सुधीर मुनगंटीवार यांचा पुढाकार
चंद्रपूर : माजी वित्तमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रयत्नातून आणखी १५ ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर कोरोना रुग्णांच्या सेवेसाठी वितरित करण्यात आल्याने ही संख्या आता १६७ झाली आहे. यापूर्वी १५२ ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटरचे वितरण त्यांच्या पुढाकारातून करण्यात आले.
कोरोना महामारीचे दुसऱ्या लाटेचे संकट कमी होत आहे. तरीही सावधानी व खबरदारी घेण्याची आवश्यकता आहे. राज्यात तिसरी लाट येण्याची शक्यता वर्तवली जात असताना जिल्ह्यातील आरोग्य सेवा सर्व सोयीसुविधायुक्त व्हाव्यात, यासाठी आ. मुनगंटीवार यांच्या मार्फत सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहे. त्याचाच एक भाग म्हणून
महानगर भाजपच्या वतीने सोमवारी शासकीय विश्रामगृह येथे आयोजित एका कार्यक्रमात ना. नितीन गडकरी यांच्या माध्यमातून व आ. मुनगंटीवार यांच्या प्रयत्नातून प्राप्त झालेल्या १५ ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटरचे लोकार्पण आ. मुनगंटीवार यांच्या हस्ते विविध सेवाभावी संस्थांना करण्यात आले.
यावेळी भाजप महानगर जिल्हाध्यक्ष डॉ. मंगेश गुलवाडे, महापौर राखी कंचर्लावार, उपमहापौर राहुल पावडे, मनपा स्थायी समिती अध्यक्ष रवी आसवानी, माजी आ. ॲड. संजय धोटे, भाजप महामंत्री राजेंद्र गांधी, सुभाष कासनगोट्टूवार, ब्रिजभूषण पाझारे, रवींद्र गुरनुले, कोषाध्यक्ष प्रकाश धारणे, भाजयुमो जिल्हाध्यक्ष विशाल निंबाळकर, प्रशांत विघ्नेश्वर, मंडळ अध्यक्ष सचिन कोतपल्लीवार, विठ्ठलराव डुकरे, रवी लोणकर, संदीप आगलावे, नगरसेवक छबूताई वैरागडे, रामकुमार आकापेल्लीवार आदी उपस्थित होते.