शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

मिनी मंत्रालयात सहा महिन्यांत 149 अधिकारी,कर्मचारी निवृत्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 1, 2022 05:00 IST

पंचायतराज व्यवस्थेत जिल्हा परिषदेची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे. मिनी मंत्रालय समजल्या जाणाऱ्या जि.प. मध्ये आधी पुरेसे मनुष्यबळ नाही. एका अधिकाऱ्याकडे विविध विभागांचा प्रभार असल्याने कुर्मगतीने कारभार सुरू आहे. आगामी सार्वत्रिक निवडणुकीची तारीख अजूनही निश्चित झाली नाही. त्यामुळे प्रशासकराज कालखंडातील कारभार अगदी कोरड्या मनाने चालविले जाते, असा आरोप नागरिकांकडून यापूर्वीही झाला होता. 

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : जिल्हा परिषदेत सध्या प्रशासकराज सुरू आहे. त्यातच नवीन पदभरती बंद असताना मागील सहा महिन्यांत तब्बल १४९ अधिकारी-कर्मचारी निवृत्त झाले होते. बुधवारी पुन्हा ७३ अधिकारी-कर्मचारी नियत वयोमानाने निवृत्त झाल्याने विविध विभागांचा कामकाज चालणार, कसा असा प्रश्न नागरिकांकडून विचारला जात आहे.पंचायतराज व्यवस्थेत जिल्हा परिषदेची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे. मिनी मंत्रालय समजल्या जाणाऱ्या जि.प. मध्ये आधी पुरेसे मनुष्यबळ नाही. एका अधिकाऱ्याकडे विविध विभागांचा प्रभार असल्याने कुर्मगतीने कारभार सुरू आहे. आगामी सार्वत्रिक निवडणुकीची तारीख अजूनही निश्चित झाली नाही. त्यामुळे प्रशासकराज कालखंडातील कारभार अगदी कोरड्या मनाने चालविले जाते, असा आरोप नागरिकांकडून यापूर्वीही झाला होता. अशा परिस्थितीत सहा महिन्यांपूर्वी १४९ अधिकारी- कर्मचारी निवृत्त झाले. बुधवारी पुन्हा विविध विभागांतर्गत व विविध पंचायत समित्यांतर्गत कार्यरत  वर्ग १ ते ४ चे एकूण ७३ अधिकारी- कर्मचारी निवृत्त झाल्याने आकृतीबंधानुसार अनेक पदे रिक्त झाली आहेत.

अधिकारी-कर्मचाऱ्यांना अनुषंगिक लाभासह निरोपजि.प. कर्मचायांना बुधवारी जि.प. कन्नमवार सभागृहात निरोप समारंभ पार पडला.  सेवानिवृत्तीच्या दिवशी अनुषंगिक लाभाचे वितरण करण्यात आले. यावेळी कार्यक्रमाला प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा गौरकार, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (सामान्य) श्याम वाखर्डे,  उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पंचायत) कपिल कलोडे, मुख्य लेखा व वित्त अधिकारी अशोक मातकर, महिला व बालकल्याण विभागाचे जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक संग्राम शिंदे, जिल्हा आरोग्य अधिकारी राजकुमार गहलोत, उपमुख्य लेखा तथा वित्त अधिकारी धर्मराव पेंदाम, उपशिक्षणाधिकारी निकिता ठाकरे उपस्थित होते. सहायक प्रशासन अधिकारी नितीन फुलझेले यांनी संचालन केले. कनिष्ठ प्रशासन अधिकारी विलास मांडवकर यांनी आभार मानले. यांनी केले. कार्यक्रमाला सर्व विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

 

टॅग्स :zpजिल्हा परिषद