शहरं
Join us  
Trending Stories
1
Asrani Death: 'अंग्रेजों के जमाने का जेलर' काळाच्या पडद्याआड; ज्येष्ठ अभिनेते असरानी यांचे निधन
2
"आमदाराला कापा बोललो तर राग येतो, रोज शेतकरी मरतोय त्याचा राग का येत नाही?"; बच्चू कडू आक्रमक
3
चीनवर लावलेले १०० टक्के टॅरिफ अमेरिका कमी करणार?; ट्रम्प यांनी शी जिनपिंग यांच्यासमोर ठेवली अट
4
भारताचा 'छोटा पॅकेट' पुन्हा करणार 'बडा धमाका'! वैभव सूर्यवंशी आता 'या' स्पर्धेत खेळणार...
5
पुतिन-ट्रम्प यांच्या मोठी बैठक होणार; युक्रेनचे झेलेन्स्की म्हणतात- "मीही यायला तयार पण..."
6
ODI Cricket Record: चामारी अटापट्टूचा मोठा विक्रम; देशासाठी 'अशी' कामगिरी करणारी पहिलीच!
7
बिहारमध्ये महाआघाडीला आणखी एक धक्का, मित्रपक्षाची निवडणुकीतून माघार, आरजेडी- काँग्रेसवर केले गंभीर आरोप 
8
उपोषणकर्त्याला घरी का बोलवलं? संजय शिरसाट म्हणाले, "माझा आणि त्याचा प्रवासाचा वेळ सारखा होता"
9
"विरोधकांच्या ‘लवंग्या-सुरसुरी’चा धुरळा, महायुतीचा ‘ॲटम बॉम्ब’ फुटला की..."; एकनाथ शिंदेंचा इशारा
10
LPG घेऊन जाणाऱ्या जहाजावर भीषण स्फोट; 23 भारतीयांना वाचवले, 2 बेपत्ता
11
Kawasaki: कावासाकीनं लॉन्च केली खतरनाक बाइक; किंमत महिंद्रा थारपेक्षाही जास्त!
12
21 वर्षे जुन्या दरोडा प्रकरणात RJD उमेदवाराला अटक; अर्ज दाखल करताच पोलिसांनी घेतले ताब्यात
13
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामय्या यांच्या कार्यक्रमात १० जण पडले आजारी, समोर आलं असं कारण
14
पुतण्याच्या प्रेमात आंधळी झाली दोन मुलांची आई; पोलीस ठाण्यातच कापली हाताची नस!
15
दिवाळीनिमित्त राहुल गांधी पोहोचले मिठाईच्या दुकानात, स्वत: बनवली इमरती आणि बेसनाचे लाडू
16
भोजपुरी स्टार पवन सिंहची पत्नी ज्योती यांनी भरला नामांकन अर्ज, कुठल्या पक्षाकडून लढणार?
17
EDला सापडले २५० पासपोर्ट, ७ पाकिस्तानी नागरिकांचा शोध सुरू, बंगाल कनेक्शन समोर   
18
"गेल्या १० वर्षात साबणाला हातही लावला नाही"; बॉलिवूड अभिनेत्रीने सांगितलं 'बाथरूम सीक्रेट'
19
१५ वर्षांनी लहान पुतण्यावर जडला २ मुलांच्या आईचा जीव; नकार देताच पोलिसांसमोर भयंकर कृत्य
20
दिवाळीच्या फटाक्यांमुळे कार किंवा बाइकला आग लागली तर इन्शुरन्स क्लेम करू शकता का? जाणून घ्या

चंद्रपुरातील 1320 पूरग्रस्तांनी घेतला मनपा शाळांचा आश्रय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 16, 2022 05:00 IST

