शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
5
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
6
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
7
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
8
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
9
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
10
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
11
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
12
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
13
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
14
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
15
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
16
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
17
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
18
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
19
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
20
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
Daily Top 2Weekly Top 5

12th Pass Jobs: इंडियन ऑईलमध्ये बंपर भरती; बारावी उत्तीर्ण तरूणांना सरकारी नोकरीची संधी!

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 30, 2025 13:16 IST

Indian Oil Corporation Limited Recruitment 2025: सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी चांगली बातमी आहे.

सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी चांगली बातमी आहे. इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेडने देशभरातील आपल्या विविध रिफायनरीजमध्ये एकूण २ हजार ७५५ प्रशिक्षणार्थी पदांसाठी भरतीची घोषणा केली. बारावी, आयटीआय किंवा डिप्लोमा पूर्ण केलेल्या उमेदवारांसाठी उद्योगात करिअर करण्याची ही एक सुवर्णसंधी आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवार आयओसीएलच्या अधिकृत वेबसाइट iocl.com ला भेट देऊन अर्ज करू शकतात.

आयओसीएलने रिफायनरीनुसार पदांचे वाटप केले आहे. पानिपत रिफायनरी, गुजरात रिफायनरी आणि मथुरा रिफायनरीमध्ये सर्वाधिक पदांची भरती केली जाणार आहे. पानिपत रिफायनरीला ७०७ पदे, गुजरात रिफायनरीला ५८३ पदे आणि मथुरा रिफायनरीला २८० पदे मिळाली आहेत. तर, दिगबोई, पारादीप, बरौनी, हल्दिया, बोंगाईगाव आणि गुवाहाटी येथील रिफायनरीजमध्येही महत्त्वाची पदे उपलब्ध आहेत. या भरतीसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख १८ डिसेंबर २०२५ आहे. त्यानंतर कोणत्याही उमेदवाराचे अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.

शैक्षणिक पात्रता आणि वयोमर्यादा

- उमेदवार मान्यताप्राप्त बोर्डातून १२वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.- संबंधित क्षेत्रात डिप्लोमा किंवा आयटीआय पदवी असणे आवश्यक आहे.-  या भरतीसाठी वयोमर्यादा १८ ते २४ वर्षे निश्चित करण्यात आली. तर, ओबीसी (२७ वर्षे), एससी आणि एससटी (२९ वर्षे) प्रवर्गातील उमेदवारांना वयोगटात सूट देण्यात आली.

अर्ज प्रक्रिया

- सर्वात प्रथम उमेदवारांनी  आयओसीएलच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी.- त्यानंतर 'आयओसीएल अप्रेंटिस भरती २०२५ ऑनलाइन अर्ज करा', या पर्यायावर क्लिक करा.- पुढे अर्ज भरा आणि त्यानंतर शुल्क भरून फॉर्म सबमिट करा.

निवड प्रक्रिया 

या पदांसाठी कोणतीही लेखी परीक्षा घेतली जाणार नाही. इंडियन ऑइलमध्ये निवड प्रक्रिया पूर्णपणे गुणवत्तेवर आधारित असेल.  शैक्षणिक गुणांच्या आधारावर गुणवत्ता यादी तयार केली जाईल. निवडलेल्या उमेदवारांची कागदपत्र पडताळणी केली जाईल. त्यानंतर वैद्यकीय चाचणी घेतली जाईल. वरील प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर अंतिम निवड केली जाईल.

प्रशिक्षण आणि स्टायपेंड

प्रशिक्षणार्थी पदांसाठी प्रशिक्षण कालावधी १२ ते २४ महिन्यांपर्यंत असेल. या कालावधीत, निवडलेल्या उमेदवारांना कंपनीच्या नियमांनुसार स्टायपेंड दिला जाईल.

English
हिंदी सारांश
Web Title : IOCL Recruitment 2025: Government Job Opportunity for 12th Pass Candidates

Web Summary : Indian Oil offers 2755 apprentice posts nationwide. 12th pass, ITI, diploma holders can apply by December 18, 2025, via iocl.com. Selection is merit-based; no exam. Stipend provided during training.
टॅग्स :jobनोकरी