शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
6
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
7
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
8
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
9
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
10
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
11
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
12
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
13
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
14
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
15
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
16
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
17
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
18
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
19
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
20
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
Daily Top 2Weekly Top 5

NCL Recruitment 2021: नॉर्दर्न कोलफील्ड्समध्ये १५०० जागांवर भरती; अर्ज करण्यासाठीची अंतिम तारीख जवळ, जाणून घ्या...

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 28, 2021 14:27 IST

NCL Recruitment 2021: इयत्ता ८ वी आणि १० वीनंतर सरकारी नोकरी मिळणं हे तर आता एक स्वप्नच होऊन बसलं आहे. पण हेही स्वप्न आता खरं होणार आहे.

NCL Recruitment 2021: इयत्ता ८ वी आणि १० वीनंतर सरकारी नोकरी मिळणं हे तर आता एक स्वप्नच होऊन बसलं आहे. पण हेही स्वप्न आता खरं होणार आहे. कारण नॉर्दर्न कोलफील्ड्स लिमिटेड (NCL) कंपनीनं अॅप्रेंटिसपदांवर नोकर भरतीची घोषणा केली आहे. यानुसार एकूण १५०० जागांवर नोकरभरती केली जाणार आहे. यात इच्छुक उमेदवारांना अर्ज दाखल करण्यासाठी nclcil.in या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी लागेल. (NCL Recruitment 2021 vacancy for Apprentice post in Northern Coalfields Limited)

नॉर्दर्न कोलफील्ड्स लिमिटेडनं (Northern Coalfields Limited)जारी केलेल्या नोटिफिकेशननुसार १५०० पदांच्या भरतीसाठीचा अर्ज करण्याची प्रक्रिया १० जून २०२१ पासूनच सुरू झाली आहे. यात उमेदवारांना अर्ज दाखल करण्यासाठीची अंतिम तारीख ९ जुलै २०२१ पर्यंत देण्यात आली आहे. इच्छुक उमेदवारांना नॉर्दर्न कोलफील्ड्स लिमिटेड कंपनीसोबत काम करण्याची संधी मिळणार आहे. इच्छुक उमेदवारांनी nclcil.in वर जाऊन अर्ज दाखल करता येणार आहे. 

कोणत्या पदांवर भरती?नॉर्दर्न कोलफील्ड्स लिमिटेडमध्ये १५०० जागांवर भरती केली जाणार असून यात वेल्डरसाठी १०० जागा, फिटरसाठी ८०० जागा, इलेक्ट्रिशनसाठी ५०० जागा आणि मोटर मॅकेनिकपदासाठी १०० जागा आहेत. यात खुल्यावर्गासाठी ७६२ जागा, ओबीसी प्रवर्गासाठी २२५ जागा, अनुसूचित जातीसाठी २१३ जागा आणि अनुसूचित जमातीसाठी ३०० जागा राखीव असणार आहेत. याशिवाय पीडब्ल्यूडी श्रेणीत येणाऱ्या उमेदवारांसाठी ६० जागा आहेत. 

उमेदवाराची पात्रता काय असावी?वेल्डर पदासाठी कोणत्याही मान्यताप्राप्त शाळेतून इयत्ता आठवी आणि आयटीआयचं शिक्षण पूर्ण केलेलं असावं. तर इलेक्ट्रिशनपदासाठी कोणत्याही मान्यताप्राप्त बोर्डातून इयत्ता १० वीपर्यंतचं शिक्षण आणि आयटीआयचं शिक्षण घेतलेलं असणं गरजेचं आहे. यात यूपी आणि एमपी बोर्डाचे उमेदवार देखील अर्ज दाखल करू शकतात. याशिवाय फिटर पदासाठी देखील इयत्ता १० वी आणि आयटीआयचं शिक्षण घेतलेल्या उमेदवारांना अर्ज करता येणार आहे. 

वयाची अटनॉर्दर्न कोलफील्डकडून जारी करण्यात आलेल्या पत्रकानुसार उमेदवाराचं वय १६ वर्षांपेक्षा अधिक आणि २४ वर्षांपेक्षा कमी असणं गरजेचं आहे. तर आरक्षित असलेल्या जागांसाठी वयाच्या अटीत शिथिलता देण्यात आली आहे. या पदांवर उमेदवारांची मेरिटच्या आधारे नियुक्ती केली जाईल. शॉर्ट लिस्ट करण्यात येणाऱ्या उमेदवारांना वैद्यकीय चाचणी आणि कागदपत्र पडताळणीला सामोरं जावं लागणार आहे. त्यानंतरच संबंधित उमेदवाराची नियुक्ती केली जाईल. 

टॅग्स :jobनोकरीCareer Guidanceकरिअर मार्गदर्शन