शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

११ धरणांतील पाण्याची पातळी खालावली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2018 00:30 IST

यंदा अल्प पाऊस पडल्याने नैसर्गिक जलसाठे पूर्णत: भरले नाहीत. उन्हाची लाहीलाही वाढत असतानाच जिल्ह्यातील ११ जलाशयांमध्ये पाण्याची पातळी खालावली.

ठळक मुद्देकृषी सिंचनावर होणार अनिष्ट परिणाम : जलसकंटाची वाढणार तीव्रता

आॅनलाईन लोकमतचंद्रपूर : यंदा अल्प पाऊस पडल्याने नैसर्गिक जलसाठे पूर्णत: भरले नाहीत. उन्हाची लाहीलाही वाढत असतानाच जिल्ह्यातील ११ जलाशयांमध्ये पाण्याची पातळी खालावली. त्यामुळे कृषी सिंचनावर अनिष्ट परिणाम होण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. धरणातील उपयुक्त साठा लक्षात घेतल्यास मागील वर्षीच्या तुलनेत यंदा ३५ टक्के घट झाली आहे.अल्प पावसामुळे जलसाठे भरले नाही. नाले व गावतलावांमध्ये खरीप तसेच रब्बी हंगामामध्ये शेतकºयांना पुरेसे पाणी मिळाले नाही. त्यामुळे पिकांना जोरदार फटका बसला आहे. शेतातील विंधन विहीरी व तलाव आटण्याच्या स्थितीत आहेत. पाटबंधारे विभागाच्या माहितीनुसार दिवसेंदिवस जलाशयात मोठी घट होत आहे. आसोला मेंढा, घोडाझरी, नलेश्वर, चंदई, चारगाव, अमलनाला, लभानसराड, पकडीगुड्डम, डोंगरगाव, इरई, लालनाला आदी ११ धरणांमधील जलसाठ्यात कमालीची घट झाली. त्यामुळे सिंचनासाठी सोडण्यात येणाºया वेळापत्रकातही फेरबदलाच्या हालचाली आहेत. गतवर्षी मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यात आसोला मेंढा तलावात १९.५ टक्के जलसाठा उपलब्ध होता. सद्यस्थितीत जलसाठा खालावल्याने शेतकºयांना सिंचनासाठी पुरसे पाणी मिळत नाही. घोडाझरी, नलेश्वर व चारगाव या धरणांची हीच स्थिती आहे. पकडीगुड्डम, डोंगरगाव, इरई धरणातही पुरसे पाणी नसल्याने एप्रिल ते जून महिन्यादरम्यान पिण्याच्या पाण्याची भीषण समस्या निर्माण होणार आहे. जिल्ह्यातील ११ धरण क्षेत्रातील शेकडो हेक्टर जमिनीला पाण्याचा लाभ होतो. धरणातील जलसाठा लक्षात घेवूनच बहुतेक शेतकरी पिकाचे नियोजन करतात. खरीप व रब्बी हंगामात शेतीसाठी पाणी मिळेल या खात्रीने शेतकºयांनी विविध शासकीय योजनांचा लाभ घेतला. शिवाय, जिल्हा मध्यवर्ती बँक आणि राष्टÑीय बँकांकडून पीककर्ज घेतले. परंतु, पुरसे पाणी मिळत नसल्याने अपेक्षीत उत्पादनाची शक्यता मावळली आहे. इरई धरणातील पाणी चंद्रपूर शहरासाठी पिण्याकरिता वापरले जाते. मनपाने स्वत:चे स्त्रोत निर्माण केले नाही. अशा कठीण परिस्थितीत जलसाठ्यात दिवसेंदिवस घट होत असल्याने शहरातील पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. जिल्ह्यातील सिंचन क्षेत्र कमी असल्याने खरीप पिकांचे प्रचंड नुकसान झाले होते. आता धरणातील पाण्याने तळ गाठल्याने रब्बी पीक हाती येणार की नाही, ही प्रश्नच आहे.शेतीवर अन्याय करु नकाधरणातील जलसाठा दररोज कमी होत असल्याने शेतीच्या सिंचनासाठी पाणी मिळेल की नाही, अशी भिती शेतकरी व्यक्त करीत आहे. सध्या रब्बी हंगामातील पिके शेतात उभी आहेत. पुरेसे पाणी मिळाले नाही तर पीक हातचे जाऊ शकते. त्यामुळे पाटबंधारे विभागाने शेतकºयांची समस्या लक्षात घेवून पाणी वाटपाच्या वेळापत्रकात अन्यायकारक बदल करु नये, अशी मागणी जिल्ह्यातील शेकडो शेतकºयांनी केली आहे.दूरदृष्टीअभावी जलसंकट कायमयंदा पावसाने सतत दडी मारल्याने धरणांमध्ये अत्यल्प जलसाठा आहे. मार्च ते जून या चार महिन्यात जिल्ह्यातील ११ धरणांतील पाणी पुन्हा तळाला जावू शकते. पावसाळा सुरू होण्यापूर्वीच काही धरणातील कालव्याची दुरुस्ती झाली नव्हती. त्यामुळे बरेच पाणी वाहून गेले. जलसिंचनाची दूरदृष्टी व नियोजनाअभावी जलसाठा कायम ठेवण्यास अपयश आले. त्यामुळे संबंधीत अधिकाºयांनी संभाव्य जलसंकट लक्षात घेवून तातडीने नियोजन करणे गरजेचे आहे.बोरवेल दुरस्ती मोहीम कासव गतीनेजिल्ह्यातील १५ तालुक्यांमध्ये फेब्रुवारी २०११ पर्यंत १४९ विंधन विहीरी, १६ कुपनलिका आणि १६४ हातपंप बसविण्यात आले. दरम्यान, पाण्याची पातळी खालावल्याने शेकडो बोरवेल्स बिनकामी ठरले. विंधन विहीरीतही पुरेसे पाणी नाही. त्यामुळे किमान बोरवेल्स दुरुस्ती करावी तसेच टँकरने पाणी पुरवठा करावी, अशी मागणी होत आहे.रब्बी पिके वाया जाण्याच्या मार्गावरशेतातील विहिरींमध्ये पुरेसे पाणी नाही. शिवाय, धरणातील पाण्याचा लाभ घेणाºया शेतकºयांना आवश्यकतेनुसार पाणीच मिळत नसल्याने रब्बी पिके वाया जाण्याच्या मार्गावर आहेत. लागवडीचा खर्चही निघाला नाही तर जगायचे कसे, हा प्रश्न शेतकºयांना भेडसावू लागला आहे.