शहरं
Join us  
Trending Stories
1
ENG vs IND : जसप्रीत बुमराहचा 'पंजा'! या ३ चुकांमुळे लीड्स कसोटीत टीम इंडियानं गमावली मोठ्या आघाडीची संधी
2
पावसाळ्यातही सुरू राहणार नक्षलविरोधी मोहीम; आत्मसमर्पण करा, अन्यथा...शाहांचा अल्टिमेटम
3
CM देवेंद्र फडणवीसांना पाठवली कायदेशीर नोटीस, ७ दिवसांचा दिला अल्टिमेटम; नेमके प्रकरण काय?
4
Ashadhi Wari : दिवे घाटाची अवघड वाट पार करीत माउलींचा पालखी सोहळा कऱ्हेकाठी विसावला
5
"...इराणला आपली अण्वस्त्रे देण्यास तयार!"; रशियाच्या माजी राष्ट्रपतींचा मोठा दावा; उद्या पुतीन यांची खास बैठक
6
अमेरिकेनं इराणवर चालवलं 'मिडनाइट हॅमर', केला ऑपरेशनच्या नावाचा खुलास; म्हणाले, ट्रम्प बोलें तो...!
7
१२५ लढाऊ विमाने, त्यात ७ बी२ बॉम्बर...! इराणला फसविले, पेंटागॉनने सांगितले अणुकेंद्रांवर कसा हल्ला चढविला...
8
ENG vs IND : कायद्यात राहून फायद्यात! जड्डू-साई सुदर्शन जोडीनं रिले कॅचसह लुटली मैफिल (VIDEO)
9
“८ वेळा निवडणुका जिंकलो, आता थांबण्याचा विचार करावासा वाटतो”; भास्कर जाधवांचे सूचक विधान
10
इराण तीन आठवड्यांत ९ अणुबॉम्ब बनवू शकला असता; अमेरिकेच्या हल्ल्यानंतर फोर्डोचा सॅटेलाईट फोटो आला...
11
“वारीमुळे रस्ता जाम होतो, आम्ही तक्रार केली नाही”; अबू आझमींचे विधान, CM फडणवीसांचे उत्तर
12
रोहित-विराट वनडे वर्ल्ड कप खेळणं 'मुश्किल'; गांगुलीनं बोलून दाखवली मनातली गोष्ट
13
इस्रायल-इराण युद्धात आता अमेरिकेनंतर होणार रशियाची एन्ट्री? अराघची घेणार पुतिन यांची भेट, म्हणाले...
14
शिंदेंनंतर आता भाजपाने डाव टाकला; शेकडो पदाधिकारी, माजी नगरसेवकांचा ठाकरे गटाला जय महाराष्ट्र
15
डेटिंग अ‍ॅपवरून सुंदर तरुणी कॅफेत भेटायला आली, १२००० रुपयांचे बिल केले आणि पळून गेली... तरुण बिचारा...
16
एअर इंडियाच्या आणखी एका विमानाला बॉम्बची धमकी; सौदी अरेबियात आपत्कालीन लँडिंग
17
आता पैसे नसल्यामुळे शिक्षण थांबणार नाही; 'या' योजनेद्वारे घरबसल्या मिळेल बिनव्याजी कर्ज...
18
DSP सिराजनं बेन स्टोक्सला केलं 'अरेस्ट'! विकेट गमावल्यावर कॅप्टननं हवेत भिरकावली बॅट (VIDEO)
19
आता डिप्लोमसीला काहीच अर्थ राहिला नाही; इस्रायलने हल्ला केला तेव्हाच..., इराणी परराष्ट्र मंत्र्यांचा युरोपवर आरोप
20
सोमवारी प्रदोष शिवरात्रि: ‘हे’ प्रभावी शिव मंत्र म्हणा, भाग्याची साथ मिळेल; लाभच लाभ होतील!

