शहरं
Join us  
Trending Stories
1
भेटायला गेले अन् पक्षप्रवेश करून घेतला; सकाळी शिंदे गटात, संध्याकाळी ठाकरे गटात
2
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
3
अमित शाहांच्या मॉर्फ्ड व्हिडीओ प्रकरणी X कडून मोठी कारवाई, झारखंड काँग्रेसचं अकाऊंट केलं बंद
4
आजचे राशीभविष्य - २ मे २०२४; व्यापारासाठी दिवस उत्तम, आर्थिक बाबी मार्गी लागतील
5
कूलर, पंखा, एसीमुळे किती वाढते विजेचे बिल?
6
स्ट्रोकनंतर पहिल्यांदाच समोर आले Zerodha चे फाऊंडर Nithin Kamath; हेल्थ बद्दल दिली 'ही' माहिती
7
२८-१५-५ महायुतीचा फॉर्म्युला; नाशिक, ठाणे शिंदेसेनेला, पालघर भाजपकडे
8
किंमत वाढूनही आपण खरेदी केले टनाने सोने; भारतीयांनी तीन महिन्यांत घेतले १३६.६ टन सोने
9
जीएसटीने भरली सरकारची तिजोरी; एप्रिलमध्ये २.१० लाख कोटींची वाढ
10
अमेरिकेपेक्षा भारतातच ‘एआय’चा वापर अधिक; तंत्रज्ञान स्वीकारण्यात देश सर्वात आघाडीवर
11
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदानाची अंतिम टक्केवारी जाहीर; ३ टक्क्यांची वाढ
12
राज ठाकरे सभा घेऊन कोणाच्या वरातीत नाचणार? सभेसाठी मनसेच्या अर्जावर उद्धवसेनेची टीका
13
भाजप-उद्धवसेना फक्त एका ठिकाणी समोरासमोर; गळ्यात गळे घालून फिरणारे शिवसैनिक एकमेकांच्या विरोधात
14
मुंबईत षटकार मारणार, राज्यात १५ जागा जिंकणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विश्वास
15
लॉकअपमधल्या चादरीच्या पट्टीने गळफास घेत बिश्नोई गँगच्या आरोपीची आत्महत्या
16
देशाच्या विकासात काँग्रेस अडथळा; ‘फॅमिली फर्स्ट’मुळे भारताचे नुकसान, योगी आदित्यनाथ यांचे टीकास्त्र
17
ठाण्यात दोघा माजी महापौरांमध्ये पुन्हा लढत; २०१४ मध्ये राजन विचारे विरुद्ध संजीव नाईक झाली होती लढत
18
प्रज्वल रेवण्णा उद्या बंगळुरूत येणार; आरोप तथ्यहीन असल्याचा दावा
19
पंतप्रधानांच्या पत्रात दडला निवडणुकीचा अजेंडा; उमेदवारांच्या माध्यमातून मतदारांना संदेश
20
श्रीकांत यांच्या कल्याणसाठी म्हस्केंना उमेदवारी देऊन विचारेंना बाय ? राजन विचारे यांना निवडणूक सोपी जाणार अशी चर्चा सुरू

जिल्ह्यात 22,103 मतदारांनी बजावला हक्क

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 02, 2020 5:00 AM

जिल्हाधिकारी अजय गुल्हाने मतदान प्रक्रीयेवर लक्ष ठेवून होते. त्यांनी चंद्रपूर शहरातील आयटीआय, मातोश्री विद्यालय, खत्री महाविद्यालय, भवानजीबाई चव्हाण हायस्कूल, ज्युबली हायस्कुल इ. मतदान केंद्रावर भेट देऊन पाहणी केली. अपर जिल्हाधिकारी विद्युत वरखेडकर यांनी भद्रावती, राजुरा, गडचांदूर व तालुक्याती इतर मतदान केंद्रावर भेट देऊन पाहणी केली. उपजिल्हाधिकारी (निवडणूक) संपत खलाटे यांनी जिल्ह्यात विविध मतदान केंद्रावर  भेटी देऊन पाहणी केली.

