शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेच्या ४८ जागा, ५० हजारांपेक्षा कमी फरक; २०१९ च्या सार्वत्रिक निवडणुकीवर काँग्रेसचा मोठा दावा
2
'ओबीसी समाज श्रीमंत मराठ्यांविरोधात जाऊ नये, हाच शरद पवारांच्या मंडळ यात्रेचा हेतू'; प्रकाश आंबेडकरांचा टोला
3
'मतचोरी' विरोधात इंडिया आघाडीचे उद्या शक्तिप्रदर्शन, राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली खासदार संसदेपासून निवडणूक आयोगाच्या कार्यालयापर्यंत मोर्चा काढणार
4
Rahul Gandhi : राहुल गांधींसमोरील अडचणी वाढणार? शकुन राणीला 'डबल व्होटर' म्हणून फसले; आयोगाने बजावली नोटीस
5
'बुडायला लागलो तर अर्धे जग सोबत घेऊन जाणार'; पाकिस्तानची भारताला पुन्हा अणु हल्ल्याची धमकी!
6
रामदास आठवले महाराष्ट्र भाजपवर नाराज; थेट पीएम मोदींकडे केली तक्रार, कारण काय?
7
ब्रिटनच्या F-35B विमानामागचं शुक्लकाष्ठ सुटेना, आता या देशात करावं लागलं आपातकालीन लँडिंग
8
मनी लॉंड्रिंगप्रकरणी रॉबर्ट वाड्रांच्या अडचणीत वाढ; दोन कंपन्यांद्वारे ५८ कोटी रुपये कमावल्याचा आरोप
9
"जेव्हा देशासाठी निवड होते, तेव्हा..."; मराठमोळ्या 'वर्ल्ड चॅम्पियन'ने जसप्रीत बुमराहला सुनावलं
10
मासे खरेदी करण्यावरून दोन गटांमध्ये तुफान राडा, एकमेकांना लाथा-बुक्क्यांनी मारले
11
टस्कर हत्तीने भिंत फाेडून घरात केला प्रवेश; जीवनावश्यक साहित्याची नासधूस, छत्तीसगड सीमेलगतच्या मंजिगड टाेला येथील घटना
12
फक्त १२७९ रुपयांत करा हवाई प्रवास; Air India ने आणली खास ऑफर, जाणून घ्या डिटेल...
13
मत चोरीच्या मुद्यावरुन लक्ष वळवण्याचा प्रयत्न; हवाई दल प्रमुखांच्या वक्तव्यावर काँग्रेस नेत्याची टीका
14
IPS वडिलांनी कॉन्स्टेबलला बडतर्फ केलं, त्यांच्याच मुलीने कोर्टात खटला लढवून पुन्हा सेवेत घेतलं; नेमकं प्रकरण काय?
15
रोहित शर्मा, विराट कोहलीची वनडे क्रिकेटमधूनही लवकरच निवृत्ती? गौतम गंभीरचे विधान व्हायरल
16
धक्कादायक! तीन मुलांसह आईने संपवलं जीवन, लेकरांना पोटाला बांधलं आणि… 
17
विठुमाऊलीच्या मंदिरात मायमराठीची उपेक्षा, गुरुजींनी हिंदीत सांगितली पूजा? पोस्ट व्हायरल
18
इयत्ता तिसरीतील मुलीवर वर्गमित्राकडून अत्याचार; बाभुळगाव तालुक्यातील घटना
19
AAI JE Recruitment 2025 : विमानतळावर नोकरीची संधी! एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाने जाहीर केली बंपर नोकरभरती
20
'मत चोरी'ची तक्रार करण्यासाठी राहुल गांधींनी जारी केली वेबसाइट; नागरिकांना केले आवाहन...

आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 26, 2025 17:04 IST

२०२५च्या प्लेसमेंट सीझनमध्ये एलपीयूच्या विद्यार्थ्यांनी मिळवलेल्या नोकरीच्या संधी आणि त्यांना देण्यात आलेले पगार सर्वांचे लक्ष वेधून घेत आहेत.

इंजिनीअरिंग क्षेत्रात चांगल्या नोकऱ्या मिळवण्याची संधी हवी असेल, तर आयआयटी सारख्या नामांकित संस्थांचीच नावे अग्रक्रमाने घेतली जातात. पण, आता पंजाबमधील 'लवली प्रोफेशनल युनिव्हर्सिटी' (LPU) हे चित्र बदलताना दिसत आहे. एलपीयूचे विद्यार्थीही आता आयआयटीच्या विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या ऑफर्सना टक्कर देत आहेत, किंबहुना काही बाबतीत त्याहूनही पुढे जात आहेत. २०२५च्या प्लेसमेंट सीझनमध्ये एलपीयूच्या विद्यार्थ्यांनी मिळवलेल्या नोकरीच्या संधी आणि त्यांना देण्यात आलेले पगार सर्वांचे लक्ष वेधून घेत आहेत.

एलपीयूच्या विद्यार्थ्याला २.५ कोटींचे विक्रमी पॅकेज!

यंदाच्या वर्षी म्हणजेच २०२५च्या प्लेसमेंट सीझनमध्ये एलपीयूच्या बी.टेक इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन इंजिनीअरिंग (ECE) विभागाचा विद्यार्थी श्री विष्णू याला एका आघाडीच्या रोबोटिक्स आणि ऑटोमेशन कंपनीकडून तब्बल २.५ कोटी (वार्षिक) रुपयांचे पॅकेज ऑफर करण्यात आले आहे. भारतातील कोणत्याही इंजिनीअरिंगच्या विद्यार्थ्याला मिळालेले हे या वर्षातील सर्वात जास्त पॅकेजेसपैकी एक आहे.

