शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

कृषी क्षेत्रात नोकऱ्याच नोकऱ्या! तब्बल १.१० कोटी युवकांना दिली संधी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 26, 2022 06:29 IST

इतर क्षेत्रात नोकऱ्या जात असताना कृषी क्षेत्राने दिल्या १.१० कोटी जणांना संधी

नवी दिल्ली : कोरोनामुळे जेव्हा भारतीय अर्थव्यवस्था प्रचंड हेलकावे खात होती आणि कोट्यवधी लोकांच्या नोकऱ्या हातातून गेल्या त्यावेळी कृषी क्षेत्राने लोकांच्या जखमेवर मलम लावण्याचे काम केले. गेल्या ३ वर्षांत कृषी क्षेत्राने १.१० कोटी अतिरिक्त लोकांना नोकरीची संधी दिली असून या दरम्यान देशाच्या अन्य सर्व क्षेत्रांतील मिळून १.५० कोटींपेक्षा अधिक लोकांची नोकरी गेली होती. सीएमआयईच्या कंज्युमर पिरामिड हाऊसहोल्ड सर्वेक्षणानुसार २०२१-२२ मध्ये कृषी क्षेत्राने ४५ लाख नवे रोजगार निर्माण केले.

कृषी क्षेत्राने असा दिला अधिक रोजगार

२.१७कोटी लोक २०२०-२१ मध्ये बेरोजगार झाले. मात्र, याचवेळी कृषी क्षेत्रात ३४ लाख रोजगार वाढले. ३.३% दराने कोरोनात २०२०-२१ मध्ये कृषी क्षेत्राची वाढ झाली. तर अर्थव्यवस्थेमध्ये ६.३%ची घसरण झाली. ५.५% दराने २०१९-२० मध्ये कृषी क्षेत्राची वाढ झाली तर इतर क्षेत्राची वाढ केवळ ३.३ टक्के दराने झाली. २५-३०% खाद्य पदार्थांच्या किमती गेल्या ३ वर्षांत वाढल्या. यामुळे शेतकऱ्यांना काही प्रमाणात फायदा झाला. रसायने आणि खतांमुळे अन्नधान्याचा उत्पादन खर्च वाढला आहे. यामुळे सध्या नैसर्गिक शेती ही काळाची गरज आहे. भारत आता गहू व तांदूळ निर्यात करणारा देश बनला आहे. अकार्यक्षम पुरवठा साखळी आणि कमी संपर्क यामुळे देशाची कृषी क्षेत्राची उत्पादकता कमी आहे. - अमिताभ कांत, मुख्य कार्यकारी अधिकारी, नीती आयोग

शेतकरी सकारात्मक

कृषी क्षेत्राच्या विकासाबाबत शेतकरी अद्यापही आशावादी आहेत. १८.१% शेतकऱ्यांची सेंटीमेंट (भावना) मार्च २०२२ मध्ये सकारात्मक राहिली आहे, जी गेल्या वर्षाच्या तुलनेत अधिक आहेत. १६.१%एवढा प्रमुख व्यावसायिकांचा सकारात्मकतेचा निर्देशांक राहिला आहे. अहवालानुसार कोरोनात देशाच्या कृषी क्षेत्राला सर्वात कमी फटका बसला.

टॅग्स :agricultureशेती