शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
3
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
4
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
5
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
6
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
7
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
8
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
9
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
10
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
11
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
12
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
13
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
14
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
15
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
16
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
17
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
18
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
19
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
20
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
Daily Top 2Weekly Top 5

ISRO मध्ये स्टेनोग्राफरसह अनेक पदांवर रिक्त जागा; पदवीधर करू शकतात अर्ज, जाणून घ्या वेतन 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 20, 2022 23:28 IST

अर्ज करण्यासाठी उमेदवार इस्रोच्या अधिकृत वेबसाइट isro.gov.in ला भेट देऊन अर्ज करू शकतात.

नवी दिल्ली : सरकारी नोकरी करण्याची इच्छा असणाऱ्यांसाठी एक उत्तम संधी चालून आली आहे. भारतीय अंतराळ संशोधन संस्था अर्थात इस्रोच्या सेंट्रलाइज्ड रिक्रूटमेंट बोर्डने बंपर रिक्त पदांसाठी अधिसूचना जारी केली आहे. जारी करण्यात आलेल्या अधिसूचनेनुसार, एकूण 526 पदांवर भरती केली जाणार आहे. या पदासाठी तुम्ही ऑनलाइन अर्ज करू शकता. अर्ज करण्यासाठी उमेदवार इस्रोच्या अधिकृत वेबसाइट isro.gov.in ला भेट देऊन अर्ज करू शकतात.

इस्रोने जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, या भरतीसाठी अर्ज प्रक्रिया आजपासून म्हणजेच 20 डिसेंबर 2022 पासून सुरू झाली आहे. यामध्ये अर्ज करण्यासाठी उमेदवारांना 09 जानेवारी 2023 पर्यंत मुदत देण्यात आली आहे. या रिक्त पदांद्वारे असिस्टंट, ज्युनिअर पर्सनल असिस्टंट, अप्पर डिव्हिजन क्लर्क आणि स्टेनोग्राफर यांची रिक्त पदे भरण्यात येणार आहेत.

ISRO Vacancy असा करा अर्ज...स्टेप 1- ऑनलाइन अर्ज करण्यासाठी सर्वात आधी अधिकृत वेबसाइट- isro.gov.in वर जा.स्टेप 2 - वेबसाइटच्या होम पेजवर ICRB च्या लिंकवर जा.स्टेप 3 - यानंतर ISRO Assistant, UDC, Stenographer, JPA Recruitment 2022 Apply Online च्या लिंकवर क्लिक करा ऑनलाइन अर्ज करा.स्टेप 4 - आता Apply Online च्या लिंकवर क्लिक करा.स्टेप 5 - पुढील पेजवर विचारलेल्या डिटेल्सद्वारे रजिस्ट्रेशन करा.स्टेप 6 - रजिस्ट्रेशननंतर अॅप्लिकेशन फॉर्म  भरू शकता.स्टेप 7 - फॉर्म भरल्यानंतर प्रिंट घ्या.

पात्रता आणि वयया रिक्त पदांसाठी वेगवेगळ्या पात्रता ठेवण्यात आल्या आहेत. बहुतेक पदांसाठी अर्ज करण्यासाठी उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतील पदवीधर पदवी असणे आवश्यक आहे. अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाइटला भेट द्या आणि अधिसूचना पाहा. इस्रोने जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय 28 वर्षांपेक्षा कमी असावे. वयाची गणना 09 जानेवारी 2023 च्या आधारे केली जाईल. या रिक्त पदावरील पात्र उमेदवारांची निवड लेखी चाचणी आणि कौशल्य चाचणीद्वारे केली जाईल. निवड झाल्यानंतर, उमेदवाराला दरमहा 25,500 रुपये पगार मिळेल.

टॅग्स :isroइस्रोjobनोकरी