शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
2
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
3
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
4
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
5
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
6
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
7
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
8
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं
9
९ महिने पाठपुरावा केला तरीही ऊसाचे बिल थकवले; चिठ्ठी लिहून तरुण शेतकऱ्यानं आयुष्य संपवले
10
"तुमचं वक्तव्य लाजिरवाणं, आम्ही हमासचे दहशतवादी मारले", प्रियंका गांधींच्या 'त्या' दाव्यामुळे इस्राइल संतप्त   
11
भारतासाठी धोक्याची घंटा; चीन LAC जवळ उभारतोय नवीन रेल्वे प्रकल्प, तणाव वाढणार..?
12
Dewald Brevis: बेबी एबीनं इतिहासच बदलून टाकला, ऑस्ट्रेलियाविरुद्ध 'अशी' कामगिरी करणारा एकटाच!
13
१४ लाखांचं पॅकेज असलेला तरुण भररस्त्यात मॉडेलसमोर अचानक उभा राहिला, पॅन्टची चेन उघडली अन्...
14
E10 च्या वाहनांमध्ये E20 पेट्रोल वापरू नका, नाहीतर...; टोयोटाचा वाहन मालकांना इशारा...
15
अहो आश्चर्यम्...! ६५० किमी पर्यंतची रेंज असलेल्या या २ कारला जुलै महिन्यात एकही ग्राहक मिळाला नाही! जाणून घ्या किंमत
16
शुबमन गिलची हवा! इंग्लंड दौरा गाजवणाऱ्या टीम इंडियाच्या कॅप्टनला ICC कडून मिळालं मोठं गिफ्ट
17
टाटा मोटर्सचा ऐतिहासिक निर्णय! 'या' दिवशी कंपनीचे होणार विभाजन; तुम्हाला काय फायदा?
18
व्हायरल होण्याचं भूत, मिठी मारुन कपलची कालव्यात उडी; Video पाहून वाढेल हृदयाची धडधड
19
"भावांनो, असं आयुष्य कोण जगेल..."; कौटुंबिक वादातून पतीनं संपवलं जीवन, मृत्यूपूर्वी दीड मिनिटांचा Video
20
ट्रम्प यांच्या ५०% टॅरिफनं मुकेश अंबानींच्या 'या' कंपनीचा शेअर घसरला? ₹१७ वर आला भाव!

चंद्रपूर जिल्ह्यातील २१ हजार शेतकरी झिजविताहेत तहसील कार्यालयाचे उंबरठे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2018 15:40 IST

धानपिकाला टाळून मोठ्या उमेदीने पहिल्यांदाच कापूस लागवड करणाऱ्या जिल्ह्यातील २१ हजार शेतकऱ्यांना यंदा बोंडअळीने दगा दिला. त्यामुळे हजारो शेतकरी दररोज तहसील कार्यालयाचे उंबरठे झिजवित असल्याचे चित्र दिसून येत आहे.

ठळक मुद्देबोंडअळी पॅकेज फसवेदोन महिन्यानंतरही तरतूद नाही

राजेश मडावीचंद्रपूर : धानपिकाला टाळून मोठ्या उमेदीने पहिल्यांदाच कापूस लागवड करणाऱ्या जिल्ह्यातील २१ हजार शेतकऱ्यांना यंदा बोंडअळीने दगा दिला. लागवडीचा खर्चही न निघाल्याने कर्जाचा भरणा कसा करायचा, या प्रश्नाने डोळ्याला डोळा लागत नाही. तर दुसरीकडे राज्य सरकारने बोंड अळीग्रस्त शेतकऱ्यांसाठी २२ डिसेंबर २०१७ ला मदतीचे पॅकेज जाहीर केले होते. मात्र, दोन महिन्यानंतरही सरकारने आर्थिक तरतूद केली नाही. त्यामुळे जिल्ह्यातील हजारो शेतकरी दररोज तहसील कार्यालयाचे उंबरठे झिजवित असल्याचे चित्र दिसून येत आहे.धान आणि अन्य पारंपरिक पिके टाळून जिल्ह्यातील हजारो शेतकऱ्यांनी यंदा पहिल्यांदाच कापूस लागवडीचे धाडस दाखविले. बँकांकडून पिककर्जासाठी मदत झाली नाही. मात्र, दरवर्षी होणारे आर्थिक नुकसान टाळण्यासाठी धान उत्पादक शेतकऱ्यांनी कापसाला पहिली पसंती दिली. पावसाचा बेरभवसा आणि मजुरांची टंचाई आदी समस्यांवर मात केल्याने समाधानकारक पीक हातात येईल, असे वाटत असतानाच बोंडअळीने शेतकऱ्यांच्या स्वप्नावर बोळा फि रवला. परिणामी, आर्थिक नुकसानीत पुन्हा भरच पडली. दरम्यान, शेतकऱ्यांना दिलासा मिळावा, यासाठी कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर यांनी विधासभेत २२ डिसेंबर २०१७ ला बोंड अळीग्रस्त शेतकºयांसाठी मदतीचे पॅकेज जाहीर केले. मात्र, सरकारने अद्याप आर्थिक तरतुदीच केली नाही. गाव, तालुका ते जिल्हास्तरावरील विविध समित्यांचे अहवाल विभागीय आयुक्तांकडे डिसेंबर महिन्यातच सादर करण्यात आले. त्यानुसार जिल्ह्यातील २१ हजार ४३९ बोंड अळीग्रस्त आर्थिक मदतीसाठी पात्र ठरले आहेत. हे शेतकरी दर आठवड्याला तहसील कार्यालयाचे उंबरठे झिजवून पॅकेजची विचारणा करीत आहेत. परंतु, सरकारकडून निधी न आल्याने आम्ही काय करायचे, अशी उत्तरे देवून संबंधित अधिकाऱ्यांकडून शेतकऱ्यांची बोळवण केली जात आहे.असे आहे पॅकेज ?कोरडवाहू कापूस उत्पादक शेतकऱ्यांना हेक्टरी ३० हजार ८०० देऊ, अशी घोषणा कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर यांनी विधानसभेत केली. राष्ट्रीय आपत्ती निधीतून ६ हजार ८०० रुपये, पीक विमा कंपन्यांकडून ८ हजार आणि भरपाईपोटी १६ हजार रुपये, असे या मदत निधीचे स्वरूप आहे. बोंडअळीने नुकसान झालेल्यांमध्ये नागपूर, वर्धा, अमरावती, अकोला, बुलडाणा व यवतमाळ जिल्ह्यातील शेतकऱ्यांची संख्या सर्वाधिक आहे. या जिल्ह्यांमध्ये सुमारे ३ लाख शेतकऱ्यांच्या पिकांना बोंड अळीचा फटका बसला.

टॅग्स :Farmerशेतकरी