शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

सणासुदीसाठी भरणार सहा लाख नवीन कर्मचारी; हंगामी रोजगारात ४० टक्के वाढ

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 13, 2022 11:01 IST

३० टक्क्यांपर्यंत अधिक प्रोत्साहन भत्ता, बोनस आणि राहण्याची सोयही

नवी दिल्ली : यंदाच्या सणासुदीच्या हंगामात ई-कॉमर्ससह एफएमसीजी, वाहन व किरकोळ विक्री क्षेत्रातील विक्रीत २५ ते ३० टक्के तेजी येण्याची शक्यता आहे. त्यामुळे हंगामी नोकऱ्याही ४० टक्क्यांनी वाढणार आहे. त्यासाठी कंपन्यांनी नोकर भरतीची तयारी चालविली आहे.

कोरोनाचे सावट दूर झाल्यामुळे यंदा प्रथमच निर्बंधमुक्त सण साजरे होत आहेत. त्याचा लाभ कंपन्यांना होत आहे. स्टाफिंग कंपन्यांनुसार, गेल्या वर्षाच्या तुलनेत यंदा कर्मचाऱ्यांची मागणी ३० ते ४० टक्क्यांनी अधिक राहण्याची शक्यता आहे. यंदा सणासुदीच्या काळासाठी पाच ते सहा लाख हंगामी कर्मचारी भरती केले जाण्याची शक्यता आहे. नोकरी सोडण्याचे प्रमाणही वाढलेले असल्यामुळे मनुष्यबळ भरतीसाठी कंपन्यांना नवनवीन मार्ग शोधावे लागत आहेत. त्यासाठी कंपन्या कर्मचाऱ्यांना ३० टक्के अधिक प्रोत्साहन भत्ता-बोनस देत आहेत. त्यांची राहण्याची सोयही करीत आहेत.

सर्वाधिक मागणी कुणाला?डिलिव्हरी एजंट, डिलिव्हरी पिकर्स, पॅकर्स, शॉर्टर्स, लोडर-अनलोडर, इन्स्टॉलेशन आणि सर्व्हिस इंजिनिअर यांना ई-कॉमर्स क्षेत्रातून सर्वाधिक मागणी आहे. छोट्या शहरांतून भरती?छोटी शहरे आणि ग्रामीण भागातून कंपन्या मोठ्या प्रमाणात मनुष्यबळ भरती करीत आहेत.जबरदस्त ऑफर काय?मनुष्यबळ आकर्षित करण्यासाठी कंपन्या अधिक वेतनासह साईन-इन आणि रिटेन्शन बोनस देत आहेत. राहण्याची सोय आणि दीर्घ अवधीचे करार केले जात आहेत.या क्षेत्रात भरतीची तयारीई-कॉमर्स, क्विक कॉमर्स, लॉजिस्टिक्स, रिटेल, एफएमसीजी, पर्यटन व अतिथ्य आणि दूरसंचार या क्षेत्रात सर्वाधिक हंगामी रोजगारासाठी भरती होणार आहे.

टॅग्स :jobनोकरी