शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
4
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
5
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
6
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
7
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
8
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
9
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
10
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
11
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
12
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
13
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
14
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
15
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
16
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
17
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
18
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
19
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
20
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
Daily Top 2Weekly Top 5

दहावी उत्तीर्णांसाठी रेल्वेत नोकरीची संधी, 1646 पदांसाठी भरती, उद्यापासून करा अर्ज

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 9, 2024 18:27 IST

उमेदवार 10 फेब्रुवारी 2024 पर्यंत ऑनलाइन अर्ज करू शकतात. 

नवी दिल्ली : भारतीय रेल्वेतनोकरीसाठी तयारी करणाऱ्या तरुणांसाठी एक आनंदाची बातमी आहे. रेल्वेने 1646 पदांसाठी भरतीसाठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे. उद्या, 10 जानेवारी 2024 पासून अर्ज प्रक्रिया सुरू होईल. उमेदवार 10 फेब्रुवारी 2024 पर्यंत ऑनलाइन अर्ज करू शकतात. 

अधिकृत वेबसाइट rrcjapur.in द्वारे अर्जाचा फॉर्म सबमिट करावा लागेल. ही भरती प्रकिया उत्तर पश्चिम रेल्वेने शिकाऊ पदांसाठी राबवली आहे. उमेदवारांनी जारी केलेल्या अधिसूचनेनुसारच अर्ज सादर करावा. नियमानुसार सादर केलेला अर्जच वैध असणार आहे. अर्ज पोस्टाने किंवा इतर मार्गाने सबमिट केले जाऊ शकत नाहीत.

कोण करू शकतं अर्ज?अर्ज करणाऱ्या उमेदवारांना 50 टक्के गुणांसह 10वी उत्तीर्ण असणे बंधनकारक आहे. याशिवाय, संबंधित ट्रेडमध्ये आयटीआय पदवी असणे आवश्यक आहे. आयटीआय पदवी नसलेले तरुण अर्ज करण्यास पात्र नाहीत.

वयोमर्यादा  अर्जदाराचे वय 15 ते 24 वर्षे दरम्यान असावे. एससी, एसटी आणि ओबीसी प्रवर्गातील उमेदवारांना कमाल वयोमर्यादेत सूट देण्यात आली आहे.

असा करावा अर्ज...- अधिकृत वेबसाइट rrcjapur.in वर जा.- येथे Recruitment सेक्शनमध्ये जा.- आता Apprentice Recruitment Notification वर क्लिक करा.-  यानंतर मार्गदर्शक तत्त्वे वाचा आणि अर्ज करा.- फी भरा आणि सबमिट करा.

निवड प्रक्रियाप्रसिद्ध झालेल्या जाहिरातीनुसार, अर्ज केलेल्या सर्व उमेदवारांची गुणवत्तेद्वारे निवड केली जाईल. दहावी आणि आयटीआयमध्ये मिळालेल्या एकूण गुणांच्या आधारे गुणवत्ता तयार केली जाईल. निवडलेल्या उमेदवारांना रेल्वेने विहित केलेले स्टायपेंड देखील दिले जाईल. निवडलेल्या उमेदवारांची कागदपत्रे पडताळणी केली जाईल. कागदपत्र पडताळणीशिवाय कोणत्याही उमेदवाराची नियुक्ती केली जाणार नाही. 

टॅग्स :Indian Railwayभारतीय रेल्वेjobनोकरीCareer Guidanceकरिअर मार्गदर्शन