लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : तालुक्यातील शेती पावसांच्या पाण्यावर अवलंबून असल्याने मागील अनेक वर्षांपासून कधी ओला तर कधी कोरडा दुष्काळ पडत असल्याने सततच्या नापिकीमुळे सावली तालुक्यातील शेतकरी हवालदिल झाला आहे.या सर्व शेतकऱ्यांना आधार देण्यासाठी गोसीखुर्द प्रकल्पाच्या पाण्याद्वारे सावली तालुक्यातील संपूर्ण शेतीचे सिंचन व्हावे, यासाठी आमदार विजय वडेट्टीवार यांनी प्रयत्न चालविले होते. या प्रयत्नांना यश आले असून ७६५ कोटी रुपये खर्च करुन लहान व मोठ्या कालव्याचे लवकरच बांधकाम करण्यात येणार असल्याने तालुक्यातील २१ हजार हेक्टर शेती ओलिताखाली येणार आहे.सावली तालुक्यातील संपूर्ण शेतीचे सिंचन होण्यासाठी गोसीखुर्द प्रकल्पाचे पाणी ओसोलामेंढा प्रकल्पाद्वारे शेतकºयांना देण्यासाठी आमदार विजय वडेट्टीवार यांनी विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळ नागपूरचे कार्यकारी अभियंता, गोसीखुर्दचे मुख्य अभियंता यांना वारंवार लेखी निवेदन देऊन पाठपुरवठा केला होता.वाघोली प्रकल्प गोसेखुर्द प्रकल्पात समाविष्टसावली तालुक्यातील वाघोली बुटी उपसा सिंचन प्रकल्प गोसेखुर्द प्रकल्पात समाविष्ट करण्यात आला आहे. त्यामुळे वाघोली बुटी प्रकल्पाच्या मुख्य कालव्यात गोसेखुर्द प्रकल्पाचे पाणी सोडण्यात येणार आहे. त्यामुळे या परिसरातील जवळपास १५ ते २० गावातील शेतीचे सिंचन करण्यात येणार आहे. ही सर्व कामे लवकरच पूर्ण होतील, असा विश्वास आमदार वडेट्टीवार यांनी व्यक्त केला आहे.नागपूर येथे बैठकआमदार विजय वडेट्टीवार यांनी सतत पाठपुरावा केल्यानंतर कालव्याच्या कामासाठी निधी मंजूर झाला असून, प्रशासकीय व तांत्रिक मंजुरीसुद्धा प्राप्त झाली आहे. त्यासंदर्भात ८० कामांच्या निविदा काढण्यात आल्या आहेत. यासंदर्भात आमदार विजय वडेट्टीवार यांनी मुख्य अभियंता, गोसेखुर्द प्रकल्प नागपूर यांच्या दालनात नुकतीच बैठक घेतली. या बैठकीत गोसेखुर्द प्रकल्पाचे मुख्य अभियंता कांबळे, अधीक्षक अभियंता, कार्यकारी अभियंता, उपविभागीय अभियंता उपस्थित होते.
२१ हजार हेक्टर शेती ओलिताखाली येणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 1, 2018 23:10 IST
तालुक्यातील शेती पावसांच्या पाण्यावर अवलंबून असल्याने मागील अनेक वर्षांपासून कधी ओला तर कधी कोरडा दुष्काळ पडत असल्याने सततच्या नापिकीमुळे सावली तालुक्यातील शेतकरी हवालदिल झाला आहे.
२१ हजार हेक्टर शेती ओलिताखाली येणार
ठळक मुद्देसावली तालुका : विजय वडेट्टीवार यांचा पाठपुरावा