शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

पासपोर्ट ऑफिसर बनण्याची संधी, १.५ लाख पगार; कुठे आणि कसा कराल अर्ज? वाचा...

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 2, 2022 15:11 IST

पदवी पर्यंतचं शिक्षण पूर्ण केलेल्या उमेदवारांसाठी सरकारी नोकरीची सुवर्णसंधी आहे. पासपोर्ट ऑफीसमध्ये भरती केली जात आहे. परराष्ट्र मंत्रालयाकडून पासपोर्ट ऑफीसर पदासाठी जागा भरल्या जात आहेत.

पदवी पर्यंतचं शिक्षण पूर्ण केलेल्या उमेदवारांसाठी सरकारी नोकरीची सुवर्णसंधी आहे. पासपोर्ट ऑफीसमध्ये भरती केली जात आहे. परराष्ट्र मंत्रालयाकडून पासपोर्ट ऑफीसर पदासाठी जागा भरल्या जात आहेत. दिल्ली, मुंबई, कोलकातापासून हैदराबाद, नागपूर, मदुराईसह एकूण २१ शहरांमध्ये भरती (Passport Officer Recruitment 2022 ) निघाली आहे. 

नोकरीसाठी ऑफलाइन पद्धतीनं अर्ज करायचा आहे. नोकरी मिळताच पगारही भरघोस मिळणार आहे. पासपोर्ट ऑफीसच्या अधिकृत वेबसाइटवर म्हणजेच passportindia.gov.in या संकेतस्थळावर जाऊन नोकरीबाबतची संपूर्ण माहिती मिळवू शकता. भारत सरकारकडून नोकरीसाठीचं नोटिफिकेशन जारी करण्यात आलं असून परराष्ट्र मंत्रालयाअंतर्गत पासपोर्ट ऑफीसर आणि डेप्युटी ऑफीसर पदासाठी जागा भरल्या जाणार आहेत. कोणकोणत्या शहरात किती जागा आणि पगार किती ते जाणून घ्या...

कोणकोणत्या शहरात भरती>> मदुराई- १ जागा (या ठिकाणी पासपोर्ट ऑफीसर पदासाठी जागा आहे) इतर सर्व ठिकाणी डेप्युटी पासपोर्ट ऑफीसर पदासाठी भरती केली जाणार आहे. 

>> अमृतसर, बरेली, जालंधर, जम्मू, नागपूर, पणजी, रायपूर, शिमला, श्रीनगर, सरत या शहरांसाठी एकूण १० जागा. प्रत्येक शहरात एक जागा भरली जाणार आहे. 

>> अहमदाबाद- १ जागा>> चंदीगड- १ जागा>> दिल्ली- २ जागा>> गुवाहाटी- १ जागा>> हैदराबाद- १ जागा>> जयपूर- १ जागा>> कोलकाता- २ जागा>> कोझिकोड- १ जागा>> मुंबई- २ जागा>> पुणे- १ जागा

Passport Officer Salary पगार किती?पासपोर्ट ऑफिसरचा पगार लेव्हल १२ अनुसार असणार आहे. पे स्केल ७८,८०० रुपयांपासून २.०९ लाख रुपये दरमहा इतका असणार आहे. याशिवाय DA, HRA सह इतर भत्तेही दिले जाणार आहेत. सर्वांचा हिशोब करायचा झाला तर पासपोर्ट ऑफीसरचा सुरुवातीचा पगार दरमहा १.५० लाख रुपये इतका असेल. तर डेप्युटी पासपोर्ट ऑफीसरबाबत बोलायचं झालं तर यांना लेव्हल ११ नुसार पगार दिला जाणार आहे. पे स्केल ६७,७०० रुपये ते २.८ लाख रुपये दरमहा पगार मिळू शकतो. म्हणजेच सुरुवातीचा पगार १.३० लाख रुपये दरमहा इतका असेल. 

Passport Office Job साठी कसा अर्ज कराल?ऑनलाइन पद्धतीनं नोकरीसाठी अर्ज दाखल करण्यासाठी तुम्हाला पुढील लिंकवर क्लिक करता येईल. यात तुम्हाला नोकरीबाबतची संपूर्ण माहिती उपलब्ध आहे. तसंच फॉर्म आणि बायोटेडाटा फॉरमॅट देखील यात नमूद करण्यात आला आहे. येथे क्लिक करा

टॅग्स :passportपासपोर्टIndiaभारतjobनोकरी