचा बैल, नवेगाव तुकूम काशिनाथ शेंडे यांचा बैल असे एकूण २४ पशुधन वनपरिसरातील वाघांनी फस्त केल्याने जवळपास या शेतकऱ्यांचे पाच ते सहा लाखांचे नुकसान झाले आहे. सध्या स्थितीत वाघाच्या हल्ल्यात मृत जनावरांना वन विभागाने केवळ १५ हजार रुपयापर्यंतची तरतूद केली आहे. परंतु शेतकऱ्यांना पशुधनाच्या किंमती त्याहीपेक्षा अधिक असल्याने अल्प मोबदल्यामुळे फार मोठ्या आर्थिक संकटाला सामोरे जावे लागत आहे. पाथरी वनपरिक्षेत्रातील केवळ १० गावातील २४ पशुधन वाघाचे भक्ष्य झाले. परंतु वनविकास महामंडळाच्यापेक्षा जास्त वन पाथरी उपक्षेत्राचा येतो. त्यामधील आकडेवारी यापेक्षाही मोठी आहे. त्यामुळे तुटपुंज्या नुकसान भरपाईमुळे शेतकऱ्यांची फार मोठे नुकसान होत असल्याचे या परिसरातील नागरिकांचे म्हणणे आहे. राज्याचे वनमंत्र्यांनी केलेली घोषणा मृत बैलास २५ हजार रुपये ही सरसकट मदत तात्काळ अध्यादेश काढुन या शेतकऱ्यांना नवीन दराप्रमाणे द्यावी, अशी मागणी होत आहे.आदेश पोहोचला नाहीवाघांच्या हल्ल्यातील मृत पशुधन मालकाला वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी नुकसान भरपाई म्हणून २५ हजार रुपये घोषणा केली आहे. परंतु पाथरी वनपरिक्षेत्र व वनविभागातील वाघाच्या हल्ल्यात ठार झालेल्या पशुधनाचे आकडेवारी लक्षात घेता संबंधीत विभागाकडे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना वाढीव मोबदला मिळण्यासाठी माहिती घेतली असता मंत्र्यानी केवळ घोषणा केलेली आहे. मात्र तसा अध्यादेश अजूनपर्यंत वन विभाग किंवा वनविकास महामंडळाकडे पोहचला नसल्याची माहिती प्राप्त झाली.