घनश्याम नवघडे।लोकमत न्यूज नेटवर्कनागभीड : आदिवासी विकास महामंडळाच्या चिमूर प्रकल्पात यावर्षी २६ आदिवासी सोसायट्यांमार्फत ७ हजार ^६६७ शेतकऱ्यांकडून २ लाख ३ हजार क्विंटल धान खरेदी केले. सदर शेतकऱ्यांना सोमवारपासून १४ कोटी २१ लाख ७७ हजारांचा बोनस वितरण केले जात आहे.चिमूर आदिवासी प्रकल्पात नागभीड, चिमूर, सिंदेवाही, भद्रावती व वरोरा तालुक्यांचा समावेश होतो. मात्र, नागभीड, सिंदेवाही व चिमूर या तालुक्यातच धानाचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर घेतल्या जाते. नोव्हेंबर-डिसेंबर महिन्यात धानाचे पीक शेतकऱ्यांचे हातात येते. त्यानंतर शेतकरी धान विक्रीला सोसायट्यांमध्ये आणतात. शासनाने आदिवासी विविध कार्यकारी सोसायट्यांना खरेदीचे अधिकार दिले. सोसायट्यांकडून हमीभाव १८३५ अधिक ५०० बोनस व सानुग्रह अनुदान २०० रूपये दिला जातो. त्यामुळे शेतकरी व्यापाऱ्यांऐवजी सोसायटीलाच धान विक्री करतात. कृषी उत्पन्न बाजार समितीत धानाचे भाव १ हजार ९०० ते २ हजार १०० रूपयांपर्यंतच मर्यादित राहतो. त्यामुळे बहुसंख्य शेतकऱ्यांनी आदिवासी महामंडळाच्या केंद्रालाच धान विक्री केली आहे. दरामधील ही तफावत लक्षात घेता शेतकऱ्यांनी धान विक्रीसाठी आदिवासी सोसायटी व पणन महासंघाच्या केंद्रांना प्राधान्य दिले. धान खरेदीचे अधिकार असलेल्या आदिवासी विविध कार्यकारी सोसायट्यानंना शेतकऱ्यांचा मोठा प्रतिसाद मिळाल्याने धान कुठे ठेवावे, हा प्रश्न निर्माण झाला होता. शेतकऱ्यांना धानाची देयके मिळाली होती. मात्र बोनसची रक्कम मिळत नसल्याने शेतकऱ्यांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली होती. हा प्रश्न आता निकाली निघाला आहे.आदिवासी विविध कार्यकारी सोसायटीत धान विक्री करणाऱ्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर बोनस रक्कम सोमवारपासून वळती केली जात आहे. त्यासंदर्भात प्रक्रि या पूर्ण करण्यात आली. कुणीही पात्र शेतकरी बोनपासून वंचित राहणार नाही.- जी. आर. राठोड, व्यवस्थापक आदिवासी विकास प्रकल्प, चिमूर
धान विक्रीवर १४ कोटी २१ लाख ७७ हजारांचा बोनस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2020 05:00 IST
चिमूर आदिवासी प्रकल्पात नागभीड, चिमूर, सिंदेवाही, भद्रावती व वरोरा तालुक्यांचा समावेश होतो. मात्र, नागभीड, सिंदेवाही व चिमूर या तालुक्यातच धानाचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर घेतल्या जाते. नोव्हेंबर-डिसेंबर महिन्यात धानाचे पीक शेतकऱ्यांचे हातात येते. त्यानंतर शेतकरी धान विक्रीला सोसायट्यांमध्ये आणतात. शासनाने आदिवासी विविध कार्यकारी सोसायट्यांना खरेदीचे अधिकार दिले.
धान विक्रीवर १४ कोटी २१ लाख ७७ हजारांचा बोनस
ठळक मुद्देवितरणाला सुरूवात : ७ हजार ६६७ शेतकऱ्यांना मिळणार लाभ