ठळक मुद्देपदवीधर मतदारसंघ निवडणूक : ६७. ४७ टक्के मतदान, कोरोना काळातही मतदानासाठी उत्साह

  लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर :  नागपूर विभाग पदवीधर मतदार संघ निवडणुकीत जिल्ह्यातून सुमारे ६७.४७  टक्के मतदान करण्यात आले.  २२ हजार १०३ मतदारांनी मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. कोरोनापासून बचाव करण्यासाठी सर्व उपाययोजना करण्यात आल्या होत्या.   निवडणुकीसाठी उभे असलेल्या १९ उमेदवारांचे भविष्य मतपेटीत बंद झाले आहे. मतदानादरम्यान कुठेही अनुचित घटना घडली नाही.   जिल्ह्यात २२ हजार ३३ पुरूष, १० हजार ७२३ स्त्री व इतर ५ असे ३२ हजार ७६१ पदवीधर मतदार होते. त्यापैकी सुमारे १५ हजार ६५८ पुरूष, ६ हजार ४४४ स्त्री व इतर १ अशा एकूण २२ हजार १०३  मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. जिल्हाधिकारी अजय गुल्हाने मतदान प्रक्रीयेवर लक्ष ठेवून होते. त्यांनी चंद्रपूर शहरातील आयटीआय, मातोश्री विद्यालय, खत्री महाविद्यालय, भवानजीबाई चव्हाण हायस्कूल, ज्युबली हायस्कुल इ. मतदान केंद्रावर भेट देऊन पाहणी केली. अपर जिल्हाधिकारी विद्युत वरखेडकर यांनी भद्रावती, राजुरा, गडचांदूर व तालुक्याती इतर मतदान केंद्रावर भेट देऊन पाहणी केली. उपजिल्हाधिकारी (निवडणूक) संपत खलाटे यांनी जिल्ह्यात विविध मतदान केंद्रावर  भेटी देऊन पाहणी केली. हॅन्ड सॅनिटराईज केल्याशिवाय मतदान कक्षामध्ये मतदारांना प्रवेश नव्हता.  जिल्ह्यात सकाळी १० वाजतापर्यंत ७. ७७ टक्के, दुपारी १२ वाजेपर्यंत १८.९४ टक्के, दुपारी २ वाजेपर्यंत ३६.८९ टक्के, ४ वाजेपर्यंत ५४.१६ टक्के तर ५ वाजेपर्यंत सुमारे ६७.४७ टक्के मतदान झाले. अंतिम आकडेवारी बुधवारी समजेल.

अनेकजण मतदानापासून वंचित; आमदार धोटेंची तक्रार  

कोरपना : प्रशासनाच्या ढिसाळ नियोजनामुळे अनेके पदवीधर मतदारांना मतदानापासून वंचित राहिल्याची तक्रार आमदार सुभाष धोटे यांनी निवडणूक आयोगाकडे तक्रार केली. आमदार धोटे यांच्या तक्रारीनंतर गडचांदूर व राजुरा मतदान केंद्रावर अप्पर जिल्हाधिकारी विद्युत वरखेडकर यांनी भेट दिली. मतदान प्रक्रियेचा वेग वाढविण्यात यश आले नाही. निवडणूक आयोगाने चाैकशी करण्याची मागणी आमदार धोटे यांनी केली आहे.

मत बाद होण्याच्या भीतीमुळे नवीन मतदार गोंधळले  पदवीधर मतदार संघाच्या एकाच उमेदवारासमोर १, २, ३ असा पसंतीक्रम नोंदविल्यास ते मत अवैध ठरते. मतदान केंद्रातील जांभळ्या शाईच्या पेनाने पसंतीक्रम लिहिण्याच्या सूचना मतदारांना देण्यात आल्या. अन्य पेनने पसंतीक्रम लिहिल्यास मत अवैध ठरते. एकल संक्रमणीय पद्धतीने पसंतीनुसार मतदान करण्याचा नियम आहे. त्यामुळे मत बाद होण्याच्या भीतीने नवीन मतदारांमध्ये संभ्रम झाल्याची माहिती मतदारांनी ‘लोकमत’ला दिली.

टॅग्स :Electionनिवडणूक