शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
5
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
6
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
7
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
8
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
9
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
10
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
11
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
12
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
13
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
14
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
15
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
16
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
17
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
18
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
19
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
20
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
Daily Top 2Weekly Top 5

सांबराचे मांस शिजवतानाच 'त्या' ११ जणांना उचलले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 18, 2022 15:59 IST

जंगल परिसरातील मदनापूर तलाव क्षेत्रात पाळीव कुत्र्याच्या साहायाने सांभरची शिकार करून मांस गावात आणून विक्री करण्याचा बेत काही जणांचा असल्याची माहिती वाईल्ड लाईफ प्रोटेक्शन सोसायटी व स्थानिक वन्यजीव प्रेमींना मिळाली.

ठळक मुद्देपिंपळगाव येथे सांभरची शिकार : वनविभागाची कारवाई

शंकरपूर (चंद्रपूर) : येथून जवळच असलेल्या पिंपळगाव येथे वन्यजीव सांभरची शिकार करून मांस विकताना ११ जणांना सोमवारी दुपारी वनविभागाने ताब्यात घेतले. त्यांच्याकडून तीन किलो शिजवलेले मांस, तीन किलो कच्चे मांस, चामडे, डोके, पाय, सत्तूर, कुऱ्हाड, विळा आदी साहित्य जप्त करण्यात आले.

अरविंद तुकाराम ननावरे, निखिल महादेव जीवतोडे, अवचित सुभाष बारेकर, राजू घुग्घुसकर, रूपेश धारणे, एकनाथ बारेकर, सूरज हरी घरत, अभिषेक चंद्रभान नन्नावरे, नवतळा येथील शंकर मसराम, राजू वाढई, रामू राजेराम कुमरे असे ताब्यात घेतलेल्या व्यक्तींची नावे आहेत.

शंकरपूर येथून जवळच असलेल्या पिंपळगाव नवतळा येथे जंगल लागून आहे. या जंगल परिसरातील मदनापूर तलाव क्षेत्रात पाळीव कुत्र्याच्या साहायाने सांभरची शिकार करून मांस गावात आणून विक्री करण्याचा बेत काही जणांचा असल्याची माहिती वाईल्ड लाईफ प्रोटेक्शन सोसायटी व स्थानिक वन्यजीव प्रेमींना मिळाली. त्यांनी वनविभागाला माहिती दिली. त्या माहितीच्या आधारावर नवतळा येथील शंकर मेश्राम यांच्या घरी धाड टाकली असता, सांबरचे मांस चुलीवर शिजविताना आढळून आले.

ते संपूर्ण मांस जप्त करून त्याला ताब्यात घेतले. यावेळी त्याने मुख्य आरोपी पिंपळगाव येथील असल्याचे सांगितले. त्याच्या घरी धाड मारली असता, त्याठिकाणी तीन किलो शिजवलेले मांस, तीन किलो कच्चे मांस, चामडे, डोके, पाय, सत्तूर, कुऱ्हाड, विळा आदी साहित्य आढळून आले. ते सर्व साहित्य जप्त करण्यात आले. पुढील कारवाई वनपरिक्षेत्र अधिकारी नैताम यांच्या मार्गदर्शनाखाली वनक्षेत्र अधिकारी यू. बी. लोखंडे, नैताम वनरक्षक सोनुले, प्रदीप ढोणे करीत आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी