शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

७६४ पैकी २३३ शेतकरी आत्महत्यांची प्रकरणे फेटाळली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 10, 2019 22:15 IST

शेतकऱ्यांसाठी विविध कल्याणकारी योजनांची अंमलबजावणी होत असताना २००३ पासून जिल्ह्यात शेतकरी आत्महत्यांची दुर्दैवी मालिका सुरूच असल्याचे जिल्हा प्रशासनाच्या अहवालातून पुढे आले आहे. या अहवालानुसार २००१ ते २०१८ पर्यंत ७६४ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या.

ठळक मुद्दे१७ वर्षांतील स्थिती : कायमस्वरूपी उपाययोजनांची गरज

राजेश मडावी।लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : शेतकऱ्यांसाठी विविध कल्याणकारी योजनांची अंमलबजावणी होत असताना २००३ पासून जिल्ह्यात शेतकरी आत्महत्यांची दुर्दैवी मालिका सुरूच असल्याचे जिल्हा प्रशासनाच्या अहवालातून पुढे आले आहे. या अहवालानुसार २००१ ते २०१८ पर्यंत ७६४ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. यातील ५१७ प्रकरणे पात्र ठरविण्यात आली असून आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबीयांना पाच कोटी १७ लाखांची मदत देण्यात आली. ११ प्रकरणे फेर चौकशीसाठी प्रलंबित आहेत. मात्र, तब्बल २३३ प्रकरणे फेटाळल्याने शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबांचा अपेक्षाभंग झाला आहे.शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती सुधारावी, यासाठी सत्ताधाºयासंह सर्वच राजकीय पक्षांनी अनेक घोषणा केल्या. सत्ता मिळाल्यानंतर काही योजनांची अंमलबजावणीही झाली. परंतु शेतकºयांच्या आत्महत्या थांबल्या नाही. सारेच नेते सभा-भाषणांमधून जगाचा पोशिंदा म्हणून शेतकरी हिताचा वरपांगी कैवार घेतात. पण, योजनांची अंमलबजावणी करताना निराशा हाती येते, असा आरोप शेतकरी करतात. जिल्ह्यामध्ये सिंचनाची व्याप्ती वाढविण्यासाठी प्रयत्न सुरू असताना शेतकरी आत्महत्यांची संख्याही दरवर्षी वाढताना दिसते. जिल्ह्यात २००३ रोजी पहिली शेतकरी आत्महत्या झाली होती. दरम्यान, ही आत्महत्या प्रशासनाने अपात्र ठरविली. २००४ रोजी जिल्ह्यात ११ शेतकºयांनी आत्महत्या केल्या. यामुळे प्रश्न पहिल्यांदाच ऐरणीवर आला. पण, यातील पाच प्रकरणे अपात्र ठरवून केवळ एकाच कुटुंबाला आर्थिक देण्यात आली. २००५ रोजी ही संख्या ११ वरून १७ पर्यंत पोहोचली. २००६ रोजी तर तब्बल ५० शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या होत्या. केवळ २४ कुटुंबांना सरकारने मदत दिली. २०१४ पासून २०१८ पर्यंत शेतकरी आत्महत्यांच्या वेग वर्षागणिक वाढत असल्याचे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या अहवालातून स्पष्ट होते.२०१६ रोजी सर्वाधिक ८४ शेतकरी आत्महत्याजिल्ह्यात २०१६ रोजी सर्वाधिक ८४ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. यातील ५२ पात्र तर २५ प्रकरणे अपात्र ठरविण्यात आली आहेत. पात्र ठरलेल्या शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबीयांना सरकारकडून आर्थिक मदत मिळाली नाही.फेटाळण्याचे कारण काय?शेतकरी आत्महत्यांची ७६४ पैकी २३० प्रकरणे जिल्हा समितीने अपात्र ठरविली. या आत्महत्या ‘शेतकरी आत्महत्या’ म्हणून सिद्ध होण्यासाठी आपाद्ग्रस्त कुटुंंबीय पुरावे सादर करू शकले नाही, असा दावा जिल्हा प्रशासनाने केला. शेतकºयांवर बँकांचे कर्ज नसणे, शेतकरी असल्याचा पुरावा न देणे, वैद्यकीय अहवालातून आत्महत्या केल्याचे सिद्ध न होणे, आदी पुराव्यांअभावी शेतकरी आत्महत्या प्रकरणे फेटाळण्यात आल्या आहेत.