विदर्भ कोकण बँकेतील १ कोटी ७ लाख लंपास; तीन बँक अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 9, 2024 12:53 IST

Chandrapur : बँक अधिकाऱ्यानेच परस्पर स्वतःच्या व अन्य दोघांच्या खात्यात वळवल्याचा आरोप

लोकमत न्यूज नेटवर्क भद्रावती : विदर्भ कोकण ग्रामीण बँकेच्या भद्रावती शाखेतून ३६ खातेदारांचे १ कोटी ७ लाख रूपये बँक अधिकाऱ्यानेच परस्पर स्वतःच्या व अन्य दोघांच्या खात्यात वळते केले. ही धक्कादायक घटना शुक्रवारी (दि. ८) उघडकीस आली. बैंक व्यवस्थापकाच्या तक्रारीवरून तिघांविरुद्ध गुन्हा दाखल झाला. बैंक अधिकारी रजत ईटनकर, सुरज कुमार साहू (रा. नागपूर), प्रदीप दूधभाते (रा. पुणे) अशी आरोपींची नावे आहेत.

विदर्भ कोकण ग्रामीण बँक भद्रावती शाखेचे व्यवस्थापक अमोल कठाळे यांचा १ सप्टेंबर रोजी अपघात झाला. त्यामुळे रजेवर होते. या कालावधीत बँकेचे मुख्य अधिकारी म्हणून रजत इटणकर यांच्याकडे जबाबदारी होती. दरम्यान, पार्वता काकडे यांच्या बैंक खात्यातून ३ लाख ५० हजार रूपये परस्पर काढल्याची तक्रार बँकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना मिळाली. चौकशीअंती इटनकर यांनीच शेगाव शाखेत कार्यरत असताना हा गैरव्यवहार केल्याचे स्पष्ट झाले. याविरूद्ध शेगाव ठाण्यात तक्रार झाली. आरोपी अधिकारी इटणकर यांच्यावर वरिष्ठांना संशय आल्याने भद्रावती शाखेतील खातेदारांचीही तपासणी केली. त्यात ऑगस्ट २०२४ ते ऑक्टोबर २०२४ पर्यंत ३६ खातेदारांच्या खात्यातून १ कोटी ७ लाख गहाळ केल्याचे उघडकीस आले. ही रक्कम इटणकरने बँक अधिकारी असलेल्या सुरज कुमार साहू व प्रदीप दूधभाते या मित्रांच्या संगनमताने आरटीजीएस, नेफ्ट व रोखद्वारे गहाळ केल्याचे आढळून आले. पुढील तपास ठाणेदार अमोल काचोरे करीत आहेत. 

अशी वळती केली रक्कम बँकेतून ऑनलाइन किंवा रोख रक्कम खात्यातून दुसऱ्या खात्यात टाकायचे असेल, तर एन्ट्री करण्यास बँक अधिकारी लागतो. हा अधिकारी व्हेरिफाय करतो. जोपर्यंत ही प्रक्रिया पूर्ण होत नाही तोपर्यंत रक्कम दुसऱ्या खात्यात वळती होत नाही. आरोपी रजत इटनकर याच्या प्रक्रियेला सुरत साहू व प्रदीप दूधभाते हे दोघे अधिकारी व्हेरिफाय करत होते. तिघांच्या संगनमतातून १ कोटी ७ लाखांची रक्कम परस्पर वळती करण्यात आली.

"विदर्भ कोकण ग्रामीण बँकेच्या ३६ खातेदारांचे १ कोटी ७ लाख रूपये परस्पर वळते करण्यात आले. मात्र खातेदारांनी घाबरू नये. काही खातेदारांची रक्कम परत मिळाली. उर्वरित रक्कमही लवकरच जमा होणार आहे." -अमोल कठाळे, शाखा व्यवस्थापक विदर्भ कोकण ग्रामीण बँक, भद्रावती

टॅग्स :fraudधोकेबाजीbankबँकchandrapur-acचंद्रपूर