- मयूर पठाडेदोन प्रकारची लोकं असतात, काही जणांचा आपल्यावर, आपल्या कामगिरीवर, आपल्या क्षमतांवर पुरेपूर विश्वास असतो. त्यानुसार ते वागतातही. दुसºया प्रकारचे लोक असतात, त्यांना आपल्या क्षमतेवर कधीच विश्वास नसतो, आपण काही करू शकतो यावरच त्यांना भरोसा नसतो, आत्मविश्वास नसतो.खरं म्हणजे ज्या गोष्टींवर तुमचा विश्वास असतो, ज्या गोष्टी तुम्ही उत्तम करू शकता, त्या तुम्ही करायला हव्यात, त्याप्रमाणे तुम्ही वागायला हवं, आचरण करायला हवं. कारण तुमचा आत्मविश्वास त्यात उतरत असतो आणि त्या आत्मविश्वासाचं पॉझिटिव्ह आणि प्रत्यक्ष रुप कुठल्या ना कुठल्या स्वरुपात व्यक्त होतंही.मला जमेल की नाही, मी करू शकेन की नाही, अशा आत्मविश्वास नसलेल्या अवस्थेत किंवा अर्ध आत्मविश्वासात तुम्ही काही करायला गेलात, तर त्यात अपयश येण्याची शक्याताही खूप मोठी असते. वेगवेगळ्या अभ्यासांतून हे सिद्ध झालं आहे.पण जर याच्या उलट झालं, म्हणजे जसं तुम्ही वागता, बºयाचदा ते चुकीचंही असू शकतं, त्याच पद्धतीनं ती कृती करीत राहिलात, तर आपण ‘तसेच’ आहोत, असं लोकांना तर वाटायला लागतंच, पण त्याचबरोबर आपणही आपला तसाच समज करून घेतो. स्वत:च्याच समज आणि गैरसमजाचे आपण बळी ठरतो. त्यामुळे अभ्यासकांचं म्हणणं आहे, कोणतीही गोष्ट चुकीच्या पद्धतीनं करू नका, वापरू नका.. मग ती भाषा असो नाही तर कृती. आपलं मन आपोआप ती स्वीकारत जातं आणि मग आपण ‘तसेच’ बनतो आणि तेच बरोबर आहे असं आपल्याला वाटायला लागतं.. तेव्हा जपा या स्वप्रतिमेपासून!
स्वप्रतिमाच ठरवते तुमचं व्यक्तिमत्त्व..
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 3, 2017 17:29 IST
स्वत:च्याच समज आणि गैरसमजाचे ठरु नका बळी
स्वप्रतिमाच ठरवते तुमचं व्यक्तिमत्त्व..
ठळक मुद्देज्या गोष्टींवर तुमचा विश्वास असतो, ज्या गोष्टी तुम्ही उत्तम करू शकता, त्या विधायक गोष्टींवर अधिक भर द्यायला हवा. त्याप्रमाणेच वागायला हवं.या आत्मविश्वासाचं पॉझिटिव्ह आणि प्रत्यक्ष रुप कुठल्या ना कुठल्या स्वरुपात व्यक्त होतंच.कोणतीही गोष्ट चुकीच्या पद्धतीनं करू नका, वापरू नका.. मग ती भाषा असो नाही तर कृती.