शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

HPCL मध्ये नोकरीची सुवर्ण संधी, कोण करू शकतं अर्ज? जाणून घ्या सविस्तर...

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 23, 2022 14:19 IST

HPCL Jobs 2022: इच्छुक उमेदवार एचपीसीएलच्या अधिकृत साइटला भेट देऊन ऑनलाइन अर्ज करू शकतात. या भरतीसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 22 जुलै ठेवण्यात आली आहे.

नवी दिल्ली : हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेडद्वारे (HPCL) भरती अधिसूचना जारी करण्यात आली आहे. त्यानुसार एचपीसीएलद्वारे विविध पदांवर भरती केली जाणार आहे. ज्यासाठी उमेदवार आजपासून अर्ज करू शकतील. इच्छुक उमेदवार एचपीसीएलच्या अधिकृत साइटला भेट देऊन ऑनलाइन अर्ज करू शकतात. या भरतीसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 22 जुलै ठेवण्यात आली आहे.

या भरती मोहिमेद्वारे मेकॅनिकल इंजीनिअर पदाच्या 103 जागा, इलेक्ट्रिकल इंजीनिअरची 42 पदे,  इंस्ट्रमेंटेशन इंजीनिअरची 30 पदे, क्वालिटी कंट्रोल ऑफिसरची 27 पदे, सिव्हिल इंजीनिअरची 25 पदे, चार्टर्ड अकाउंडट्सची 5 पदे,  केमिकल इंजीनिअरची 7 पदे, इन्फॉर्मेशन सिस्टम ऑफिसरची 5 पदे, लॉ ऑफिसरची 7 पदे, सिनिअर मॅनेजर इलेक्ट्रिकलची 3 पदे, वेलफेअर ऑफिसरची 2 पदे आणि  सेफ्टी ऑफिसरच्या 13 पदांसाठी भरती होणार आहे.

शैक्षणिक पात्रताया भरती मोहिमेसाठी शैक्षणिक पात्रता वेगळ्या पद्धतीने ठरविण्यात आली आहे. त्यासाठी अर्जदारांनी अधिकृत अधिसूचना तपासावी. त्याचवेळी, मेकॅनिकल इंजीनिअर, इलेक्ट्रिकल इंजीनिअर, सिव्हिल इंजीनिअर आणि केमिकल इंजीनिअर पदांच्या भरतीसाठी अर्जदाराचे वय 25 वर्षांपेक्षा जास्त नसावे, असे म्हटले आहे.  ‌

निवड प्रक्रियालेखी परीक्षा, ग्रुप टास्क आणि पर्सनल इंटरव्यू इत्यादींच्या आधारे उमेदवारांची निवड केली जाईल.

अर्जाचे शुल्कया भरतीसाठी उमेदवारांना अर्जासोबत शुल्क भरावे लागेल. जनरल, इतर मागासवर्गीय आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील उमेदवारांना 1000 रुपये अर्ज शुल्क भरावे लागेल.

असा करू शकता अर्जया भरतीसाठी उमेदवार 23 जून ते 22 जुलै 2022 पर्यंत एचपीसीएलच्या अधिकृत वेबसाइट, hindustanpetroleum.com वर जाऊन ऑनलाइन अर्ज करू शकतात.

टॅग्स :jobनोकरीbusinessव्यवसाय