सरकारीनोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांसाठी सुवर्णसंधी आहे. गृह मंत्रालयाच्या अंतर्गत येणाऱ्या गुप्तचर विभागाने ज्युनियर इंटेलिजेंस ऑफिसर पदांसाठी भरतीची जाहिरात प्रसिद्ध केली. या भरतीसाठी अर्ज प्रक्रिया २८ ऑगस्टपासून सुरू होईल. तर, १४ सप्टेंबर २०२५ भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. भरती प्रक्रिया सुरू झाल्यानंतर इच्छुक उमेदवार गृह मंत्रालयाच्या अधिकृत वेबसाइट mha.gov.in द्वारे ऑनलाइन अर्ज करू शकतील. या भरती अंतर्गत एकूण ३९४ रिक्त पदे भरली जाणार आहेत.
उमेदवाराकडे कोणत्याही मान्यताप्राप्त सरकारी विद्यापीठ किंवा संस्थेतून इलेक्ट्रॉनिक्स, इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलिकम्युनिकेशन, इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन, इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन, इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स, माहिती तंत्रज्ञान, संगणक विज्ञान, संगणक अभियांत्रिकी आणि संगणक अनुप्रयोग यापैकी एका शाखेतील अभियांत्रिकी पदवी असणे आवश्यक आहे.
नाही तर, उमेदवाराकडे सरकारी मान्यताप्राप्त विद्यापीठ किंवा संस्थेतून भौतिकशास्त्र किंवा गणितासह इलेक्ट्रॉनिक्स, संगणक विज्ञान, विज्ञान आणि संगणक अनुप्रयोग यापैकी एक बॅचलर पदवी असणे आवश्यक आहे.
या भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय १८ ते २७ वर्षांच्या दरम्यान असावे. या भरती संदर्भात अधिक माहिती जाणून घेण्यासाठी इच्छुक उमेदवाराने गुप्तचर विभागाच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी.