शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
3
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
4
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
5
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
6
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
7
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
8
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
9
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
10
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
11
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
12
अमित शाहांची सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक, पाकिस्तानी नागरिकांबद्दल दिला महत्त्वाचा आदेश
13
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
14
गुंतवणुकीत 'ही' काळजी घेतली, तर होऊ शकता मालामाल! कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या?
15
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
16
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
17
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
18
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
19
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
20
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून

Indian Army Bharti Rally 2021: भारतीय लष्करात नोकरीची संधी, लवकरच करू शकता अर्ज...

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 13, 2021 18:03 IST

Indian Army Recruitment Rally 2021 : लष्कराने या संदर्भात आपल्या अधिकृत वेबसाइटवर अधिसूचना जारी केली आहे.

Indian Army Recruitment Rally 2021 : भारतीय लष्कराने आठवी, दहावी आणि बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी शिपाई पदांच्या भरतीची अधिसूचना जारी केली आहे. या भरतीसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया 15 जुलै 2021 पासून सुरू आहे. 25 ऑगस्ट 2021 पर्यंत joinindianarmy.nic.in लष्कराच्या अधिकृत वेबसाइटद्वारे भरतीसाठी उमेदवार अर्ज करू शकतात. (indian army recruitment rally 2021 for 8th, 10th, 12th passed)

लष्कराने या संदर्भात आपल्या अधिकृत वेबसाइटवर अधिसूचना जारी केली आहे. जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, शिपाई ट्रेडमॅन पदासाठी भरती रॅली हिमाचल प्रदेशातील पृथ्वी मिलिट्री स्टेशन, एव्हरीपट्टी रामपूर बुशर, शिमला येथे 2 मार्च ते 14 मार्च 2022  पर्यंत अपेक्षित आहे. तर शिपाई डी फार्मा पदासाठी 6 नोव्हेंबर ते 16 नोव्हेंबर 2021 या काळात हिमाचल प्रदेशातील कुल्लू/लहौल स्पिती/मंडी येथे भरती असणार आहे.

या पदांसाठी असेल भरती रॅलीशिपाई जनरल ड्युटी, शिपाई लिपिक, शिपाई ट्रेडमॅन (आठवी पास), शिपाई ट्रेडमॅन (दहावी पास) आणि शिपाई (फार्मा) या पदांच्या भरतीसाठी या रॅलीचे आयोजन करण्यात येणार आहे.

शैक्षणिक योग्यताशिपाई (फार्मा) पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून डी फार्माची पदवी असली पाहिजे.तर, शिपाई जनरल ड्युटीसाठी उमेदवाराने 45% गुणांसह 10 वी पास आणि शिपाई लिपिक पदासाठी 60% गुणांसह  12 वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. शिपाई ट्रेड्समॅनचा उमेदवार आठवी पास असला पाहिजे.

वयोमर्यादाशिपाई जनरल ड्युटी पदासाठी उमेदवाराची जन्म तारीख 1 ऑक्टोबर 2000 ते 1 एप्रिल 2004 दरम्यान असावी. दुसरीकडे, शिपाई (फार्मा) पदासाठी उमेदवाराची जन्म तारीख 1 ऑक्टोबर 1996 ते 30 सप्टेंबर 2002 दरम्यान असावी. इतर पदांसाठी उमेदवाराची जन्म तारीख 1 ऑक्टोबर 1998 ते 1 एप्रिल 2004 दरम्यान असावी.

निवड प्रक्रियाया पदांसाठी च्या रॅलीदरम्यान उमेदवारांच्या शारीरिक तंदुरुस्ती चाचण्या, शारीरिक मोजमाप आणि वैद्यकीय चाचण्या घेण्यात येतील. या सर्व यशस्वी उमेदवारांची सामान्य प्रवेश परीक्षेसाठी निवड केली जाईल. सामान्य प्रवेश परीक्षेत यशस्वी घोषित केलेल्या उमेदवारांसाठीच अंतिम निवड केली जाईल.

महत्त्वाच्या तारखा...अर्ज सुरू करण्याची तारीख - 15 जुलै 2021अर्ज करण्याची शेवटची तारीख - 28 ऑगस्ट 2021अधिकृत वेबसासाइट - joinindianarmy.nic.in 

टॅग्स :Indian Armyभारतीय जवानjobनोकरीJara hatkeजरा हटके