शहरं
Join us  
Trending Stories
1
Monsoon Update : आनंदाची बातमी! वेळेआधीच मान्सून दाखल होणार? हवामान विभागाने दिली अपडेट
2
भारताची S-400 संरक्षण प्रणाली सुरक्षित: पीएम मोदींनी 'त्या' फोटोतून केली पाकिस्तानची पोलखोल
3
BJP District President: ६ विभागात ५८ जिल्हाध्यक्षांची नियुक्ती; भाजपानं दिली नव्या चेहऱ्यांना संधी, वाचा यादी
4
युद्धविरामानंतरही डिफेन्स स्टॉक्स तेजीत; PM मोदींच्या विधानाने बदललं गणित
5
बाबा वेंगा यांची पाकिस्तानबाबत धक्कादायक भविष्यवाणी! ६ वर्षापूर्वी अभ्यासात उल्लेख होता
6
पाकिस्तानला काही सुधरेना! सिंधू जल करारावरून परराष्ट्र मंत्र्यांची दर्पोक्ती; म्हणे, तर युद्धविराम भंग होऊ शकतो!
7
Mumbai Metro 3: तुम्हाला माहित्येय का? सिद्धिविनायक मेट्रो स्टेशनला आहेत एकूण 7 Entry-Exit मार्ग, जाणून घ्या...
8
CBSE बोर्डाचा १०वीचा निकाल जाहीर! गेल्या वर्षींपेक्षा जास्त विद्यार्थी उत्तीर्ण, मुली मुलांपेक्षा वरचढ
9
एका झटक्यात चांदी २२५५ रुपयांनी महागली, सोन्याच्या दरातही मोठी तेजी; खरेदीपूर्वी नवे दर
10
Swapna Shastra: पाण्याशी संबंधित कोणतेही स्वप्नं आगामी सुख दु:खाची देतात चाहूल; कशी ते पहा!
11
Operation Keller: सुरक्षा दलाची मोठी कारवाई; जम्मू-काश्मीरमध्ये लष्कर-ए-तैयबाचे 3 दहशतवादी ठार
12
घरची कामं करा अन् फिट राहा; केर काढा, लादी पुसा, कपडे धुवा... पाहा किती कॅलरी होतात बर्न?
13
'ऑपरेशन सिंदूर'नंतर रशियाची भारताला मोठी ऑफर; पाकिस्तानसह अमेरिकेचीही झोप उडवणार
14
Viral Video : प्रियकराचं लागत होतं लग्न, ऐन मुहूर्तावर झाली प्रेयसीची एंट्री; पुढं काय झालं बघाच!
15
पाकिस्तानला पाठिंबा देणाऱ्या तुर्कस्थानचा बहिष्कार? भारत कोणत्या वस्तू आयात करतो?
16
सर्वोच्च न्यायलयाने फेटाळला दिल्लीतील व्यावसायिकाचा जामीन अर्ज,ड्रग्ज आणि लष्कर-ए-तोयबाशी आहे कनेक्शन!
17
बारावी नापास डॉक्टर! रुग्णांच्या जीवाशी खेळ; क्लिनिक उघडून मोठे आजार बरे करण्याचा दावा
18
पंतप्रधान मोदींनी आदमपूर एअरबेस का निवडला? एकाच झटक्यात पाकिस्तानची खोट्याची ८ मिसाईल पाडली...
19
डिफेन्समध्ये का आहे तेजी? घसरत्या बाजारातही HAL आणि BEL मध्ये खरेदीदारांची रांग; कारण आहे खास
20
'भूत बंगला'मध्ये अक्षय कुमारसोबत स्क्रीन शेअर करणार 'हा' अभिनेता, फोटो पोस्ट करत म्हणाला...

Recruitment: भारतीय लष्करात भरती होण्याची संधी; नेमकं काम काय? कोण करू शकतं अप्लाय? कधी? आणि कसं?... इथे वाचा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 13, 2025 17:20 IST

Indian Army Recruitment: या भरतीसाठी अर्ज प्रक्रिया सुरू झाली असून २८ मे २०२५ अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. त्यानंतर कोणत्याही उमेदवारांचे अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.

भारतीय लष्करात नोकरी करण्यासाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांसाठी सुवर्णसंधी आहे. इंडियन मिलिटरी अकादमी जानेवारी २०२६ मध्ये १४२ वा टेक्निकल ग्रॅज्युएट कोर्स सुरू करणार आहे. या अभ्यासक्रमाद्वारे शॉर्टलिस्टेड अभियांत्रिकी पदवीधरांना भारतीय सैन्यात अधिकारी म्हणून नोकरी मिळेल. या भरतीसाठी अर्ज प्रक्रिया सुरू झाली असून २८ मे २०२५ अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. त्यानंतर कोणत्याही उमेदवारांचे अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.

या भरती अंतर्गत एकूण ३० जागा भरल्या जाणार आहेत, ज्यात सिव्हिल इंजिनिअरिं- ८ जागा,  संगणक विज्ञान/आयटी- ६ जागा, इलेक्ट्रॉनिक्स- ६ जागा, मेकॅनिकल- ६ जागा, इलेक्ट्रिकल- २ जागा आणि इतर २ जागांचा समावेश आहे. 

कोण करू शकते अर्ज?- भारतीय नागरिक किंवा नेपाळी नागरिक किंवा भारतीय वंशाचे लोक जे विशिष्ट देशांमधून भारतात कायमचे स्थायिक होण्यासाठी स्थलांतरित झाले आहेत.- उमेदवार बी.ई./बी.टेक पदवीधर किंवा अभियांत्रिकीच्या अंतिम वर्षात आहे.- उमेदवाराचे वय २० ते २७ दरम्यान आहे आणि तो अविवाहित आहे.

निवड प्रक्रियाशैक्षणिक गुणवत्तेनुसार आणि अभियांत्रिकी शाखेनुसार कटऑफ टक्केवारी निश्चित केली जाते. त्यानंतर उमेदवाराची मुलाखत आणि वैद्यकीय तपासणी केली जाईल. या सर्व कामगिरीच्या आधारावर उमेदवाराची निवड केली जाईल. या भरतीसंदर्भात अधिक माहिती जाणून घेण्यासाठी इच्छुक उमेदवारांनी भारतीय लष्कराची अधिकृत वेबसाईट joinindianarmy.nic.in वर भेट द्यावी.

टॅग्स :jobनोकरीIndian Armyभारतीय जवान