शहरं
Join us  
Trending Stories
1
तुमच्या आकांसमोर झुकू नका, सॅलरी कापणार नाहीत; सुप्रीम कोर्टाने केली IPS अधिकाऱ्याची कानउघडणी
2
चुकीचा निवडणूक डेटा पोस्ट करणं संजय कुमारांना भोवलं; महाराष्ट्र निवडणूक आयोगाची मोठी कारवाई
3
वासनांध भोंदूबाबाचा प्रताप, महिलेसोबत अश्लील कृत्य; तंत्रमंत्राने कुटुंबियांना भस्म करण्याची धमकी
4
पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी
5
राजधानी दिल्ली तिहेरी हत्याकांडानं हादरली; एकाच घरात ३ मृतदेह सापडले, कारण समजताच पोलीस हैराण
6
ODI Rankings मध्ये गडबड घोटाळा! ICC चा रिव्ह्यू अन् टॉप ५ मध्ये पुन्हा झळकलं रोहित-विराटचं नाव
7
अमेरिकेत ५ तास थांबणे व्लादिमीर पुतिन यांना महागात पडले! डोनाल्ड ट्रम्प यांनी २.२ कोटी आकारले; नेमके प्रकरण काय?
8
खराब अन् खड्डेमय रस्त्यांसाठी टोल घेणे योग्य नाही; सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय
9
रुग्णालयाने भरती करण्यास दिला नकार, 12 वर्षाच्या मुलाने बापाच्या खांद्यावरच सोडला जीव
10
जिओ वापरकर्त्यांसाठी वाईट बातमी! दररोज १.५ जीबी डेटासह ८४ दिवसांचा प्लॅन बंद
11
'मी अटक होण्यापूर्वीच राजीनामा दिला होता', अमित शाहांनी सोडलं मौन; वादाचा मुद्दा काय?
12
थयथयाट होणार! रशियाने भारताला कच्च्या तेलावर ५ टक्के सूट सुरुच ठेवली; पुतीन ट्रम्पना भेटून येताच...
13
एरिया मॅनेजरचा पराक्रम! टारगेट पूर्ण करण्यासाठी रेव्ह पार्टी दिली, ३७ जणांना अडकवलं अन्...
14
'ऑनलाइन गेमिंग विधेयक' लोकसभेत मंजूर; Online Games खेळणाऱ्यांसाठी काय आहे शिक्षेची तरतूद?
15
'मोठा धक्का बसला, पण आता...', हल्ल्यानंतर मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांची पहिली प्रतिक्रिया
16
'रॅपिडो'ला जबर झटका! १० लाखांचा दंड, ग्राहकांना पैसे करण्याचे कंपनीला आदेश; प्रकरण काय?
17
महाराष्ट्रातील कोणकोणत्या टोल नाक्यांवर चालणार ३ हजार रूपयांचा वार्षिक FASTag पास? वाचा यादी
18
लोकसभेत मोठा गोंधळ, विरोधकांनी फाडले विधेयक; कागद अमित शाहांच्या दिशेने भिरकावले, काय घडलं?
19
ऑनलाईन दरोडा! दरवर्षी ४५ कोटी भारतीय गमावताहेत २० हजार कोटी रुपये
20
धाडसाला सलाम; पती आणि मुलाचा जीव वाचवण्यासाठी मगरीशी लढल्या, गावातून कौतुकाचा वर्षाव

१०३ गावांचे जलस्त्रोत दूषित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 10, 2018 23:14 IST

आरोग्य विभागाने केलेल्या तपासणीत जिल्ह्यातील तब्बल १०३ गावातील जलस्त्रोत दूषित असल्याची धक्कादायक बाब पुढे आली आहे. यानंतर नागरिकांनी खबरदारी घेण्याचे आवाहन जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने केले आहे.

