शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

चार वर्षांत वाहनधारकांना १.३४ कोटींचा दंड

By admin | Updated: June 22, 2014 23:59 IST

वाहतुकीचे नियम मोडून वाहन चालविणाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारत येथील वाहतूक नियंत्रण शाखेने वाहन मालकांकडून गेलय चार वर्षांत एक कोटी ३४ लाख ९५ हजार ५५० रुपयांचा दंड वसुल केला.

वाहतूक शाखेची कारवाई : पावणेदोन लाख प्रकरणे दाखलसंतोष कुंडकर - चंद्रपूरवाहतुकीचे नियम मोडून वाहन चालविणाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारत येथील वाहतूक नियंत्रण शाखेने वाहन मालकांकडून गेलय चार वर्षांत एक कोटी ३४ लाख ९५ हजार ५५० रुपयांचा दंड वसुल केला. गत चार वर्षांत वाहतुकीचे नियम मोडल्याप्रकरणी एक लाख ८९ हजार ४५ प्रकरणे दाखल करण्यात आली आहेत. प्रत्येकाने वाहतुकीचे नियम पाळावे, कायद्याचे कठोर पालन करावे, असा संकेत असताना अनेकजण नियम मोडून वाहने चालवितात. त्यातून अपघातासारख्या दुर्दैवी घटना घडतात. हे अपघात टाळण्यासाठी वाहनधारकांनी शिस्त पाळावी, असा संकेत आहे. मात्र ही शिस्त मोडून वाहन चालविण्याचा प्रकार अलिकडे शहरात मोठ्या प्रमाणावर वाढीस लागला आहे. याविरुद्ध पोलिसांच्या वाहतूक शाखेने कारवाई केली. त्यात गेल्या चार वर्षांमध्ये एक लाख ८९ हजार ४५ केसेस दाखल करण्यात आल्या. तसेच संबंधित वाहन मालकांकडून एक कोटी ३४ लाख ९५ हजार रुपयांचा दंड वसुल केला. सन २०११ मध्ये वाहतूक पोलिसांनी नियम मोडणाऱ्या वाहतुकदारांविरुद्ध २१ हजार ५०६ प्रकरणे दाखल केली. त्या माध्यमातून त्यांच्याकडून ३० लाख ५१ हजार २०० रुपयांचा दंड वसुल केला. सन २०१२ मध्ये ३५ हजार ७६९ प्रकरणे दाखल करण्यात आलीत. त्या माध्यमातून ४३ लाख ५३ हजार ५०० रुपयांचा दंड वाहतूक पोलिसांनी वसुल केला. सन २०१३ मध्ये ३५ हजार ७६९ प्रकरणे दाखल करण्यात आलीत. त्या माध्यमातून ४३ लाख ५३ हजार ५०० रुपयांचा दंड वसुल करण्यात आला. मे २०१४ पर्यंत वाहतूक पोलिसांनी १५ हजार ९०१ प्रकरणे दाखल केलीत. त्यामाध्यमातून १७ लाख ३७ हजार ३५० रुपयांचा दंड पोलिसांनी वसुल केला. यासोबतच १ जानेवारी ते ३० एप्रिलपर्यंत चंद्रपूरसहजिल्ह्यातील राजुरा, गडचांदूर, वरोरा, ब्रह्मपुरी, मूल या पोलीस ठाण्याअंतर्गत अवैध प्रवासी वाहतूक, जडवाहतूक व अन्य प्रकरणात २१ हजार ७३८ प्रकरणे दाखल करून वाहतूक पोलिसांनी ३६ लाख ४७ हजार ६५० रुपयांचा दंड वसुल केला. ही कारवाई आणखी तीव्र करण्यात येईल, असे वाहतूक निरीक्षक पुंडलिक सपकाळे यांनी सांगितले.