शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
3
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
4
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
5
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
6
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
7
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
8
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
9
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
10
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
11
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
12
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
13
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
14
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
15
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
16
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
17
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
18
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
19
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
20
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय

१०९ नवजात बालकांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 1, 2018 00:29 IST

बाळाचा जन्म म्हणजे सर्वांसाठी आनंदोत्सवच. मात्र आरोग्य यंत्रणेच्या बेजबाबदारपणामुळे अनेकांच्या आयुष्यातील हा आनंदोत्सव दु:खाचे कुरण ठरत आहे. चंद्रपूर जिल्हा सामान्य रुग्णालयातील प्रसुती विभागात एप्रिल ते जुलै या चार महिन्यात तब्बल १०९ नवजात बाळांचा मृत्यू झाला आहे.

ठळक मुद्देचार महिन्यातील स्थिती : जिल्हा सामान्य रुग्णालयातील भोंगळ कारभार

परीमल डोहणे।लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : बाळाचा जन्म म्हणजे सर्वांसाठी आनंदोत्सवच. मात्र आरोग्य यंत्रणेच्या बेजबाबदारपणामुळे अनेकांच्या आयुष्यातील हा आनंदोत्सव दु:खाचे कुरण ठरत आहे. चंद्रपूर जिल्हा सामान्य रुग्णालयातील प्रसुती विभागात एप्रिल ते जुलै या चार महिन्यात तब्बल १०९ नवजात बाळांचा मृत्यू झाला आहे. आईच्या गर्भात सुरक्षित श्वास घेत कलेकलेने मोठा होत जाणारा अर्भक नवजात बाळ म्हणून विश्वात पदार्पण करताच असा मृत्यूच्या दाढेत जात असल्याने येथील आरोग्य यंत्रणेविषयी जनसामान्यात प्रचंड रोष निर्माण झाला आहे.चंद्रपूर जिल्हा सामान्य रुग्णालयातील प्रसुती विभागात मागील तीन महिन्यांपासून मोठ्या प्रमाणात नवजात बाळांचा मृत्यू होत असल्याची ओरड नागरिकांकडून केली जात आहे. मागील चार महिन्यांत जिल्हा सामान्य रुग्णालयात प्रसृतीसाठी दोन हजार ६६२ महिला भरती झाल्या. त्यापैकी एक हजार ७७४ प्रसृती नार्मल तर ८८८ प्रसृती सिझर करण्यात आल्या. त्यापैकी १०९ नवजात बालकांचा विविध कारणांने मृत्यू झाला. बाळ अविकसित असणे, प्रसुती उशिरा होऊन बाळाला आॅक्सिजन न मिळणे ही कारणे या नवजात बालकांच्या मृत्यूसाठी कारणीभूत असल्याचे जिल्हा सामान्य रुग्णालयातील बालरोग तज्ज्ञ डॉ. खान यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. मात्र केवळ चार महिन्यात तब्बल १०९ नवजात बालके रुग्णालयातच दगावत असल्याने जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.दरम्यान, मागील वर्षीही अशीच स्थिती निर्माण झाली होती. आॅगस्ट व सप्टेंबर २०१७ मध्ये ६८ दिवसात ८० नवजात बालकांचा मृत्यू झाला होता. याबाबतचे ‘लोकमत’ने प्रकाशित करताच आरोग्य यंत्रणेत एकच खळबळ उडाली होती.१०८ उपजत बालकांचा मृत्यूचंद्रपुरात मेडिकल कॉलेज झाल्यामुळे जिल्ह्याच्या बाहेरील रुग्ण मोठ्या प्रमाणात येत असतात. मात्र रुग्णालयात पाहिजे त्या प्रमाणात सोई उपलब्ध नसल्यामुळे चार महिन्यात जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल झालेल्या रुग्णांपैकी १०८ उपजत बालकांचा मृत्यू झाला आहे.जिल्हाभर परिस्थिती गंभीरनवजात बालकांच्या मृत्यूची ही आकडेवारी केवळ चंद्रपूर येथील जिल्हा सामान्य रुग्णालयातील आहे. मात्र जिल्ह्यातील अनेक आरोग्य केंद्रात, ग्रामीण रुग्णालयात आणि उपजिल्हा रुग्णालयात अशीच स्थिती आहे. तिथेही अनेक सोईसुविधांचा अभाव असल्याने प्रसुत मातांना, त्यांच्या नवजात बालकांना आपला जीव गमवावा लागला आहे. वास्तविक गर्भवती महिला, प्रसुत मातांनी काय खावे, कसे रहावे, याबाबत आरोग्य यंत्रणेकडून गावागावात जावून जनजागृती करणे अपेक्षित आहे. याशिवाय अनेक शासकीय योजनांद्वारे त्यांना पोषक आहारही दिला जातो. मात्र शासनाच्या या योजनांची गावागावात अंमलबजावणी होत नाही. त्यामुळे गोरगरीब व शेतमजूर महिला व त्यांच्या अपत्यांचा बळी जात आहे.

टॅग्स :Deathमृत्यू