पोलिसांची २७२ पदे : तरुणांची खाकीसाठी झुंजचंद्रपूर : पोलीस शिपाई पदासाठी भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. चंद्रपूर जिल्ह्यात २७२ पदांकरिता पोलीस मुख्यालय येथे भरती घेण्यात येत आहे. यासाठी तब्बल १२ हजार ७00 उमेदवारांची अर्ज दाखल केले आहेत. एका जागेमागे ४७ उमेदवार आहेत.पुरुष उमेदवारांकरिता सहा किलोमीटर अंतर धावण्याची व महिला उमेदवारांकरिता तीन किलोमीटर अंतर पायदळ चालण्याची चाचणी परीक्षा २५ जूनपर्यंत म्हाडा वसाहत, नवीन चंद्रपूर येथे घेण्यात येणार आहे. त्यामुळे घुग्घुसकडून एम.आय.डी.सी.मार्गे चंद्रपूरकडे येणार्या व दाताळा मार्गे, घुग्घुस, नागपूरकडे जाणार्या सर्व प्रकारच्या वाहनांकरिता मार्ग बंद करण्यात आला आहे. प्रत्येक दिवशी एक हजार उमेदवाराची शारीरिक चाचणी घेण्यात येणार आहे. पहिल्या दिवशी एक हजार उमेदवारांच्या कागदपत्रांची तपासणी, नोंदणी, छाती, उंचीचे मोजमाप घेण्यात आले. पैसे मागणार्या दलालांपासून सावध राहावे, अशी विनंती जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. राजीव जैन यांनी केली आहे. (नगर प्रतिनिधी)
पोलीस भरतीसाठी १२ हजार ७00 उमेदवार
By admin | Updated: June 7, 2014 23:52 IST