शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांच्या बारामतीतील प्रचाराच्या सांगता सभेत अचानक अजितदादांची एंट्री; नेमकं काय घडलं?
2
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
3
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
4
देशपांडे लैय भारी! तुषारने पहिल्याच षटकात PBKS च्या स्टार फलंदाजांचे उडवले त्रिफळे, Video 
5
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
6
“राज ठाकरे ज्यांच्या प्रचारासाठी जातात तो उमेदवार पडतोच”; ठाकरे गटाचा खोचक टोला
7
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
8
MS Dhoni पहिल्याच चेंडूवर बोल्ड! पंजाब किंग्सच्या गोलंदाजांसमोर CSK ची शरणागती, डाव संपला
9
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
10
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
11
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
12
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
13
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
14
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
15
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
16
६ धावांत ३ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
17
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!
18
‘भाजपाला विरोध करण्यासाठी दहशतवादी कसाबची बाजू घेता? थोडी तरी लाज बाळगा’, बावनकुळेंची वडेट्टीवारांवर टीका
19
CSK च्या प्ले ऑफच्या मार्गात अडथळे; २ मेन गोलंदाज मायदेशात परतले, दीपक चहरवरही प्रश्नचिन्ह
20
T20 वर्ल्ड कपमध्ये विराटला OUT करणं हेच ध्येय; पाकिस्तानी गोलंदाजानं बाळगलं 'स्वप्न'

Sarkari Naukri 2021: आयकर विभागात १० वी उत्तीर्ण उमेदवारांसाठी बंपर भरती, कसा कराल अर्ज? जाणून घ्या...

By ऑनलाइन लोकमत | Published: July 11, 2021 5:52 PM

Sarkari Naukri 2021: इयत्ता १० वी उत्तीर्ण उमेदवारांसाठी सरकारी नोकरीची सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे. आयकर विभागानं १० वी उत्तीर्ण उमेदवारांसाठी बंपर नोकर भरती काढली आहे.

Sarkari Naukri 2021: इयत्ता १० वी उत्तीर्ण उमेदवारांसाठी सरकारी नोकरीची सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे. आयकर विभागानं १० वी उत्तीर्ण उमेदवारांसाठी बंपर नोकर भरती काढली आहे. याअंतर्गत एकूण १५५ जागांवर नोकर भरती केली जाणार आहे. आयकर विभागाच्या मुंबईतील कार्यालयात उमेदवारांना नोकरी दिली जाणार आहे. (Sarkari Naukri 2021 in Income Tax Department Mumbai for Meritorious Sportspersons)

आयकर विभागाकडून विविध पदांसाठी नोकर भरतीचं नोटिफिकेशन जारी करण्यात आलं आहे. यात स्पोर्ट्स विभागातून ही भरती केली जाणार असल्याचं नमूद करण्यात आल्यानं उमेदवारांची फिजिकल एलिजिबिलीटी टेस्ट (PET) केली जाणार आहे. इच्छुक उमेदवारांना नोकरीसाठी अर्ज दाखल करण्यासाठी आयकर विभागाच्या incometaxmumbai.in या अधिकृत संकेतस्थळावर भेट देता येईल. यात अर्जाचा नमुना डाऊनलोड करुन तो भरून पाठवावा लागणार आहे. 

कसा कराल अर्ज?1. आयकर विभागातील नोकरीचा अर्ज दाखल करण्यासाठी विभागाच्या incometaxmumbai.in या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्या. 

२. वेबसाइटच्या होमपेजवर असलेल्या Recruitment सेक्शनवर क्लिक करा

३. आता Sports Quota Recruitment for Meritorious Sportspersons 2021 वर क्लिक करा

४. यात Application for Meritorious Sportspersons in Income Tax Department, Mumbai या लिंकवर क्लिक करा. 

५. त्यानंतर तुम्हाला विचारण्यात आलेली सर्व माहिती भरा. 

६. त्यानंतर अर्ज दाखल केल्याची खातरजमा म्हणून दिल्या जाणाऱ्या अर्जाच्या प्रतिची प्रिंट काढून घ्या. 

कोणत्या पदांसाठी भरती?

टॅक्स असिस्टंट (Tax Assistant)- ८३ जागा

मल्टी-टास्किंग स्टाफ (MTS) - ६४ जागा

इन्स्पेक्टर ऑफ इन्कम टॅक्स (Inspector Of Income Tax)- ८ जागा

पात्रता काय?टॅक्स असिस्टंट पदासाठी अर्ज दाखल करणाऱ्या उमेदवाराचं कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यालयातून पदवीपर्यंतचं शिक्षण पूर्ण झालेलं असणं गरजेचं आहे. तर मल्टी टास्क विभागातील पदासाठी उमेदवाराचं कमीत कमी इयत्ता १० वी पर्यंतचं शिक्षण पूर्ण झालेलं असणं गरजेचं आहे. यात इयत्ता १० वीच्या गुणपत्रिकेवर आधारितच उमेदवाराची निवड केली जाईल. याशिवाय या दोन्ही पदांवर अर्ज दाखल करणाऱ्या उमेदवारानं राष्ट्रीय किंवा आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये सहभाग घेतलेला असणं देखील बंधनकारक आहे. 

वयाची अट काय?आयकर विभागानं जारी केलेल्या नोटिफिकेशननुसार नोकरीसाठी इच्छुक उमेदवाराचं वय हे १८ ते ३० वर्षांपर्यंत असणं गरजेचं आहे. तर यात कमाल वयात ओबीसी, एससी व एसटी प्रवर्गातील उमेदवारांसाठी सूट देण्यात आली आहे. 

टॅग्स :Income Taxइन्कम टॅक्सjobनोकरीCareer Guidanceकरिअर मार्गदर्शनIncome Tax Officeमुख्य आयकर आयुक्त कार्यालय