- | Maharashtra Election 2019 ; टोपल्या विकणाऱ्या आईचा पोरगा झाला आमदार
Maharashtra Election 2019 ; टोपल्या विकणाऱ्या आईचा पोरगा झाला आमदार

ठळक मुद्देपक्षाने नाकारले; मतदारांनी स्वीकारले : चंद्रपूर विधानसभेत किशोर जोरगेवार दुसरे अपक्ष

लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : चंद्रपूर विधानसभा क्षेत्राचे अपक्ष उमेदवार किशोर जोरगेवार यांनी महायुती आणि महाआघाडी या प्रमुख राजकीय आघाड्यांना पराभुत करीत शानदार विजय प्राप्त केला आहे.
किशोर जोरगेवार यांना १, १६, ५५४ मते मिळाली. तर भाजपचे उमेदवार नाना श्यामकुळे यांना ४४, ४४७ मते तर काँग्रेस उमेदवार महेश मेंढे यांना १४, १४१ मते पडली.
सकाळी ८ वाजतापासून येथील एसडीओ कार्यालय परिसरात मतमोजणीला सुरूवात झाली. पहिल्या फेरीपासून किशोर जोरगेवार हे आघाडीवर होते. अंतिम फेरीपर्यंत त्यांची आघाडी कायमच राहिली. सहाही विधानसभांमधून ते सर्वाधिक ७२, १०७ मताधिक्यांनी विजयी झाले आहे. चंद्रपूर विधानसभेत यापूर्वी १९६२ मध्ये रामचंद्रराव राजेश्वरराव पोटदुखे हे अपक्ष उमेदवार विजयी झाले होते. त्यानंतर आता किशोर जोरगेवार हे दुसरे विजयी अपक्ष उमेदवार ठरले आहे. किशोर जोरगेवार यांनी निवडणुकीपूर्वी काँग्रेसच्या तिकीटासाठी प्रयत्न केला. काँग्रेसमध्ये ते प्रवशितही झाले. मात्र ऐनवेळी त्यांना पक्षाने उमेदवारी नाकारली. मात्र मतदारांनी त्यांना स्वीकारले. पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी भाजप उमेदवार नाना श्यामकुळे यांच्या प्रचारार्थ चंद्रपूर क्षेत्रात सभा घेतल्या. मात्र नाना श्यामकुळेंबाबतची मतदारांमध्ये असलेली नाराजी ते दूर करू शकले नाही. दुसरीकडे किशोर जोरगेवार यांनी उमेदवारी अर्ज दाखल करतानाच जनतेचा कौल मागितला व ते जनतेचे उमेदवार झाले.

१,१६,५५४ मिळाली मते
विजयाची तीन कारणे...

1मागील काही वर्षांपासून यंग चांदा ब्रिगेडच्या माध्यमातून किशोर जोरगेवार हे जनतेच्या विविध प्रश्नांना वाचा फोडत आहेत. प्रसंगी आंदोलने करून जनतेच्या समस्यांकडे शासनाचे लक्ष वेधत आहेत. चंद्रपुरात जनतेला मोफत वीज मिळाली पाहिजे, अशी त्यांची आग्रही मागणी आहे.
2जनतेचा नेता, सर्वसामान्य माणूस आणि अडी-अडचणीत धावून जाणारा कार्यकर्ता म्हणून ओळख.
3चंद्रपूर क्षेत्रात जोरगेवार यांचा दांडगा जनसंपर्क.

Web Title: -

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.