शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

Job Alert: संरक्षण मंत्रालयात नोकरीची सुवर्णसंधी, विविध पदांवर बंपर भरती; जाणून घ्या कसा कराल अर्ज

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 12, 2021 17:45 IST

MOD Recruitment 2021 : इयत्ता १० वी आणि १२ वी उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांना सरकारी नोकरीची सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे

MOD Recruitment 2021 : इयत्ता १० वी आणि १२ वी उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांना सरकारीनोकरीची सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे. देशाच्या संरक्षण मंत्रालयाअंतर्गत येणाऱ्या विविध विभागांमध्ये नोकर भरतीसाठीचं नोटिफिकेशन जारी करण्यात आलं आहे यात संरक्षण मंत्रालयाच्या केसी/ओ ५६, एपीओसाठी ४१ फील्ड अॅम्युनेशन डेपोमध्ये एकूण ४५८ पदावर भरती केली जाणार आहे. 

संरक्षण मंत्रालयाच्या अखत्यारित येणाऱ्या या विविध विभागांमध्ये भरतीसाठीची जाहिरात १० जुलै ते १६ जुलै दरम्यान विविध वृत्तपत्रांमध्येही प्रकाशित करण्यात येत आहे. यात ट्रेड्समॅन मेट आणि एमटीएस सारख्या पदांवर भरती केली जाणार आहे. नोकरीसाठी इच्छुक उमेदवारांना संरक्षण विभागाच्या अधिकृत वेबसाइटवर जाऊन अर्ज दाखल करावा लागणार आहे. त्याआधी नोकर भरतीसाठीचे नोटिफिकेशन संपूर्ण वाचून घेणं गरजेचं आहे. 

इच्छुक उमेदवारांना indianarmy.nic.in या वेबसाइटला भेट द्यावी लागणार आहे. यावर अर्जाचा फॉर्म भरुन तुम्ही नोकरीसाठी आपला अर्ज दाखल करू शकता. अर्जासोबत लागणाऱ्या कागदपत्रांचीही माहिती त्यात देण्यात आली आहे. ही कागदपत्र अर्जदारांना ऑफलाइन पद्धतीनं पोस्टाच्या माध्यमातून पाठवावी लागणार आहेत. इच्छुकांना ३० जुलै २०२१ पर्यंत अर्ज दाखल करता येणार आहे. अर्ज पोस्टानं पाठवताना ते कमांडेंट, ४१ फील्ड अॅम्यूनिशेन डेपो, पिन-९०९७४१ या पत्तावर पाठवावं लागणार आहे. स्पीड पोस्ट करण्याचा पर्याय उपलब्ध आहे. 

कोणत्या पदांवर भरती?१. ट्रेड्समॅन मेट (मजूर)- ३३० जागा, पात्रता- १० वी उत्तीर्ण२. जेओए (एलडीसी)- २० जागा, पात्रता- १२ वी पास३. मटेरियल असिस्टंट (एमए)- १९ जागा, पात्रता- पदवीधर किंवा मटेरिअल मॅनेजमेंट विभागात डिप्लोमा४. एमटीएस- ११ जागा, पात्रता- १० वी उत्तीर्ण५. फायरमॅन- ६४ जागा, पात्रता- १० वी उत्तीर्ण६. २५५ (आय), एबीओयू ट्रेड्समॅन मेट (मजूर)- १४ जागा, पात्रता- १० वी उत्तीर्ण

वयाची अटनोकरीसाठी अर्ज दाखल करणाऱ्या उमेदवाराचं वय कमीतकमी १८ वर्ष तर जास्तीत जास्त २५ वर्ष असणं गरजेचं आहे. २५ वर्षांपेक्षा अधिक वय असलेले उमेदवार अर्ज दाखल करू शकत नाहीत. दरम्यान आरक्षित प्रवर्गासाठी वयोमर्यादेत सूट देण्यात आली आहे. 

टॅग्स :jobनोकरीGovernmentसरकारDefenceसंरक्षण विभागCareer Guidanceकरिअर मार्गदर्शन