शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! १२ हजार भावांनी घेतला लाडकी बहीण योजनेचा लाभ; १६४ कोटींचा घोटाळा आला समोर
2
मुहूर्त ट्रेडिंग: शेअर बाजारात तेजी; निफ्टी वर्षाच्या सर्वोच्च पातळीवर, सेन्सेक्स 62 अंकांनी वधारला
3
BCCI: "आशिया चषक भारताला न दिल्यास..." बीसीसीआयचा मोहसिन नक्वी यांना इशारा!
4
अमित शाह यांच्यावर गंभीर आरोप, प्रशांत किशोर यांनी दाखवला फोटो; जनसुराजच्या उमेदवाराचं अपहरण?
5
अमेरिकेचा 88 लाखांचा H-1B व्हिसा आजपासून लागू; भारतीयांना मोठा दिलासा...
6
Beed: फटाका विझलाय समजून पुन्हा पेटवयाला गेला अन्...; बीडमध्ये सहा वर्षांच्या मुलासोबत भयंकर घडलं!
7
"तात्या विंचू तुम्हाला चावेल...", संजय राऊतांच्या टीकेवर महेश कोठारेंची प्रतिक्रिया, म्हणाले- "ते माझ्याविषयी जे बोलले..."
8
Alyssa Healy : बॅक टू बॅक सेंच्युरी, तरीही स्टार्कच्या बायकोवर आली बाकावर बसण्याची वेळ; कारण...
9
Bhai Dooj 2025: भाऊबीजेसाठी पार्लर ग्लो फक्त चार स्टेप मध्ये! तोही घरच्या साहित्यात, चेहऱ्यावर आणा नैसर्गिक तेज!
10
युनूस सरकारला IMFचा मोठा धक्का! बांगलादेशला दिली जाणारी ८०० दशलक्ष डॉलर्सची मदत थांबवली...
11
"मला तू आवडत नाहीस, कधीच आवडणार नाहीस"; व्हाईट हाऊसमध्ये राडा, ऑस्ट्रेलियन राजदूताला ट्रम्प यांचा टोला
12
India Probable Playing 11 vs Australia 2nd ODI: कांगारुंना जाळ्यात अडकवण्यासाठी गंभीर हा डाव खेळणार?
13
नीतीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री बनूच शकणार नाहीत..! बिहार निवडणुकांपूर्वी मोठी भविष्यवाणी
14
Bhai Dooj 2025: यमराज भाऊबीजेला आले, तेव्हा यमुनेला काय मिळाली ओवाळणी?
15
मृत्यूनंतरही घरात फिरतोय पत्नीचा आत्मा, अभिनेत्याने सांगितला अनुभव म्हणाला- "अचानक कापूरचा वास आला आणि..."
16
चाळीसगावचे माजी आमदार राजीव देशमुख यांचे हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने निधन
17
चंद्रपुरात दोन देशी कट्टे, दोन माऊझर, ३५ जिवंत काडतुसे, चार खंजिरांसह चौघांना अटक
18
ट्रम्प यांचा नवा वादग्रस्त निर्णय ! गांजा विक्रेत्याला केले अमेरिकेचा इराकमधील 'विशेष दूत'
19
Diwali Padwa 2025: दिवाळी पाडव्याला नवर्‍याने बायकोला ओवाळणी देणे, हा हक्क की कर्तव्य?

रेल्वेत सेक्शन कंट्रोलर पदांसाठी भरती, जाणून घ्या पात्रता आणि निवड प्रक्रिया!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 26, 2025 16:23 IST

RRB Section Controller Recruitment: रेल्वेत नोकरी करण्यासाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांसाठी आनंदाची बातमी आहे.

रेल्वेत नोकरी करण्यासाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांसाठी आनंदाची बातमी आहे. रेल्वे भरती मंडळाने सेक्शन कंट्रोलर पदांसाठी भरतीसाठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे. या भरतीसाठी उमेदवारांना ऑनलाइन अर्ज करायचा आहे. येत्या १५ सप्टेंबर २०२५ पासून अर्ज प्रक्रियेला सुरूवात होईल. तर, १४ ऑक्टोबर अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. या भरतीअंतर्गत एकूण ३६८ रिक्त जागा भरल्या जाणार आहे. या भरतीसंदर्भात अधिक माहिती जाणून घेण्यासाठी रेल्वे भरती मंडळाच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी.

पात्रता

उमेदवाराने मान्यताप्राप्त विद्यापीठ किंवा संस्थेतून पदवी उत्तीर्ण असणे अनिवार्य आहे, तर समतुल्य पदवी देखील वैध असेल. वयोमर्यादेनुसार, उमेदवाराचे किमान वय २० वर्षे आणि कमाल वय ३३ वर्षे निश्चित करण्यात आले. सरकारच्या नियमांनुसार एससी/एसटी/ओबीसी/माजी सैनिकांना वयात सूट देण्यात आली.

निवड प्रक्रिया

रेल्वे सेक्शन कंट्रोलर भरतीची निवड प्रक्रिया एकूण चार टप्प्यात पूर्ण केली जाईल. सर्वप्रथम, उमेदवारांना संगणक आधारित चाचणी द्यावी लागेल, जी सामान्य ज्ञान, गणित आणि तर्कशास्त्र विषयांवर आधारित असेल. या चाचणीत उत्तीर्ण झालेल्या उमेदावारांच्या कागदपत्रांची पडताळणी केली जाईल. तिसरा टप्पा वैद्यकीय चाचणी असेल, ज्यात उमेदवारांची ए२ वैद्यकीय मानकांनुसार तपासणी होईल. यानंतर  अंतिम गुणवत्ता यादी जाहीर केली जाईल

अर्ज शुल्क

रेल्वे सेक्शन कंट्रोलर भरतीसाठी सामान्य आणि ओबीसी उमेदवारांना ५०० रुपये शुल्क भरावे लागेल. तर, अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, महिला उमेदवार, दिव्यांग आणि माजी सैनिकांसाठी अर्ज शुल्क २५० रुपये ठेवण्यात आले.

अर्ज करण्याची पद्धत

- सर्वात प्रथम, रेल्वे भरती मंडळाच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या.- तिथे,  “सीईएन क्रमांक ०४/२०२५ – सेक्शन कंट्रोलर भरती” या पर्यायावर क्लिक करा.- पुढे आवश्यक माहिती भरून नोंदणी पूर्ण करा.- त्यानंतर लॉगिन करा आणि शैक्षणिक पात्रता आणि इतर माहिती भरा.- पासपोर्ट आकाराचा फोटो, स्वाक्षरी आणि आवश्यक प्रमाणपत्रांच्या स्कॅन केलेल्या कॉपी अपलोड करा.- डेबिट/क्रेडिट कार्ड, नेट बँकिंग किंवा यूपीआयद्वारे अर्ज शुल्क भरा- शेवटी अर्ज सबमिट करा आणि त्याची कॉपी काढून स्वत:जवळ ठेवा.

टॅग्स :jobनोकरीIndian Railwayभारतीय रेल्वे