शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
3
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
4
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
5
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
6
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
7
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
8
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
9
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
10
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
11
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
12
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
13
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
14
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
15
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
16
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
17
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
18
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
19
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
20
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
Daily Top 2Weekly Top 5

पोस्ट ऑफिसमध्ये नोकरीची संधी, 98083 जागांसाठी भरती, 10वी उत्तीर्णही करू शकतात अर्ज

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 16, 2023 10:09 IST

इंडिया पोस्टने आपल्या अधिकृत वेब पोर्टल indiapost.gov.in वर ही घोषणा केली आहे.

नवी दिल्ली : सरकारी नोकरी करण्याची इच्छा असणाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. इंडिया पोस्ट ऑफिसने पोस्टमन, मेल गार्ड, मल्टी-टास्किंग स्टाफ इत्यादी पदांसाठी एकूण 98083 रिक्त जागा जाहीर केल्या आहेत. इंडिया पोस्टने आपल्या अधिकृत वेब पोर्टल indiapost.gov.in वर ही घोषणा केली आहे. एकूण 98083 रिक्त पदांपैकी पोस्टमनच्या 59099 जागा आणि मेल गार्डच्या 1445 जागा रिक्त आहेत. तर मल्टी-टास्किंग पदासाठी 23 मंडळांमध्ये एकूण 37539 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत.

पात्रताअधिकृत इंडिया पोस्ट ऑफिस अधिसूचना 2023 मध्ये जारी केलेल्या माहितीनुसार, ज्या उमेदवारांनी इयत्ता 10वी आणि 12वी उत्तीर्ण गुणांसह किंवा त्याहून अधिक उत्तीर्ण केली आहे, ते इंडिया पोस्ट ऑफिस भरती 2023 साठी अर्ज करण्यास पात्र आहेत. तसेच, उमेदवार पात्रता निकषांसंदर्भात इतर माहिती अधिकृत अधिसूचनेमध्ये तपासून पाहू शकतील.

ऑनलाइन अर्जइंडिया पोस्ट ऑफिस लवकरच या भरतीसाठी नोंदणी प्रक्रियेची सुरुवात तारीख आणि शेवटची तारीख याबद्दल अधिसूचना जारी करणार आहे. या भरतीसाठी केवळ अधिकृत वेबसाइटद्वारे ऑनलाइन अर्ज केला जाऊ शकतो.

वयोमर्यादाया पदांसाठी अर्ज करण्यासाठी उमेदवाराचे वय किमान 18 वर्षे असावे, तर कमाल वयोमर्यादा 32 वर्षे ठेवण्यात आली आहे.

या भरतीसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया...

- या पदांसाठी अर्ज करण्यासाठी उमेदवारांनी सर्वात आधी अधिकृत वेबसाइट indiapost.gov.in ला भेट दिली पाहिजे.

- आता तुम्हाला होमपेजवर 'India Post Recruitment 2023' ची लिंक मिळेल, त्यावर क्लिक करा.

- यानंतर तुमच्यासमोर एक नवीन पेज उघडेल, येथे 'Register Now' वर क्लिक करा.

- आता तुमच्या समोर एक नवीन टॅब उघडेल. येथे तुम्हाला स्वतःचे रजिस्ट्रेशन करावे लागेल.

- रजिस्ट्रेशन झाल्यानंतर उमेदवारांना आवश्यक कागदपत्रे अपलोड करावी लागतील.

- सविस्तर माहिती भरल्यानंतर आणि कागदपत्रे अपलोड केल्यानंतर अर्जाची फी भरावी लागेल.

- फी भरल्यानंतर तुमचे रजिस्ट्रेशन फॉर्म सबमिट करा आणि त्याची प्रिंट आउट देखील घ्या.

टॅग्स :jobनोकरीPost Officeपोस्ट ऑफिस