शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

परीक्षेसाठी विद्यार्थ्यांची इंग्रजी भाषेला पहिली पसंती; इतर भाषांसह मराठीचा टक्का घसरला!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 19, 2025 15:00 IST

NEET Exam: आता बहुतेक विद्यार्थी इंग्रजी भाषा निवडत आहेत. 

लोकमत न्यूज नेटवर्क नवी दिल्ली : परीक्षेत यशस्वी होण्यासाठी तरुणांनी प्रश्नपत्रिकेची भाषा अतिशय काळजीपूर्वक निवडण्यास सुरुवात केली आहे. पूर्वी, स्थानिक भाषेत शिकवणाऱ्या नोट्स आणि शिक्षकांमुळे, नीट परीक्षेत हिंदी, गुजराती, मराठी, तेलुगू आणि इतर भाषांमधून बसणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या इंग्रजीच्या तुलनेत अधिक होती. मात्र आता बहुतेक विद्यार्थी इंग्रजी भाषा निवडत आहेत.    नीटमध्ये भाषा बदलून बसलेल्या विद्यार्थ्यांनी सांगितले की इंग्रजी भाषेत अनेक विषय समजून घेणे आणि उत्तरे देणे खूप सोपे आहे. विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे की इंग्रजी भाषेतील अभ्यासाचे विषय इतर भाषांपेक्षा ऑनलाइन आणि ऑफलाइन सहज उपलब्ध आहेत. 

कोणत्या भाषेचे किती विद्यार्थी इंग्रजी- १८,२२,४१०हिंदी- ३,२८,६३४आसाम- २,४७८बंगाल- ३८,२४२गुजरात- ५३,०२५मराठ- ९२७पंजाब- १७० तमि- २६,५८०तेलुगू    - ९०७उर्दू- ९४३

अशी वाढत गेली संख्याएनटीएनुसार, २०१९ मध्ये १२,०४,९६८ विद्यार्थ्यांनी इंग्रजी भाषेत परीक्षा दिली, तर १,७९,८५७ विद्यार्थी हिंदी भाषेतून परीक्षेत बसले. २०२१ मध्ये  इंग्रजी भाषेतून १२,६५,५२० विद्यार्थी आणि हिंदी भाषेतून २,२८,४४१ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. या वर्षी १८२२ जणांनी उर्दू भाषा निवडली. 

विषय उपलब्ध असेल तर संख्या वाढेलनीट परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांची पहिली पसंती इंग्रजी आहे आणि हिंदी दुसऱ्या क्रमांकावर येते. अशा परिस्थितीत, येत्या काही वर्षांत इतर भाषांमधून परीक्षेत बसणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या वाढण्याची शक्यता आहे, असे मत अनेक करिअर तज्ज्ञांनी व्यक्त केले. 

टॅग्स :examपरीक्षाNEET EXAM Resultनीट परीक्षेचा निकाल