शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

FCI Recruitment 2022 : फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडियाच्या 5043 पदांसाठी भरती; आजपासून करू शकता अर्ज 

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 6, 2022 13:26 IST

FCI Recruitment 2022 : या पदांच्या भरतीसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 5 ऑक्टोबर 2022 निश्चित करण्यात आली आहे.

नवी दिल्ली :  फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने (FCI) ज्युनिअर इंजिनिअरसह विविध पदांच्या भरतीसाठी अधिसूचना प्रसिद्ध केली आहे. फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया नॉन एक्झिक्युटिव्ह रिक्रूटमेंट 2022 साठी (FCI Non Executive Recruitment 2022) आजपासून म्हणजेच 6 सप्टेंबर 2022 पासून उमेदवार ऑनलाइन अर्ज करू शकतात. या पदांच्या भरतीसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 5 ऑक्टोबर 2022 निश्चित करण्यात आली आहे.

अधिसूचनेनुसार, या प्रक्रियेद्वारे फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडियामध्ये ज्युनिअर इंजिनिअर, स्टेनोग्राफर आणि असिस्टंट ग्रेड 3 यासह 5043 रिक्त पदांची भरती केली जाणार आहे. ज्युनिअर पदांसाठी निवडलेल्या उमेदवारांना 34000 रुपये ते 103400 रुपये दरमहा वेतन दिले जाईल. तर स्टेनोग्राफर पदांसाठी दरमहा 30500 ते 88100 रुपये वेतन मिळेल.

या पदांच्या भरतीसाठी उमेदवाराने मान्यताप्राप्त विद्यापीठ किंवा संस्थेमधून संबंधित विषयात पदवी प्राप्त केलेली असावी. याशिवाय, कनिष्ठ अभियंता पदांसाठी वय 28 वर्षांपेक्षा जास्त नसावे. मात्र, राखीव प्रवर्गातील उमेदवारांना सरकारी नियमांनुसार, उच्च वयोमर्यादेत सवलत मिळेल. सर्व पदांसाठी पात्रता स्वतंत्रपणे सेट केली गेली आहे, त्यामुळे तपशीलवार माहितीसाठी, उमेदवार अधिकृत अधिसूचना तपासू शकतात.

ऑनलाइन अर्ज करू शकताया पदांसाठी भरतीसाठी निवड लेखी परीक्षा आणि कौशल्य चाचणीच्या आधारे केली जाईल. उमेदवार फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया नॉन एक्झिक्युटिव्ह रिक्रूटमेंट 2022 भरतीसाठी 6 सप्टेंबर ते 5 ऑक्टोबर 2022 या कालावधीत अधिकृत वेबसाइट fci.gov.in वर ऑनलाइन अर्ज करू शकतात. यासाठी 500 रुपये अर्ज शुल्कही भरावे लागणार आहे. अधिक माहितीसाठी उमेदवार अधिकृत वेबसाइट तपासू शकतात.

टॅग्स :jobनोकरीCareer Guidanceकरिअर मार्गदर्शन