३० कोटी खर्च करून जिल्ह्यात १२ शाळा होणार हायटेक

By साईनाथ कुचनकार | Published: May 13, 2024 05:57 PM2024-05-13T17:57:26+5:302024-05-13T17:57:48+5:30

Chandrapur : १०१ वर्गखोल्यांसाठी २० कोटींचा निधी; खनिज विकास निधीतून होणार बांधकाम

12 schools will be hi-tech in the district by spending 30 crores | ३० कोटी खर्च करून जिल्ह्यात १२ शाळा होणार हायटेक

12 schools will be hi-tech in the district by spending 30 crores

लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर :
जिल्हा परिषद शाळांतील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळावे, इंग्रजी शाळांच्या तुलनेमध्ये या शाळांचे विद्यार्थी कुठेही मागे पडू नये यासाठी प्रशासकीय स्तरावर सातत्याने प्रयत्न केले जात आहे. दरम्यान, आता जिल्ह्यातील १२ शाळांना आदर्श शाळा म्हणून तयार करण्यात येणार आहे. यासाठी तब्बल ३० कोटी १३ लक्ष रुपयांचा खर्च केला जाणार आहे. सोबतच विविध गावांतील १०१ वर्गखोल्यांचेही बांधकाम करण्यात येणार आहे. यासाठी २० लाख ३५ हजार रुपये खर्च केले जाणार आहे. या शाळांसाठी जिल्हा खनिज विकास निधी अंतर्गत निधी खर्च केला जाणार आहे. या निधीमुळे जिल्हा परिषद शाळाही इंग्रजी शाळांच्या धर्तीवर हायटेक होणार असून विद्यार्थ्यांना अधिकाधिक दर्जेदार सुविधा मिळणार आहे.


शाळांमध्ये दर्जेदार सुविधा
जिल्ह्यातील शाळांमध्ये १०१ वर्गखोल्यांचे बांधकाम करण्यात येणार आहे. यामध्ये २० लाख ३५ हजार रुपयांचा खर्च केला जाणार आहे. या वर्गखोल्या अत्याधुनिक पद्धतीने बांधण्यात येणार आहेत.

जटपुरा कन्या शाळेचा विसर
चंद्रपूर शहरातील जटपुरा गेट परिसरात जिल्हा परिषद अंतर्गत जटपुरा गेट कन्या शाळा आहे. ही शाळा स्वातंत्र्यपूर्व काळापासून आहे. या शाळेतून अनेक विद्यार्थ्यांनी शिक्षण घेतले आहे. मात्र सध्या या शाळेची इमारत मोडकळीस आली आहे. त्यामुळे या शाळेतील विद्यार्थी ज्युबिली हायस्कूलमध्ये शिक्षण घेत आहे. जिल्हा परिषद प्रशासनाने जटपुरा गेट परिसरातील या शाळेचीही दुरुस्ती करून पुन्हा ही शाळा भरवावी, अशी मागणीही सामाजिक कार्यकर्त्यांकडून सातत्याने केली जात आहे.


या शाळांचा आदर्श शाळा म्हणून होणार विकास आणि त्यांना देण्यात आलेला निधी 

जि. प. प्राथमिक व उच्च प्राथमिक शाळा, पेंढरी कोके - २ कोटी २९ लक्ष
जि. प. प्राथमिक व उच्च जि. प. प्राथमिक शाळा , निमगाव -   २ कोटी ६५ लक्ष
जि. प. प्राथमिक व उच्च प्राथमिक. शाळा, चिखली - २ कोटी १४ लक्ष
जि. प. प्राथमिक व उच्च प्राथमिक शाळा, देवाडा बु. - २ कोटी १४ लक्ष
जि. प. प्राथमिक व उच्च प्राथमिक शाळा, मानोरा -  २ कोटी २९ लक्ष
जि. प. प्राथमिक व उच्च प्राथमिक शाळा, मोरवा - १ कोटी ७४ लक्ष
जि.प. हायस्कूल विहीरगाव - ४ कोटी ४० लक्ष
जि.प. प्राथमिक व उच्च प्राथमिक शाळा विठ्ठलवाडा - १ कोटी ९९ लक्ष
जि.प. प्राथमिक व उच्च प्राथमिक शाळा शेणगाव - ३ कोटी ४९ लक्ष
जि. प. प्राथमिक व उच्च प्राथमिक शाळा, मेंडकी - २ कोटी ७ लक्ष                                
जि. प. प्राथमिक व उच्च प्राथमिक शाळा, नवताळा - २ कोटी १४ लक्ष
जि.प. हायस्कूल भद्रावती भद्रावती - २ कोटी ७४ लक्ष


वर्गखोल्यांचे १०१ होणार बांधकाम
■ खनिज विकास निधीतून वीस कोटी ३५ हजार रुपये खर्च करून जिल्ह्यातील पंधराही तालुक्यांतील विविध गावांतील १०१ वर्गखोल्यांचे बांधकाम करण्यात येणार आहे. यामध्ये चंद्रपूर तालुक्यातील आठ, भद्रावती तालुक्यातील पाच, वरोरा तालुक्यातील तीन, राजुरा तालुक्यातील चार, चिमूरमधील सहा, कोरपना तालुक्यातील पाच, नागभीडमधील चार, पोंभुर्णा तालुक्यातील पाच, जिवतीमधील आठ, मूल पाच, सिंदेवाही चार, सावली पाच, बल्लारपूर तालुक्यातील सहा, गोंडपिपरी तीन, तर ब्रह्मपुरी तालुक्यातील दोन गावांतील शाळांच्या वर्गखोल्या बांधण्यात येणार आहेत.

Web Title: 12 schools will be hi-tech in the district by spending 30 crores

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.