सध्या पाऊस थांबला; पण पूर ओसरला नाही. १ हजार ३२० पूरग्रस्तांना अजूनही शाळेतच थांबविण्यात आले. पूर ओसरलेल्या भागांत संभाव्य डेंग्यू व इतर कीटकजन्य रोगांची साथ पसरण्याची शक्यता असल्याने प्रतिबंधासाठी मनपाने डासोत्पत्ती स्थाने तपासणी मोहीम सुरू केली. ब्रीडिंग चेकर्समार्फत सातत्याने पूरग्रस्त परिसरात तपासणी केली जात आहे. चंद्रपूर महानगरपालिकेमार्फत स्वच्छता, आरोग्य तपासणी मोहिमेस सुरुवात करण्यात आली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर :  पाणी घरात येईल, असे वाटतच नव्हते. त्यामुळे आम्ही रात्रभर जागे होतो. घरातील सामानही बाहेर काढले नाही. मात्र, काही कळायच्या आतच पाणी शिरले आणि होत्याचे नव्हते झाले. सारे सामान भिजले. केवळ अंगावरच्या कपड्यांसह सुरक्षित स्थळ शोधावे लागले, अशी व्यथा चंद्रपुरातील पूरबाधित नागरिकांनी शुक्रवारी व्यथा मांडली. शहरातील बहुतांश परिसरातील नागरिकांची अशीच स्थिती होती. पूर केव्हा उतरेल, हे काही सांगता येत नाही. त्यामुळे सध्या तरी अशा १३२०  कुटुंबांना मनपाच्या शाळांचाच आश्रय घेऊन दिवस ढकलत आहेत.सध्या पाऊस थांबला; पण पूर ओसरला नाही. १ हजार ३२० पूरग्रस्तांना अजूनही शाळेतच थांबविण्यात आले. पूर ओसरलेल्या भागांत संभाव्य डेंग्यू व इतर कीटकजन्य रोगांची साथ पसरण्याची शक्यता असल्याने प्रतिबंधासाठी मनपाने डासोत्पत्ती स्थाने तपासणी मोहीम सुरू केली. ब्रीडिंग चेकर्समार्फत सातत्याने पूरग्रस्त परिसरात तपासणी केली जात आहे.चंद्रपूर महानगरपालिकेमार्फत स्वच्छता, आरोग्य तपासणी मोहिमेस सुरुवात करण्यात आली आहे. ज्या ठिकाणी पूरपरिस्थिती उद्भवली, अशा सर्व परिसरात ब्लिचिंग टाकून फॉगिंग केले जात आहे. नाल्यांवर फवारणी केली जात आहे. बांधकाम विभागामार्फत नाली कवर व इतर धोकादायक खड्डे यांची तपासणी करून भरण टाकल्या जात आहे. यांत्रिकी विभागामार्फत आवश्यकतेनुसार पिण्याचे पाणी टँकर पुरविणे सुरू झाले. खबरदारी म्हणून महानगरपालिका शाळा, तसेच इतर ठिकाणी असलेल्या १३२० पूरग्रस्तांना शाळेतच थांबविण्यात आले आहे. आयुक्त राजेश मोहिते व अतिरिक्त आयुक्त विपीन पालीवाल यांच्या मार्गदर्शनात चंद्रपूर महानगरपालिकेचे सर्व अधिकारी, कर्मचारी कार्यरत असून संभाव्य परिस्थितीसाठी सज्ज आहेत. पाणी वाढतच असल्याने आपत्ती व्यवस्थापन पथक तैनात केले.

१९ वसाहतींमध्ये पुराचे पाणीसध्या पाऊस थांबला. मात्र, इरईचे धरणाचे सर्व दरवाजे एक मीटरने उडण्यात आले. त्यामुळे इरई नदीची पूरस्थिती जैसे थे आहे. रहमत नगर, सिस्टर कॉलनी, ठक्कर कॉलनी, आंबेडकर भवन परिसर वडगाव, राजनगर, राष्ट्रवादी नगर, तुलसी नगर, ठक्कर कॉलनी, दादमहल, दाताळा पूल परिसर, पठाणपुरा गेट, हवेली गार्डन, विठ्ठल मंदिर वाॅर्ड, झरपट नदी, महाकाली वाॅर्ड, शक्तीनगर, दुर्गापूर परिरातील पुराचे पाणी कमी झाले नाही. 

जिल्हा प्रशासनाचा नागरिकांना इशारामुसळधार पावसाने थोडी उसंत दिली. मात्र, विभागीय हवामान विभागाने पावसाची शक्यता वर्तविली. त्यामुळे नागरिकांनी सावध राहावे. गोसेखुर्द धरणाचे पाणी वैनगंगा नदीला सोडल्याने पूर आला. इकडे वर्धा नदीला पूर असल्याने पाणी नदीच्या दिशेने पसरण्याची शक्यता आहे. इरई नदी काठालगत असल्याने नागरिकांनी काळजी घ्यावी. पूर ओसरेपर्यंत कुणीही त्या परिसरात जाऊ नये, असे आवाहन प्रशासनाने केले आहे. 

 

टॅग्स :Rainपाऊसfloodपूर