ट्रक ताब्यात : चालक फरार, घुग्घुसच्या बजरंग दलाची कारवाईलोकमत न्यूज नेटवर्कघुग्घुस : येथून जवळच असलेल्या धानोरा फाट्यावर २२ जनावरांना ट्रकमध्ये कोंबून आंध्र प्रदेशात घेऊन जाताना पकडण्यात आले. या जनावरांना भद्रावती गोरक्षणगृहात दाखल करण्यात आले.गोपनीय माहितीच्या आधारे बजरंग दलाने पोलिसांच्या सहकार्याने धानोरा फाट्यावर व विविध ठिकाणी गस्त लावली. यादरम्यान, धानोरा फाट्यावरून गडचांदूरकडे जाणाऱ्या एनएल ३०७१ क्रमांकाचा ट्रक थांबविला. त्याची तपासणी करीत असताना ट्रकचालक ट्रक सोडून पळून गेला. ट्रकमध्ये २२ बैल भरलेले होते. पोलिसांनी हा ट्रक भद्रावती येथील गोरक्षण केंद्रामध्ये पाठविला. अज्ञात फरार आरोपीविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मागील महिन्यापासून घुग्घुस व पडोली पोलिसांनी केलेल्या कारवाईमुळे जनावरांना जीवनदान मिळाले. तपास पोलीस उपनिरीक्षक चिडे करीत आहे.
२२ जनावरांची तस्करी पकडली
By admin | Updated: June 5, 2017 00:29 IST