शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
4
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
5
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
6
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
7
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
8
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
9
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
10
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
11
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
12
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
13
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
14
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
15
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
16
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
17
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
18
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
19
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

सहा दिवसात २१ लाख वृक्षलागवड

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 7, 2018 22:40 IST

अतिशय नियोजित पध्दतीने आखण्यात आलेल्या १३ कोटी वृक्षलागवडीच्या उद्दिष्टाला चंद्रपूर जिल्हयातील प्रशासनाने व नागरिकांनी मोठया प्रमाणात प्रतिसाद देत असल्याचे पुढे आले आहे. १ जुलै ते ६ जुलै या काळामध्ये चंद्रपूर जिल्हयात २१ लाखांवर वृक्षलागवड झाली आहे.

ठळक मुद्देलोकसहभाग वाढला : पालकमंत्र्यांच्या आवाहनाला अभूतपूर्व प्रतिसाद

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : अतिशय नियोजित पध्दतीने आखण्यात आलेल्या १३ कोटी वृक्षलागवडीच्या उद्दिष्टाला चंद्रपूर जिल्हयातील प्रशासनाने व नागरिकांनी मोठया प्रमाणात प्रतिसाद देत असल्याचे पुढे आले आहे. १ जुलै ते ६ जुलै या काळामध्ये चंद्रपूर जिल्हयात २१ लाखांवर वृक्षलागवड झाली आहे. नेहमीप्रमाणे वनविभागाने यामध्ये सर्वाधिक वाटा उचलला असून वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या गृह जिल्हयातील वृक्षलागवड उद्दिष्टांकडे अग्रेसर होत आहे.२७ जून रोजी वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी जिल्हा परिषदेच्या आवारात आयोजित कार्यक्रमामध्ये संपूर्ण जिल्ह्याला यावेळी वृक्षलागवडीमध्ये सहभागी होण्याचे आवाहन केले होते. यावेळी त्यांनी वृक्षदिंडीला सुरुवात केली होती. त्यानंतर पूर्व विदर्भात आमदार अनिल सोले यांच्या नेतृत्वात निघालेल्या वृक्षदिंडीचा समारोप नागपूरमध्ये वनमंत्री यांच्या उपस्थित करण्यात आला. या ठिकाणीदेखील त्यांनी सर्व क्षेत्रातील मान्यवरांनी वृक्षलावडीमध्ये सहभागी होण्याचे आवाहन केले होते. जिल्हयातील प्रत्येक सजग नागरिकाने एक वृक्ष लावावा, असे आवाहन करण्यात आले आहे. आम्ही लावले तुम्ही ही सहभागी व्हा, असे आवाहन वनविभाग प्रत्येक कार्यक्रमात करत आहे. या सर्व आवाहानाला राज्यभर उत्तम प्रतिसाद मिळत असून गृह जिल्हा असणाऱ्या चंद्रपूरमध्येदेखील मोठया प्रमाणात वृक्षलावगड सुरु झाली आहे.पहिल्या सहा दिवसात वनविभागाकडे आलेल्या आकडेवारीनुसार वनविभागाने सहा जुलैपर्यंत १३ लाख ३६ हजार ४७८ वृक्षलागवड केली आहे. त्यापाठोपाठ वनविकास महामंडळाने चार लाख ९ हजार ५३४ वृक्षलागवड केली आहे. चंद्रपूर जिल्हयातील अन्य विभागांमध्ये ग्रामपंचायतीमार्फत दोन लाख ५२ हजार वृक्षलागवड केली आहे. सामाजिक वनीकरण विभागामार्फत एक लाख २४ हजार ३२५ वृक्ष लावले आहेत. तथापि, कृषी विभाग, ग्रामविकास विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग व अन्य काही प्रमुख विभागांनी मोठे उद्दिष्ट घेतले असले तरी सुरुवातीच्या वृक्षलागवडीच्या मोहिमेत त्यांनी गती घेणे आवश्यक आहे. सामान्य नागरिकांनी मात्र मोठया प्रमाणात या काळात वृक्षलागवड केली असून जिल्हा परिषद व महानगरपालिका क्षेत्रातही पुढील आठवडयात मोठया प्रमाणात वृक्षलागडीचे संकेत आहेत.जिल्हयामध्ये मोठया प्रमाणात पाऊस झाल्यामुळे वृक्षलागवडीला गती मिळण्याचे संकेत असून वनविभाग व जिल्हाधिकारी कार्यालयाने संबंधित विभागाच्या उद्दिष्टपूतीर्साठी प्रयत्न सुरु केले आहे.याबाबतचा रोजचा आढावा घेतला जात असून आगामी काळात सामान्य नागरिकांनीदेखील या मोहिमेमध्ये सहभाग घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.सुधीर मुनगंटीवार आज घेणार आढावाराज्याचे वित्त, नियोजन व वनमंत्री तथा चंद्रपूर जिल्हयाचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार हे ८ जुलै रोजी जिल्ह्यातील विविध योजनांच्या बाबत आढावा घेणार आहेत. याशिवाय जिल्ह्यामध्ये गेल्या काळामध्ये राबविण्यात आलेल्या विविध योजनांच्या सादरीकरणाचे आदेशही त्यांनी संबंधित विभागाला दिले आहेत. राज्याच्या विधान सभेचे पावसाळी अधिवेशन नागपूर येथे सुरु असताना शनिवार व रविवार चंद्रपूर येथील विविध विकास कामांचा आढावा घेणे सुरु असून रविवारी नियोजन भवनात दुपारी ४ वाजता विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. अटल विश्वकर्मा सन्मान योजनेंतर्गत बांधकाम कामगारांचे विशेष नोंदणी अभियानाचा शुभारंभ करणार असून पांदणरस्ते योजनेचाही आढावा घेतील. खोज स्पधेर्चे बक्षीस वितरणही त्यांच्या हस्ते होईल.