ठळक मुद्देआरोग्य विभागाचा अहवाल : दूषित पाण्याची टक्केवारी ११.९२

मंगेश भांडेकर ।लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : आरोग्य विभागाने केलेल्या तपासणीत जिल्ह्यातील तब्बल १०३ गावातील जलस्त्रोत दूषित असल्याची धक्कादायक बाब पुढे आली आहे. यानंतर नागरिकांनी खबरदारी घेण्याचे आवाहन जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने केले आहे.जिल्हा परिषद आरोग्य विभागामार्फत दरवर्षी ग्रामीण व शहरी भागातील पाणी नमुन्यांची तपासणी केली जाते. ज्या गावातील पाणी नमुने दूषित आढळतात, त्या ग्रामपंचायतींना पत्र देऊन साथरोग टाळण्यासाठी उपाययोजना सुचविल्या जातात. तसेच दूषित पाण्याच्या प्रमाणात वाढ होणार नाही, यासाठी खबरदारी घेतली जाते. यावर्षी पावसाळा सुरू होताच आरोग्य विभागाने जून महिन्यात जिल्ह्यातील ३९ आरोग्य केंद्रामार्फत १ हजार ९३१ तर शहरी विभागातील ५७७ अशा २ हजार ५०८ पाणी नमुन्यांची तपासणी करण्यात आली. यात ग्रामीण विभागात १०३ गावातील २३६ व शहरी विभागातील ६३ असे २९९ पाणी नमुने दूषित असल्याचे निष्पन्न झाले आहेत. याची टक्केवारी ११.९२ एवढी आहे.पावसामुळे दूषित पाणी वाहून आल्याने जलजन्य साथरोगांचा प्रादूर्भाव मोठ्या प्रमाणात होत असतो. अशा परिस्थितीत नागरिकांनी पाणी शुद्ध करुनच प्यावे, आठवड्यातून एक दिवस कोरडा दिवस पाळावा, परिसर स्वच्छ ठेवावे, असे आवाहन जिल्हा परिषद प्रशासनाने केले आहे.मात्र ज्या गावात पाणी शुद्धीकरणासाठी कोणते यंत्रच उपलब्ध नाही, अशा गावातील नागरिकांना उपलब्ध पाणी स्त्रोतावरच आपली तहान भागवावी लागत आहे. जिवती तालुक्यातील अनेक गावांपर्यंत जिल्हा परिषदेची पाणी पुरवठा योजनाच पोहचली नसल्यामुळे खड्डा खोदून त्यातील पाणी पिण्यासाठी वापरावे लागत आहे. याचीही तपासणीही करण्याची गरज आहे.या गावांमधील पाणी दूषितचंद्रपूर तालुक्यातील लोहारा, मामला, हळदी, नुदूर, पिंपळखुट, वायगाव, निंबाळा, चोरगाव, ऊर्जानगर, वडा, धानोरा, पिपरी, उसगाव, सिदूर, मारडा, नकोडा, बल्लारपूर तालुक्यातील विसापूर, कळमना, कोर्टीमक्ता, जुनीदहेली, नवीदहेली, कवडजई, पळसगाव, वरोेरा तालुक्यातील वडगाव, जामगाव, बारव्हा, फत्तापूर, पिंपळगाव, मेसा, भद्रावती तालुक्यातील चेकबंराज, पिपरबोडी, पावना रै, मोरवा, कढोली, देऊरवाडा, घोसरी, मुधोली, नागभीड तालुक्यातील सावरगाव, मेंढा, ब्रम्हपुरी तालुक्यातील अड्याळ जाणी, माहेर, नवेगाव, मेंडकी, तुलाना माल, पोंभुर्णा तालुक्यातील चेक ठाणेवासना, गोंडपिपरी तालुक्यातील बोरगाव, सिंदेवाही तालुक्यातील सरपडपार, मोहाडी, घोट, सावरगाव, सामदा, कच्चेपार, रत्नापूर, शिवणी, सावली तालुक्यातील आकापूर, बेलगाव, बोरमाळ, कसरगाव, व्याहाड बु., पारडी, मूल तालुक्यातील सुशी, आगडी, मणिपूर, अवर्शखेडा, हळदी गावमन्ना, चिचाळा, ताडाळा, कोसंबी, बेंबाळ, नवेगाव, भु., नांदगाव, चिमूर तालुक्यातील सोनगाव बन, पेठ भांसुली, खडसंगी, भिवापूर, नवेगाव, वडाळा पैकू, नवेगाव, भिसी, चक जांभुळ, मासळ, कोलारा, मानेमोहाडी, सातारा, बामणगाव, राजुरा तालुक्यातील चिंचोली, गोवरी, रामनगर, धोपटाळा, धिडसी, देवाडा, साखरवाही, खामोना, जिवती तालुक्यातील कामतगुडा, मरकागोंदी, सलीमनगर, कोरपना तालुक्यातील हिरापूर, विरूर, शेरज आदी गावांचा समावेश आहे.दूषित पाणी आढळलेल्या गावांमध्ये आरोग्य विभागाकडून उपाययोजना सुरू आहेत. पावसामुळे जलजन्य आजार उद्भवू शकतात. त्यामुळे नागरिकांनी पाणी उखळूनच प्यावे. आरोग्याबाबत सर्तक राहून पसिरात स्वच्छता ठेवावी.- डॉ. श्रीराम गोगुलवारजिल्हा आरोग्य अधिकारी