शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या सुप्रीम कोर्टात मोठा स्फोट! इस्लामाबादमध्ये खळबळ; बेसमेंटमध्ये झालेल्या ब्लास्टने इमारतीला हादरवले
2
"हा देश राम-सीता यांचा, लादेनचा नाही; या छोट्या ओसामाला..."; बिहारमध्ये हिमंत बिस्वा सरमा यांचा हल्लाबोल
3
Demat अकाऊंटमध्ये ४३ कोटी ठेवणारे डॉक्टर व्हायरल; झिरोदाला म्हटलं स्कॅम; कामथ काय म्हणाले?
4
राज्य मंत्रिमंडळाचे २१ 'जम्बो निर्णय'; आचारसंहितेपूर्वी महायुती सरकारचा घोषणांचा धमाका
5
आयसीसीनं लॉरावर केली मर्जी बहाल! वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतवर अन्याय?
6
उत्पन्न वाढीसाठी एसटी रिटेल इंधन विक्री करणार, निविदा प्रक्रिया सुरू, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली माहिती 
7
एअर इंडियाच्या विमानात गडबड! दिल्लीहून बांगळुरूला जाणाऱ्या विमानाची इमर्जन्सी लँडिंग
8
Relationship Tips: भांडणानंतर बायको रडत राहते आणि नवरा झोपी जातो, असे का?
9
महिला क्रिकेट विश्वचषक विजेत्या राज्यातील खेळाडूंना रोख पारितोषिक, सत्कार होणार; मुख्यमंत्र्यांची घोषणा
10
९५ टक्के लोकांचा पहिली ते चौथी हिंदी भाषा लादण्याला विरोध; राज ठाकरेंच्या भेटीनंतर नरेंद्र जाधव म्हणाले...
11
"...तर गोळीचे उत्तर गोळ्याने दिले जाईल"; अमित शाह यांचा "नापाक" पाकिस्तानला सज्जड दम! विरोधकांवरही बरसले
12
Astro Tips: कडक मंगळाची पत्रिका म्हणजे नेमके काय? ती व्यक्ती तापदायकच असते का? वाचा 
13
‘एक बुथ, १० युथ’ या सुत्रानुसार युवक काँग्रेसने काम करा, जनतेच्या प्रश्नावर आवाज उठवा, नसीम खान यांचं आवाहन
14
Mumbai: "जेवण का आणलं नाही?" रूममेट्सकडून टॅक्सी ड्रायव्हरची हत्या, साकीनाका येथील घटना!
15
महाराष्ट्रात आजपासून आचारसंहिता? निवडणूक आयोग दुपारी ४ वाजता घोषणा करणार
16
मोठी डेडलाईन! पॅन कार्डशी आधार लिंक करण्याची अंतिम तारीख जाहीर; घरबसल्याही करता होईल काम
17
Groww IPO: 'ग्रो'चा आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुला; काय आहे प्राईज बँड, किती करावी लागणार गुंतवणूक, जाणून घ्या
18
रागाच्या भरात परेश रावल यांनी चक्क केली होती हाणामारी! म्हणाले, "एकाला थप्पड लगावली, दुसऱ्याच्या डोक्यात दगड..."
19
वर्गात अवघे १२ विद्यार्थी अन् पटावर ५०! शिक्षण अधिकाऱ्यांनी पंतप्रधानांचे नाव विचारताच समोर आलं धक्कादायक सत्य
20
हृदयद्रावक! "माझ्या मुली गेल्या, आता मी काय करू?"; ३ बहिणींचा मृत्यू, आई-वडिलांचा टाहो

हजारो पदे रिक्त; भरतीकडे तरुणांच्या नजरा, राज्यभरात आदिवासींच्या साडेअकरा हजार जागा

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 18, 2022 06:01 IST

राज्यात आदिवासींच्या विविध विभागांत तब्बल ११ हजार ४३५ जागा रिक्त आहेत.

राम शिनगारे, लोकमत न्यूज नेटवर्क

औरंगाबाद : राष्ट्रपतिपदासाठी  सोमवारी होणाऱ्या निवडणुकीत पहिल्या महिला आदिवासी उमेदवार द्रौपदी मुर्मू यांचा विजय निश्चित मानला जात असला तरी गेल्या अनेक वर्षांपासून आदिवासींच्या प्रश्नांकडे कोणत्याही सरकारने पाहिजे तेवढे लक्ष दिलेले नाही. सध्या राज्यात आदिवासींच्या विविध विभागांत तब्बल ११ हजार ४३५ जागा रिक्त आहेत. जात पडताळणी समित्यांकडे १७ हजार १८० जात प्रकरणे प्रलंबित आहेत.  

राज्य शासनाच्या विविध विभागांमध्ये आदिवासी समाजाच्या ५५ हजार ३१९ जागा आहेत. त्यापैकी तब्बल ११ हजार ४३५ जागा रिक्त असल्याची माहिती तत्कालीन राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी विधिमंडळाच्या अधिवेशनात दिली होती.  या रिक्त जागांविषयी भाजपचे आमदार डॉ. अशोक उईके यांनी राष्ट्रीय अनुसूचित जनजाती आयोगाकडे २७ मार्च रोजी तक्रार नोंदवली होती. त्यानुसार आयोगाचे उपसंचालक आर. के. दुबे यांनी राज्याच्या मुख्य सचिवांना २५ एप्रिल रोजी पत्र पाठवून सर्व माहिती सादर करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार २३ मे रोजी सामान्य प्रशासन विभागाचे सचिव सुमंत भांगे यांनी आयोगाला माहिती सादर केली. राज्य शासनाने आयोगाला सादर केलेल्या आकडेवारीपेक्षा अधिक जागा रिक्त असल्याचा दावा आयोगाच्या अभ्यासगटाचे सदस्य राजेंद्र मरसकोल्हे यांनी केला आहे.  

पोलीस भरतीत ४०० जणांना जागेवरच दिले ‘ऑफर लेटर’

अहमदनगर जिल्हा पोलीस दलाने रविवारी पोलीस, सेवानिवृत्त पोलीस, होमगार्ड यांच्या पाल्यांसाठी तसेच पारधी, भिल्ल, आदिवासी युवकांसाठी रोजगार मेळाव्याचे आयोजन केले होते.  यावेळी ४०० जणांना मुलाखत देताच तातडीने नोकरी देण्यात आली. दोन ते अडीच लाख रुपयांचे पॅकेज मिळाले. जिल्हा पोलीस दलातर्फे हा मेळावा झाला. अध्यक्षस्थानी नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. बी. जी. शेखर पाटील होते. यावेळी  राज्यातील ७० कंपन्यांचे प्रतिनिधी सहभागी झाले होते. मेळाव्यात सकाळपासूनच तरुणांची गर्दी वाढत होती. नगरसह नाशिक, नांदेड, सोलापूर या जिल्ह्यांतील तब्बल अडीच हजार तरुणांनी या मेळाव्यात मुलाखतीसाठी अर्ज दिले. 

टॅग्स :jobनोकरी