याशिवाय, याच विभागातील आणखी एक विद्यार्थी बेटिरेड्डी नाग वामसी रेड्डी याला एका मोठ्या एआय (आर्टिफिशियल इंटेलिजन्स) रोबोटिक्स कंपनीकडून ११८,००० डॉलर्स म्हणजेच तब्बल १.०३ कोटींची ऑफर मिळाली आहे. या यशामुळे आता हुशार आणि कुशल इंजिनीअर शोधणाऱ्या कंपन्यांसाठी एलपीयू एक महत्त्वाचे ठिकाण बनत आहे.

मोठ्या प्रमाणात प्लेसमेंट्सची संधी! 

एलपीयूने यंदा तब्बल ७२०४ विद्यार्थ्यांना नोकऱ्यांच्या ऑफर्स दिल्या आहेत. यापैकी १६०२ विद्यार्थ्यांना दोनपेक्षा जास्त ऑफर्स मिळाल्या आहेत. टॉप २५% विद्यार्थ्यांना सरासरी पगार जवळपास १०.२३ लाख प्रति वर्ष इतका पगार ऑफर करण्यात आला आहे. मायक्रोसॉफ्ट, अमेझॉन, सर्व्हिसनाऊ यांसारख्या नामांकित कंपन्या एलपीयूच्या प्लेसमेंट कॅम्पसला भेट देत आहेत.

एका विद्यार्थ्याने मिळवल्या ७ ऑफर्स!

आदिरेड्डी वासू या विद्यार्थ्याने एकाच वेळी ७ कंपन्यांकडून ऑफर मिळवून एक वेगळाच विक्रम प्रस्थापित केला आहे. एलपीयूच्या अलीकडील प्लेसमेंट डेटामध्ये जगातील आघाडीच्या तंत्रज्ञान कंपन्यांची नावे दिसली आहेत. विद्यार्थ्यांना सायबर सुरक्षा, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, क्लाउड इंजिनीअरिंग यांसारख्या अत्याधुनिक क्षेत्रांमध्ये महत्त्वाच्या नोकऱ्या मिळाल्या आहेत. या महत्त्वपूर्ण पदांसाठी उच्च तांत्रिक आणि विश्लेषणात्मक कौशल्याची आवश्यकता असते. यंदा मायक्रोसॉफ्टने ५२.२० लाख आणि ॲमेझॉनने ४६.९४ लाखांचे पॅकेज देऊन विद्यार्थ्यांना मोठ्या संधी दिल्या आहेत.

मोठ्या कंपन्यांकडून सामूहिक भरती

एलपीयूच्या प्लेसमेंट कॅम्पसमध्ये कॅपजेमिनीने ७००हून अधिक, माइंडट्रीने ४२०हून अधिक, कॉग्निझंटने ४००हून अधिक, तर एसेंचर आणि टीसीएसने प्रत्येकी २५० हून अधिक विद्यार्थ्यांना नोकरी देऊ केली आहे. 

जगभरातून घेतली जातेय दखल

एलपीयूने हळूहळू जागतिक स्तरावर आपली ओळख निर्माण केली आहे. एलपीयूचे पदवीधर आता यूएसए, यूके, ऑस्ट्रेलिया आणि युरोपमधील प्रसिद्ध कंपन्यांमध्ये काम करत आहेत. यातील अनेकांना १ कोटींपेक्षा अधिकची पॅकेजेस मिळाली आहेत. रोबोटिक्स, ऑटोमेशन, ईसीई, सीएसई आणि मेकॅनिकल इंजिनीअरिंगसारख्या मुख्य शाखांमधील विद्यार्थ्यांना देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय संधीमध्ये प्राधान्य मिळत आहे.

केवळ आयआयटीच नाही आता एलपीयूही महत्त्वाची दावेदार!

एलपीयूने प्लेसमेंटमध्ये मिळवलेल्या या यशामागे त्यांच्या 'एज्युरेव्होल्यूशन' (EduRevolution) या उपक्रमाचा मोठा वाटा आहे. या उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांना पदवीच्या दुसऱ्या वर्षापासूनच इंडस्ट्री ट्रेनिंग, सर्टिफिकेशन आणि प्लेसमेंटचे विशेष प्रशिक्षण दिले जाते.

या विषयी बोलताना एलपीयूचे संस्थापक कुलगुरू आणि राज्यसभा खासदार डॉ. अशोक कुमार मित्तल म्हणाले की, "एलपीयूमध्ये आम्ही विद्यार्थ्यांना केवळ नोकरीसाठी तयार करत नाही, तर त्यांना नेतृत्व करण्यासाठी, नवनवीन शोध लावण्यासाठी आणि बदल घडवण्यासाठी तयार करतो."

विद्यापीठाचा हाच उपक्रम एलपीयूला भारतातील इंजिनीअरिंग शिक्षण आणि प्लेसमेंट क्षेत्रात एक महत्त्वाचा दावेदार म्हणून समोर आणत असून, आता एलपीयू देशातील सर्वात प्रतिष्ठित संस्थांनाही तगडी टक्कर देत आहे.

एलपीयूमध्ये प्रवेश घ्यायचाय? आताच टाका पुढचे पाऊल!

यंदाच्या वर्षी म्हणजेच २०२५मध्ये जर तुम्हाला एलपीयूमध्ये प्रवेश घ्यायचा असेल, तर आता अ‍ॅडमिशन घेण्यासाठी शेवटचे काही दिवस उरले आहेत. जर तुम्हालाही जगभरात यशस्वी करिअर करायचे असेल, तर या संधीचा नक्की फायदा करून घ्या. या संदर्भात अधिक माहिती मिळवण्यासाठी आणि अर्ज भरण्यासाठी तुम्ही https://bit.ly/3HzhSjF ला भेट देऊ शकता.