शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रीयीकृत बँकेत नोकरीची संधी; 4 हजार पदांसाठी भरती, उद्यापर्यंत करा अर्ज

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 20, 2023 16:58 IST

IBPS Clerk 2023 : या भरतीसाठी उमेदवारांची निवड इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सोनेल सिलेक्शनच्या (IBPS) लिपिक (१३) परीक्षा २०२३ (CRP Clerks-XIII) द्वारे केली जाणार आहे.

नवी दिल्ली : बँकेतनोकरी करण्याची इच्छा असेल तर तुमच्यासाठी एक उत्तम संधी आहे. बँकेत लिपिक पदाची सरकारी नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांसाठी एक महत्त्वाची सूचना आहे. बँक ऑफ बडोदा, बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ महाराष्ट्र, कॅनरा बँक, सेंट्रल बँक ऑफ इंडिया, इंडियन बँक, इंडियन ओव्हरसीज बँक, पंजाब नॅशनल बँक, पंजाब अँड सिंध बँक, यूको बँक आणि युनियन बँक ऑफ इंडिया यासारख्या विविध राष्ट्रीयीकृत बँका देश विविध शाखांमध्ये लिपिक संवर्गाच्या ४ हजार हून अधिक पदांच्या भरतीसाठी अर्ज प्रक्रिया सुरू आहे. 

या भरतीसाठी उमेदवारांची निवड इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सोनेल सिलेक्शनच्या (IBPS) लिपिक (१३) परीक्षा २०२३ (CRP Clerks-XIII) द्वारे केली जाणार आहे. या परीक्षेत बसण्यासाठी सुरू असलेली अर्ज प्रक्रिया उद्या म्हणजेच शुक्रवार, 21 जुलै 2023 रोजी संपणार आहे.अशा परिस्थितीत कोणत्याही विषयात पदवी आणि २८ वर्षे वयापर्यंतच्या इच्छुक उमेदवारांनी अद्याप अर्ज केलेला नाही. असे उमेदवार IBPS च्या अधिकृत वेबसाइट ibps.in वरील अॅक्टिव्ह लिंक किंवा खाली दिलेल्या डायरेक्ट लिंक संबंधित पेजवर जाऊन अर्ज करू शकतात. 

अर्ज प्रक्रियेचा एक भाग म्हणून, उमेदवारांना पहिल्यांदा नोंदणी करावी लागेल आणि नंतर नोंदणीकृत माहितीसह लॉग इन करून, उमेदवार आपले अर्ज सबमिट करू शकतील. अर्जाचे ८५० रुपये शुल्क उद्यापर्यंत ऑनलाइन पद्धतीने भरावे लागणार आहे. SC, ST, दिव्यांग आणि माजी कर्मचारी श्रेणीतील उमेदवारांसाठी शुल्क फक्त १७५ रुपये आहे.

दरम्यान, ३० जून २०२३ रोजी आयबीपीएस लिपिक परीक्षेसाठी अधिसूचना जारी केल्यानंतर, १ जुलैपासून अर्ज प्रक्रिया सुरू झाली, जी २१ जुलै रोजी संपणार आहे. विहित तारखेपर्यंत परीक्षा शुल्कासह अर्ज सादर करणार्‍या उमेदवारांना त्यांच्या अर्जामध्ये कोणत्याही प्रकारची त्रुटी किंवा दुरुस्ती २१ जुलैपर्यंतच करावी लागेल. यानंतर, उमेदवार केवळ ५ ऑगस्टपर्यंत त्यांच्या सबमिट केलेल्या अर्जांची प्रिंट-आउट घेऊ शकतील.

टॅग्स :bankबँकCareer Guidanceकरिअर मार्गदर्शनjobनोकरी