शहरं
Join us  
Trending Stories
1
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
2
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
3
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
4
Kolkata hotel Fire: कोलकातामधील हॉटेलमध्ये लागली भयंकर आग, १४ जणांचा होरपळून मृत्यू
5
मैसूरच्या उद्योजकाने अमेरिकेत पत्नी आणि मुलाला घातल्या गोळ्या; नंतर स्वतः केली आत्महत्या, एक मुलगा वाचला
6
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
7
पोलिसांचा अघटित घडल्याचा फोन आला अन् आदित्यच्या आई वडिलांनी धावत पळत सोलापूर गाठलं
8
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
9
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
10
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
11
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
12
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
13
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
14
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
15
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
16
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
17
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
18
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
19
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
20
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?

१७५६ थकबाकीदारांचा वीज पुरवठा खंडित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 11, 2019 22:33 IST

महावितरणच्या चंद्रपूर परिमंडळात थकबाकीदारांविरोधात धडक मोहीम राबविण्यात येत आहे. या अंतर्गत जिल्ह्यातील एक हजार ७५३ वीज ग्राहकांच्या घरातील वीज पुरवठा खंडित करण्यात आला आहे. तर ६४२ ग्राहकांनी तत्काळ वीज बिलाचा भरणा केल्यामुळे त्यांचा वीज पुरवठा पूर्ववत सुरू करण्यात आला.

ठळक मुद्देमहावितरणची धडक मोहीम : १२ कोटी ५४ लाखांची थकबाकी

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : महावितरणच्या चंद्रपूर परिमंडळात थकबाकीदारांविरोधात धडक मोहीम राबविण्यात येत आहे. या अंतर्गत जिल्ह्यातील एक हजार ७५३ वीज ग्राहकांच्या घरातील वीज पुरवठा खंडित करण्यात आला आहे. तर ६४२ ग्राहकांनी तत्काळ वीज बिलाचा भरणा केल्यामुळे त्यांचा वीज पुरवठा पूर्ववत सुरू करण्यात आला.महावितरणच्या चंद्रपूर परिमंडळात थकबाकीदारांविरोधात धडक मोहीम राबविण्यात येत असून ग्राहकांनी वीज बिल वेळेत भरून महावितरणला सहकार्य करण्याचे आवाहन महावितरणकडून वारंवार करण्यात येत आहे. वीज बिलांचा भरणा करण्यासाठी महावितरणद्वारा ग्राहकांना आॅनलाईन पेमेंट, मोबाईल अ‍ॅप, एनी टाईम पेमेंट मशीन्स यासारख्या ग्राहकाभिमुख सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या असून ग्राहकांचा प्रतिसादही या सुविधांना चांगल्याप्रकारे लाभत असल्याचे चित्र आहे. परंतु अनेक थकबाकीदारांची थकबाकी साचवून ठेवण्याची सोय महावितरणची डोकेदुखी वाढविणारी आहे.विकल्या गेलेल्या विजेच्या प्रत्येक युनिटची वीज बिलाच्या माध्यमातून वसुली करून परत वीज विकत घेवून प्रामाणिक ग्राहकांना वीजपुरवठा करण्याची जबाबदारी पार पाडताना थकबाकीदारामुळे महावितरणला अडचणीचा सामना करावा लागत आहे. महावितरणच्या चंद्रपूर परिमंडळात घरगुती ग्राहकांकडे १२ कोटी ५४ लाखांच्या घरात थकबाकी पोहोचली आहे तर वाणिज्यिक गाहकांकडे पाच कोटी ८५ लाख रुपये थकित आहे. औद्योगिक ग्राहकांकडे ६४ लाख थकबाकी आहे. चंद्रपूर व गडचिरोली ग्रामीण व शहरी पाणीपुरवठा योजना एक कोटी २६ लाख रुपये थकित आहेत.महावितरणचा कारभार सुरळीत चालण्याकरिता ग्राहकांनी वापरलेल्या प्रत्येक विजेच्या युनिटची वसुली होणे गरजेचे आहे. वीज ग्राहकांकडून वीज बिल विहित मुदतीत वसुल करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.कर्मचाऱ्यांवरही कार्यवाहीवसुलीत निष्काळजीपणा बाळगणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कठोर कार्यवाहीचे निर्देशही देण्यात आले आहेत. त्यामुळे तब्बल एक हजार ७५६ ग्राहकांचा वीज पुरवठा वीज बिल न भरल्यामुळे खंडित केला आहे.वीज पुरवठा खंडित होण्याची वेळ थकबाकीदारांनी आणू नये. त्यापूर्वीच थकबाकीदार ग्राहकांनी थकीत असलेले वीज बिल भरून महावितरणला सहकार्य करावे.-अरविंद भादीकर,मुख्य अभियंता, महावितरण चंद्रपूर.