शहरं
Join us  
Trending Stories
1
“भाजपाने मराठी माणसासाठी काय केले? ठाकरे आहेत म्हणून तुम्ही राज्याचे CM आहात”: संजय राऊत
2
ख्रिसमसच्या सकाळी PM नरेंद्र मोदींनी लावली ऐतिहासिक चर्चमध्ये हजेरी; प्रार्थनेत सहभागी
3
नाशिक भाजपात मोठा राडा! पक्षप्रवेशावरून २ गटांमध्ये तणाव; फरांदे समर्थकांकडून घोषणाबाजी
4
सुरक्षा दलांची मोठी कारवाई; ओडिशातील गुम्मा जंगलात 4 माओवाद्यांचा खात्मा
5
खळबळजनक रिपोर्ट! रशिया, भारत आणि फिलीपिन्स...कोणकोणत्या देशांच्या जमिनीवर चीनची करडी नजर?
6
सीक्रेट सांतानं कर्मचाऱ्याला दिलेलं गिफ्ट पाहून तरुणी भलत्याच खूश झाल्या, असं काय मिळालं?
7
"कांगारूंना कसं हरवायचं? ते शास्त्र फक्त शास्त्रींकडेच! इंग्लंडने त्यांनाच कोच करावं"
8
Travel : जगातील एक 'असे' ठिकाण, जिथे वेळेचे कोणतेच बंधन नाही! घड्याळ तर कुणी वापरतच नाही
9
Vinayak Pande and Yatin Wagh: उद्धव ठाकरेंचा आदेश, विनायक पांडे- यतिन वाघ यांची पक्षातून हकालपट्टी; राऊतांची पोस्ट!
10
'खेलरत्न'साठी हार्दिक! दिव्या देशमुखसह २४ खेळाडू अर्जुन पुरस्कारासाठी नामांकित; इथं पाहा संपूर्ण यादी
11
ज्यांनी घेतलीय त्यांनी मागच्या सीटवर बसू नका, या देशाने घातली मारुती सुझुकीच्या Fronx विक्रीवर बंदी...
12
Astrology: २०२६ आधी 'या' ३ गोष्टी केल्याने होईल मोठा लाभ; ज्योतिषांनी दिला नवीन वर्षाचा कानमंत्र!
13
"युतीमुळे तुम्हाला फरक पडत नाही, तर तोंडाची डबडी का वाजवताय?", संजय राऊत भाजपा नेत्यांवर भडकले
14
१७ वर्षानंतर तारिक रहमान बांगलादेशात परतले; राजकीय हालचालींना वेग, भारतासाठी फायद्याचे की तोट्याचे
15
"कोणालाच सत्य माहित नव्हतं...", ९ वर्षांनंतर शिल्पा शिंदेने 'भाबीजी घर पर हैं' सोडण्यामागचं सांगितलं कारण
16
एका वर्षात 'ग्रॅच्युइटी' मिळण्याचा नियम कागदावरच; नव्या लेबर कोडची प्रतीक्षा लांबली! का होतोय उशीर?
17
जीएसटी कमी होऊन, दोन महिनेही झाले नाहीत तोच कारच्या किंमती महागणार; मारुतीपासून महिंद्रापर्यंत सर्वच कंपन्या वाढवणार किमती
18
नांदेडमध्ये काळजाचा थरकाप! आई-वडील घरात मृतावस्थेत, तर मुलांनी रेल्वेखाली संपवलं आयुष्य
19
संतापजनक घटना! नातीनं विरोधात जाऊन लग्न केलं, संतापलेल्या आजीने नातीच्या ४० दिवसांच्या बाळाला संपवलं
20
जिथे कोंडी केली, तेच ठिकाण ‘गेम चेंजर’ ठरणार; ठाकूरांना खिंडीत गाठण्यासाठी भाजपाची रणनीती!
Daily Top 2Weekly Top 5

RBI Recruitment 2023: आरबीआयमध्ये नोकरीची संधी; २९१ पदांसाठी होणार भरती

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 10, 2023 13:31 IST

RBI Recruitment 2023: इच्छुक उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने बँकेची अधिकृत वेबसाईट opportunities.rbi.org.in जाऊन अर्ज करता येणार आहे. 

नवी दिल्ली : बँकेतनोकरी करण्याची इच्छा असलेल्या तरुणांसाठी एक खुशखबर आहे.  भारतीय रिझर्व्ह बँकेत (आरबीआय) विविध पदांसाठी भरती निघाली असून अर्ज प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. आरबीआय ग्रेड बी भरती मोहिमेंतर्गच एकूण २९१ रिक्त जागांची भरती होणार आहे. इच्छुक उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने बँकेची अधिकृत वेबसाईट opportunities.rbi.org.in जाऊन अर्ज करता येणार आहे. 

दरम्यान, ९ जून २०२३ पर्यंत रात्री ६ वाजेपर्यंत अर्ज पाठवता येणार आहे. ही भरती अधिकारी ग्रेड बी(डीआर) जनरल, डीईपीआर, डीएसआईएमस या पदांसाठी होणार आहे. अधिकारी ग्रेड बी(डीआर) जनरलसाठी २२२ पदे, अधिकारी ग्रेड बी (डीआर) डीईपीआरसाठी ३८ पदे, अधिकारी ग्रेड बी (डीआर) डीएसआईएमसाठी ३१ पदे, आरबीआय ग्रेड बी- जनरल फेज १ परिक्षा ९ जुलै आणि ग्रेड बी डीईपीआर आणि डीएसआयएम च्या परिक्षा १६ जुलै २०२३ ला आयोजित केल्या जातील.

शैक्षणिक पात्रताआरबीआय ग्रेड बी-जनरल पदासाठी ६०% गुणांसह बॅचलर पदवी मिळवणे गरजेचे आहे. तर, डीईपीआर आणि डीएसआयएम पदासाठी उमेदवाराने पदव्युत्तर असणे आवश्यक आहे. शैक्षणिक पात्रतेबाबत अधिक माहितीसाठी उमेदवारांनी बँकेच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी.

वयोमर्यादाआरबीआय ग्रेड बी भरतीसाठी उमेदवाराची वयोमर्यादा १ मे २०२३ ला २१ वर्ष ते ३० वर्षातंर्गत असणे आवश्यक आहे. आरक्षित वर्गातील उमेदवारांना उच्च वयोमर्यादेतमध्ये सुट देण्यात आली.

अर्ज कसा करावा१) आधिकारिक वेबसाइट opportunities.rbi.org.in ला भेट द्या.२) रिक्त पदांवर जा आणि ग्रेड B साठी लिंकवर क्लिक करा.३) आयबीपीएस पोर्टलवर नोंदणी करा.४) फॉर्म भरा, फी भरा आणि फॉर्म सबमिट करा.५) पुढील माहितीसाठी प्रिंटआउट घ्या.

टॅग्स :Reserve Bank of Indiaभारतीय रिझर्व्ह बँकjobनोकरीbankबँक