शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
4
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
5
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
6
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
7
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
8
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
9
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
10
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
11
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
12
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
13
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
14
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
15
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
16
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
17
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
18
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
19
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
20
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

RBI Recruitment: रिझर्व्ह बँकेत ऑफिसर पदांसाठी भरती, १ लाख पगार! कोण करू शकतं अर्ज?

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 9, 2025 16:02 IST

Bank Job 2025: बँकेत नोकरी करण्यासाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांसाठी आनंदाची बातमी आहे.

बँकेत नोकरी करण्यासाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांसाठी आनंदाची बातमी आहे. भारतीय रिझर्व्ह बँकने ऑफिसर पदासाठी नोकरीची जाहिरात प्रसिद्ध केली आहे. दरम्यान, १० सप्टेंबरपासून अर्ज प्रक्रियेला सुरुवात झाली असून ३० सप्टेंबर २०२५ (संध्याकाळी ६ वाजेपर्यंत) अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. त्यानंतर कोणत्याही उमेदवारांचे अर्ज स्वीकारले जाणार नाहीत. या नोकरीसाठी इच्छूक असणारे उमेदवार आरबीआयच्या अधिकृत वेबसाइटद्वारे ऑनलाइन अर्ज करू शकतात. 

या भरती अंतर्गत एकूण १२० पदे भरली जाणार आहेत, ज्यात ग्रेड बी अधिकारी:जनरल (जागा:८३)  ग्रेड बी अधिकारी: डीईपीआर (जागा-१७) आणि  ग्रेड बी अधिकारी: डीएसआयएम (जागा-२०) यांचा समावेश आहे. अधिक माहितीसाठी आरबीआयच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी.

शैक्षणिक पात्रता:जनरल: कोणत्याही विषयात किमान ६० टक्के गुणांसह पदवी किंवा कोणत्याही विषयात पदव्युत्तर पदवी.डीईपीआर: पदव्युत्तर पदवी ही अर्थशास्त्र/वित्त/पीजीडीएम/एमबीए पदवीमध्ये पदव्युत्तर पदवी असावी.डीएसआयएम: किमान ५५ टक्के गुणांसह सांख्यिकी/गणित विषयात पदव्युत्तर पदवी.

निवड प्रक्रिया:एकूण तीन टप्प्यात उमदेवारांची निवड केली जाईल. पहिल्या टप्प्यात उमेदवाराला पूर्वपरीक्षा होईल, यात उत्तीर्ण झालेले उमेदवार मुख्यपरीक्षेसाठी पात्र असतील. त्यानंतर उमेदवाराला मुलाखतीसाठी बोलवले जाईल. परीक्षेच्या पॅटर्नची माहिती अधिसूचनेत जाहीर केली जाईल.

अर्ज शुल्क:- सामान्य, ओबीसी, ईडब्ल्यूएस: ८५० + जीएसटी- एससी, एसटी, पीडब्ल्यूडी : १०० + जीएसटी- आरबीआय कर्मचारी: मोफत

पगार:दरमहा ५५ हजार २००- ते ९९ हजार ७५० रुपये पगार दिले जाणार आहे, इतर भत्ते देखील दिले जातील.

अर्ज कसा करायचा?- सर्वात प्रथम, आरबीआयची अधिकृत वेबसाइट rbi.org.in ला भेट द्या .- त्यानंतर होम पेजवरील Recruitment या पर्यायावर क्लिक करा.- पुढे RBI Assistant Recruitment 2023 वर क्लिक करा.- अप्लाय ऑनलाइनवर क्लिक करा आणि सर्व माहिती वाचा- आवश्यक कागदपत्रे, फोटो आणि स्वाक्षरी अपलोड करा.- अर्ज शुल्क भरा आणि फॉर्म भरल्यानंतर सबमिट बटणावर क्लिक करा.

टॅग्स :jobनोकरीReserve Bank of Indiaभारतीय रिझर्व्ह बँकGovernmentसरकार