शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

पोस्टात नोकरीची सुवर्णसंधी, 10 वी उत्तीर्ण देखील करू शकतात अर्ज, जाणून घ्या सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 11, 2023 14:35 IST

निवडलेल्या उमेदवारांना ग्रामीण डाक सेवक (GDS), शाखा पोस्ट मास्टर (BPM), सहाय्यक शाखा पोस्टमास्टर (ABPM) / डाक सेवक (विशेष सायकल) या पदांवर भरती केली जाईल.

नवी दिल्ली : इंडिया पोस्टने(India Post) पोस्ट ऑफिस रिक्रुटमेंट 2023 अंतर्गत 30041 रिक्त जागांसाठी अर्ज मागविले आहेत. उमेदवार 23 ऑगस्ट 2023 पर्यंत अर्ज करू शकतात. या रिक्त पदांसाठी 10वी उत्तीर्ण अर्ज करण्यास पात्र आहेत. निवडलेल्या उमेदवारांना ग्रामीण डाक सेवक (GDS), शाखा पोस्ट मास्टर (BPM), सहाय्यक शाखा पोस्टमास्टर (ABPM) / डाक सेवक (विशेष सायकल) या पदांवर भरती केली जाईल.

दरम्यान, भारतीय पोस्ट हे दळणवळण मंत्रालयाच्या अंतर्गत असलेल्या पोस्ट विभागाचा एक भाग आहे.  भारतीय पोस्ट ही भारतातील 23 मंडळे असलेली सरकारी टपाल प्रणाली आहे. उमेदवारांना www.indiapostgdsonline.gov.in द्वारे अर्ज करता येतील. सरकारी नोकरीसाठी इच्छुक उमेदवारांसाठी ही सुवर्णसंधी आहे. 

या पदारांसाठी 10 वी पास उमेदवार सुद्धा अर्ज करू शकतात. दरम्यान, 18 ते 40 वर्षे वयोगटातील उमेदवार चांगल्या पगारासह आणि अनेक सवलतींसह सरकारी संस्थेअंतर्गत आपले करिअर सुरक्षित करू शकतात. उमेदवारांची निवड 10 वीच्या गुणांच्या आधारे केली जाईल. भरती झालेल्या ग्रामीण डाक सेवक (GDS), शाखा पोस्ट मास्टर (BPM), सहाय्यक शाखा पोस्टमास्टर (ABPM) / डाक सेवक या पदांसाठी उमेदवारांना मिळणारे वेतन पुढील प्रमाणे असू शकते. 

ग्रामीण डाक सेवक आणि सहाय्यक शाखा पोस्टमास्टर पदासाठी 10,000 रुपये ते  24,470 रुपये असणार आहे. तसेच, शाखा पोस्ट मास्टर पदासाठी 12,000 रुपये ते  29,380 रुपये असे असणार आहे. ब्रांच पोस्ट मास्टर कॅटगरीतील उमेदवारांना TRCA स्लॅब 12 हजार ते 29,380 पर्यंत मिळेल. सहाय्यक शाखा पोस्ट मास्टर कॅटगरीतील उमेदवारांना 10 हजार ते 24,470 पर्यंत मिळतील.

याचबरोबर, indiapost.gov.in या अधिकृत वेबसाइटवर ग्रामीण डाक सेवक (GDS), शाखा व्यवस्थापक पोस्टमास्टर (BPM) आणि इतर पदांच्या भरतीसाठी, इच्छुक आणि पात्र उमेदवार अर्ज करू शकतात. इंडिया पोस्ट रिक्रूटमेंट 2023 साठी इतर कोणत्याही माध्यमातून अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.

इंडिया पोस्टच्या 30,000 पेक्षा जास्त जागा - कोणत्या राज्यात कोणत्या कॅटगरीत किती रिक्त आहेत, हे पाहा.

टॅग्स :Post Officeपोस्ट ऑफिसjobनोकरी