शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेडमध्ये नोकरीची संधी; अप्रेंटिस पदांसाठी बंपर भरती, असा करा अर्ज...

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 8, 2023 16:10 IST

HAL Apprentice Recruitment 2023: इच्छुक आणि पात्र उमेदवार या पदांसाठी अधिकृत वेबसाइट- www.mhrdnats.gov.in आणि www.apprenticeshipindia.gov.in द्वारे अर्ज करू शकतात.

नवी दिल्ली : हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेडने (HAL) ग्रॅज्युएट अप्रेंटिस, डिप्लोमा अप्रेंटिस आणि आयटीआय अप्रेंटिस पदांच्या भरतीसाठी ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू केली आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवार या पदांसाठी अधिकृत वेबसाइट- www.mhrdnats.gov.in आणि www.apprenticeshipindia.gov.in द्वारे अर्ज करू शकतात. अर्ज करण्याची अंतिम तारीख २३ ऑगस्ट २०२३ आहे.

शैक्षणिक पात्रताउमेदवारांकडे मान्यताप्राप्त विद्यापीठ/संस्थेतील पदानुसार संबंधित क्षेत्रातील आयटीआय/बीबीए/डीएमएलटी/नर्सिंग/डिप्लोमा इन हॉटेल मॅनेजमेंट आणि इतर विहित पात्रता असणे आवश्यक आहे.

एकूण जागांची माहितीहिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेडमध्ये पदवीधर, डिप्लोमा धारक आणि आयटीआय पदवीधरांसह विविध हस्तकला आणि विषयांमधील अप्रेंटिस प्रशिक्षणासाठी ६४७ पदांसाठी उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. यामध्ये ग्रॅज्युएट अप्रेंटिसच्या १८६ पदे, डिप्लोमा अप्रेंटिसच्या १११ पदे आणि आयटीआय अप्रेंटिसच्या ३५० पदांचा समावेश आहे.

वयोमर्यादाएचएएल अप्रेंटिस भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे किमान वय १८ वर्षे आणि कमाल वय ४० वर्षे ठेवण्यात आले आहे. भरती अधिसूचना २०२३ च्या नियमांनुसार वयात अतिरिक्त सूट दिली आहे.

अर्जाचे शुल्कसामान्य/ओबीसी/ईडब्ल्यूएस, एससी/एसटी प्रवर्गातील उमेदवारांना २५ रुपये अर्ज शुल्क भरावे लागेल. ऑनलाइन, नेट बँकिंग, डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड, वॉलेटद्वारे पेमेंट केले जाऊ शकते. 

किती मिळेल वेतन?हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड मधील अप्रेंटिस पदांवर निवडलेल्या उमेदवारांना पदानुसार ८००० ते ९००० रुपये प्रति महिना स्टायपेंड मिळेल.

टॅग्स :jobनोकरीCareer Guidanceकरिअर मार्गदर्शन