घरावर धाड : पोलिसांनी दोघांना केली अटक वरोरा : क्रिकेट सामन्यावर सट्टा खेळणाऱ्या दोन व्यक्तींना वरोरा पोलिसांच्या डीबी पथकाने ताब्यात घेतले आहे. त्याच्याकडून १ लाख २४ हजार रुपयांचे साहित्य जप्त करण्यात आले.वरोरा शहरातील सरदार पटेल वॉर्डातील एका घरात मागील काही दिवसापासून क्रिकेट सामन्यावर सट्टा होत असल्याची माहिती वरोरा पोलिसांच्या डीबी पथकास मिळाली. १० सप्टेंबर रोजी रात्री या ठिकाणी धाड टाकली असता प्रसेन भरत मुनगेलवार (३१) रा. मोहता अपार्टमेंट, गंजवार्ड, चंद्रपूर व प्रेम अशोक बावणे (३८) रा. जलनगर वार्ड, चंद्रपूर यांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून १३ मोबाईल, हॉटलाईन मशिन, एक लँडलाईन फोन क्रमांक लिहलेला कागद असा १ लाख २४ हजार १० रुपयाचा ऐवज जप्त केला आहे. ताब्यात असलेल्या दोघांवर जुगार अॅक्ट नुसार गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली. ही कारवाई पोलीस निरीक्षक विलास चव्हाण यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक मनीष दुबे, अशोक ढोक, मदन येरणे, निखिल कौरासे, सचिन साठे, श्रीकांत मागोसे आदींनी केली. (तालुका प्रतिनिधी)
१.२४ लाखाचे क्रिकेटसट्टा साहित्य जप्त
By admin | Updated: September 12, 2016 00:43 IST