शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

सरकारी नोकरीची सुवर्ण संधी! रेल्वेत २.४ लाखांहून अधिक पदांची भरती होणार; असा करा अर्ज

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 9, 2023 15:39 IST

रेल्वे विभागाने अलीकडेच ९७३९ कॉन्स्टेबल आणि सब इन्स्पेक्टर, २७०१९ असिस्टंट लोको पायलट आणि टेक्निशियन ग्रेड पोस्ट, ६२८०७ ग्रुप डी पोस्ट, ९५०० RPF भरती रिक्त जागा आणि RPF 798 RPF रिक्त पदांच्या भरतीसाठी अधिसूचना प्रसिद्ध केली आहे.

सरकारी नोकरी करण्याची इच्छा असणाऱ्या उमेदवारांसाठी आता आनंदाची बातमी आहे. भारतीय रेल्वेने २.४ लाखहून अधिक रिक्त पदांसाठी जाहीरात काढली आहे. हे मुख्यत्वे सुरक्षा कर्मचारी, असिस्टंट स्टेशन मास्टर, नॉन-टेक्निकल पॉप्युलर कॅटेगरीज आणि तिकीट कलेक्टर (TC) या संदर्भात आहेत. केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी राज्यसभेत लेखी उत्तरात सांगितले की, रेल्वेच्या सर्व झोनमध्ये गट क पदांवर २,४८,८९५ पदे रिक्त आहेत, तर गट अ आणि ब पदांमध्ये २०७० पदे रिक्त आहेत. अधिसूचनेनुसार, एकूण १,२८,३४९ उमेदवारांना गट 'C' पदांसाठी निवडण्यात आले आहे.

अधिसूचनेनुसार, लेव्हल-१ पदांसाठी एकूण १,४७,२८० उमेदवार निवडले  आहेत. भारतीय रेल्वेवरील गट 'अ' सेवांमध्ये थेट भरती प्रामुख्याने UPSC द्वारे केली जाते. आता यूपीएससी आणि डीओपीटीवर मागणी करण्यात आली आहे.

UPA सरकारने अदानींना 72 हजार कोटींचे कर्ज दिले; स्मृती इराणी यांनी थेट फोटोच दाखवला

रेल्वे विभागाने अलीकडेच ९७३९ कॉन्स्टेबल आणि सब इन्स्पेक्टर, २७०१९ असिस्टंट लोको पायलट आणि टेक्निशियन ग्रेड पोस्ट, ६२९०७ ग्रुप डी पोस्ट, ९५०० RPF भरती रिक्त जागा आणि RPF मध्ये ७९८ रिक्त पदांच्या भरतीसाठी अधिसूचना जारी केली आहे. 

कोणत्या गटासाठी पात्रता गट

 A ग्रुप- या गटातील पदांची भरती UPSC द्वारे नागरी सेवा परीक्षा, अभियांत्रिकी सेवा परीक्षा आणि एकत्रित वैद्यकीय सेवा परीक्षा आयोजित करून केली जाते.

B ग्रुप- ग्रुप B मधील पदे विभाग अधिकारी श्रेणी-सुधारित पदे ग्रुप 'C' रेल्वे कर्मचार्‍यांकडून प्रतिनियुक्तीच्या आधारावर जोडली जातात. 

C ग्रुप: या  ग्रुपमधील पदे साधारणपणे स्टेशन मास्टर, तिकीट कलेक्टर, लिपिक, कमर्शियल अप्रेंटिस, सुरक्षा कर्मचारी, वाहतूक शिकाऊ, अभियांत्रिकी पदे (इलेक्ट्रिकल, सिग्नल आणि टेलिकॉम, सिव्हिल, मेकॅनिकल) इ आहेत. 

ग्रुप D - या ग्रुपमधील पदांमध्ये ट्रॅक-मॅन, हेल्पर, असिस्टंट पॉइंट्स मॅन, सफाईवाला/सफाईवाली, गनमन, शिपाई आणि रेल्वे विभागाच्या विविध सेल आणि बोर्डांमधील विविध पदांचा समावेश आहे.

असा करा अर्ज

1. भारतीय रेल्वेची अधिकृत वेबसाइट "Indianrailways.gov.in" यावर जा.2. RRB क्षेत्र किंवा RRC किंवा मेट्रो रेल्वे निवडा.3. आता तुम्हाला ज्या फील्ड किंवा विभागासाठी अर्ज करायचा आहे ते निवडा. 

4. भरती विभागावर क्लिक करा आणि सूचना काळजीपूर्वक वाचा. 

 5. त्यानंतर ऑनलाइन अर्ज करा आणि अर्ज भरा. 

6. अर्ज फी भरा आणि नंतर सबमिट बटणावर क्लिक करा. 

 7. सबमिट केलेल्या अर्जाची प्रिंटआउट घ्या.

टॅग्स :railwayरेल्वेjobनोकरी